India Missile Export : भारताचा मिसाइल विश्वात दबदबा, ब्रह्मोस-आकाशने बाजी पलटली, रशिया, चीन, अमेरिकेला पुरुन उरलो
India Missile Export : डिफेन्स क्षेत्रात भारताने मोठी मजल मारली आहे. याचं सर्वाधिक श्रेय ब्रह्मोस, आकाश या दोन मिसाइल्सना जातं. रशिया, चीन आणि अमेरिकेसारख्या तगड्या देशांचं आव्हान असतानाही भारताने आपला वेगळा दबदबा, ओळख निर्माण केली आहे.

संरक्षण क्षेत्रात भारत आता फक्त आयात करणारा देश राहिलेला नाही, निर्यातक बनत चालला आहे. डिफेन्स क्षेत्रात भारताच्या एक्सपोर्ट मध्ये मोठी वाढ झाली आहे. फक्त छोटी शस्त्रे आणि सुट्टे भाग एवढ्यापुरता भारताची निर्यादीत मर्यादीत नाही. मिसाइल क्षेत्रात भारताने मोठी मजल मारली आहे. स्वदेशी बनावटीची ब्रह्मोस, आकाश ही हाय-टेक मिसाइल्स परदेशी बाजारपेठांमध्ये आपली ओळख बनवत आहेत. एकट्या ब्रह्मोसची निर्यात 600 मिलियन डॉलरच्या पुढे जाईल अशी चिन्ह आहेत. भारताच्या वाढत्या डिफेन्स निर्यातीमध्ये ब्रह्मोस महत्वाचं उत्पादन आहे. फिलीपींसला जवळपास 330 मिलियन डॉलरच्या ब्रह्मोस सिस्टिमचा पुरवठा करण्यात आला आहे. वियतनाम सोबत 100 मिलियन डॉलर आणि इंडोनेशियासोबत 200 मिलियन डॉलरची नवीन डील होऊ शकते. म्हणजे एकट्या ब्रह्मोसच्या निर्यातीचा व्यवहार 600 मिलियन डॉलरच्या पुढे जाईल अशी स्थिती आहे.
अत्यंत वेगाने अचूकतेने लक्ष्यावर प्रहार करणं ही ब्रह्मोसची खासियत आहे. या मिसाइलचं एअर वर्जन जे आहे ते सुखोई-30MKI फायटर जेटमधून डागता येतं. आकाश हे एअर डिफेन्स सिस्टिमधील मिसाइल आहे. जमिनीवरुन हवेतील लक्ष्याचा वेध घेणारं हे मिसाइल आहे. परदेशी बाजारपेठेत या मिसाइलने सुद्धा आपली ओळख बनवली आहे. DRDO ने आकाश मिसाइल विकसित केलं आहे. भारत डायनेमिक्स लिमिटेड (BDL) आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) सारख्या कंपन्यांकडून या मिसाइलची निर्मिती केली जाते. अत्यंत वेगाने हवेतील लक्ष्याचा वेध घेणं ही आकाशची खासियत आहे. या मिसाइलची सुरुवातीची रेंज 25-30 किलोमीटर आहे. आकाश-NG ची रेंज 50 किलोमीटर पर्यंत आहे. आर्मेनिया हा आकाशचा पहिला ग्राहक आहे. त्यानंतर ताजिकिस्तान आणि तुर्कमेनिस्तान हे देश रांगेत आहेत. भारताची एअर डिफेन्स सिस्टिम परदेशात स्वीकारली जातेय त्याचं हे उदहारण आहे.
भारत आता किती देशांना डिफेन्सचं सामान एक्सपोर्ट करतो?
ब्रह्मोस आणि आकाश या दोन्ही मिसाइल्सनी ऑपरेशन सिंदूरमध्ये दमदार प्रदर्शन केलं होतं. या मिसाइलची मागणी वाढण्यामागे हे सुद्धा एक कारण आहे. मिसाइल एक्सपोर्ट यातून भारताच्या डिफेन्स सेक्टरमधील बदल दिसून येतोय. वर्ष 2025-26 मध्ये भारताचा डिफेन्स एक्सपोर्ट रेकॉर्ड ₹38,424 कोटींवर पोहोचला. मागच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 62.66 टक्के वाढ झाली.2024-25 मध्ये ₹23,622 कोटींचा डिफेन्स व्यवहार झाला होता. भारत आता 80 पेक्षा जास्त देशांना डिफेन्सशी संबंधित साहित्य आणि सिस्टिमची निर्यात करत आहे.सरकारने पुढच्यावर्षी पर्यंत ₹50,000 कोटी पर्यंत संरक्षण साहित्य निर्यातीचं लक्ष्य ठेवलं आहे. संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेवर भारताचा सर्व फोकस आहे.