अवकाशात भारताची ऐतिहासिक झेप! ISRO च्या NAVS 03 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण, परदेशी GPS ची गरज संपणार?
ISRO NVS 03 satellite: भारतीय अंतराळ संशोधन संस्था, इस्त्रोने NAVS 03 उपग्रहाचे अवकाशात यशस्वी प्रक्षेपण केले. यामुळे रशिया, अमेरिकेच्या जीपीएस प्रणालीवरील भारताचे अवलंबित्व कमी होईल. भारताची अचूक नेव्हिगेशन यंत्रणा बळकट होईल.

ISRO NVS 03 satellite: भारतीय अंतराळ संशोधन संस्था, इस्त्रोने अंतराळ संशोधनात अजून एक मोठं पाऊल टाकलं आहे. भारताची स्वतंत्र आणि अचूक नेव्हिगेशन यंत्रणा (NavIC) आता अधिक अचूक आणि मजबूत होणार आहे. रशिया आणि अमेरिकेच्या जीपीएस(GPS) यंत्रणेवरील भारताचे अवलंबित्व कमी होईल. त्यासाठी इस्त्रोने NAVS 03 उपग्रहाचे अवकाशात यशस्वी प्रक्षेपण केले. आता नॅव्हिगेशन क्षेत्रातही भारताचा दबदबा वाढला आहे. इतर देशांच्या जीपीएस प्रणालीची भारताला गरज उरलेली नाही.
NavIC प्रणाली काय?
सध्या दैनंदिन प्रवासासाठी आणि मोबाईलमध्ये लोकेशन, ठिकाण शोधण्यासाठी आपण गुगल मॅपिंगची मदत घेतो. संरक्षण यंत्रणाही अमेरिकेच्या ग्लोबल पोझिशनिस्ट सिस्टिम (GPS) आणि इतर परदेशी प्रणालींवर अवलंबून असतात. पण भारताने आता GPS ला स्वदेशी पर्याय तयार केला आहे. नाविक (NavIC-Navigation with Indian Constellation) प्रणाली विकसीत केली आहे. NVS हा या मालिकेतील तिसरा उपग्रह आहे. या उपग्रहाच्या मदतीने जमिनीवर, समुद्रात आणि आकाशात भौगोलिक स्थिती, स्थानाची अचूक माहिती मिळण्यास मदत होईल.
भारतीय संरक्षण व्यवस्थेला मोठा आधार
NVS-03 उपग्रहामध्ये स्वदेशी बनावटीचे रुबिडियम ॲटॉमिक क्लॉक बसवण्यात आले आहे. सर्वसामान्य नागरिकांसोबतच या उपग्रहाचा भारतीय लष्कर, संरक्षण दल, हवाई दल आणि आपत्ती व्यवस्थापन दलाला मोठी मदत मिळणार आहे. या उपग्रहामुळे या यंत्रणांना अतिशय गोपनीय, सुरक्षित आणि अचूक डेटा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सीमावर्ती भागावर लक्ष ठेवण्यासाठी या उपग्रहाचा मोठा फायदा होणार आहे. युद्धजन्य परिस्थितीत आता भारताची नॅव्हिगेशन यंत्रणा अचूक माहिती देईल. त्यात कोणताही तांत्रिक अडथळा येणार नाही आणि व्यत्ययही येणार नाही. परदेशी तंत्रज्ञानावर अवलंबून राहावे लागणार नाही.
स्वतंत्र नेव्हेगिशन यंत्रणा
इस्त्रोच्या या कामगिरीमुळे भारत हा मोजक्या देशाच्या पंक्तीत जाऊन बसला ज्यांची स्वतःची स्वतंत्र उपग्रह नेव्हिगेशन प्रणाली आहे. परदेशी तंत्रज्ञानावरील भारताचे अवलंबित्व आता जवळपास संपणार आहे. नेव्हिगेशन, मॅपिंग क्षेत्रातही भारत आत्मनिर्भर होणार आहे. त्यासाठी NAV 03 हा उपग्रह मैलाचा दगड ठरला आहे. आता देशातंर्गत डिजिटल सेवांनाही गती मिळणार आहे.