AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Trade Deal : अखेर डोनाल्ड ट्रम्प यांची माघार, भारताच्या प्रस्तावाला मान्यता, लवकरच व्यापार करार होणार

India US Trade Deal : भारत आणि अमेरिकेतील व्यापार कराराबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतर आता करार अंतिम टप्प्यात पोहोचला असल्याचे समोर आले आहे.

Trade Deal : अखेर डोनाल्ड ट्रम्प यांची माघार, भारताच्या प्रस्तावाला मान्यता, लवकरच व्यापार करार होणार
india us trade deal
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Nov 16, 2025 | 11:18 PM
Share

गेल्या काही काळापासून भारत आणि अमेरिकेतील संबंध ताणलेले आहेत. अशातच आता दोन्ही देशांमधील व्यापार कराराबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतर आता करार अंतिम टप्प्यात पोहोचला असल्याचे बोलले जात आहे. आता या महिन्याच्या अखेरीस या व्यापार कराराची अधिकृत घोषणा होण्याचीही शक्यता आहे. यामुळे भारतीय वस्तूंवरील कर कमी होणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

डोनाल्ड ट्रम्प यांची माघार

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेने भारतावर 25 टक्के अतिरिक्त शुक्ल लादले होते, ते आता मागे घेण्यास डोनाल्ड ट्रम्प तयार आहेत. तसेच भारत अमेरिकेच्या कृषी उत्पादनांसाठी आपल्या देशाील बाजारपेठ खुली करण्यास तयार असल्याचेही समोर आले आहे. तसेच दोन्ही अलिकडच्या काळात वाढलेला व्यापारातील तणाव कमी करण्यास तयार आहेत. रशियाकडून तेल खरेदीमुळे दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला होता, मात्र आता या वादावर तोडगा निघाल्याने व्यापार करारातील मोठा अडथळा दूर झाला आहे.

अतिरिक्त शुल्क माफ होणार

भारत अमेरिका व्यापार कराराशी संबंधित असलेल्या अधिकाऱ्यांनी म्हटले की, अमेरिकने लादलेले अतिरिक्त शुल्क काढून टाकल्यानंतर पुढील चर्चा आणखी वेगाने होईल’. रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे अमेरिकेने 25 टक्के अतिरिक्त शुल्क लादले होते, मात्र आता भारताने तेलाची आयात कमी केल्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव कमी झाली आहे. याआधी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, ‘दोन्ही देश निष्पक्ष व्यापार कराराच्या जवळ आहेत’ असं विधान केले होते. आता दोन्ही देश सुल्काच्या स्लॅबबाबत चर्चा करत असल्याची माहिती समोर आली आहे. यात 12-15 टक्के आणि 15-19 टक्के असे दोन स्लॅब असण्याची शक्यता आहे.

सोयाबीन, मका आणि दुग्धजन्य पदार्थांचा व्यापार वाढणार

समोर आलेल्या माहितीनुसार, कराराच्या चर्चेदरम्यान भारताने अमेरिकन सोयाबीन आणि मका मोफत किंवा कमी शुल्कात आयात करण्यास सहमती दर्शविली आहे. भारत इथेनॉल उत्पादनासाठी अमेरिकन मकेचा वापर करणार असल्याचीही माहिती समोर आली आहे. मात्र दुग्धजन्य उत्पादनांबाबत कठोर अटी असणार आहेत. भारत केवळ मर्यादित आणि प्रक्रिया केलेल्या वस्तूंना परवानगी देणार असल्याची माहिती समोर आली आहे. या करारात कृषी क्षेत्रातील वस्तूंवर खास लक्ष देण्यात आले होते, मात्र आता ट्रम्प यांनी या अटी मान्य केल्या आहेत. त्यामुळे लवकरच अंतिम करार होण्याची शक्यता आहे.

Follow Us
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?
नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
Nagpur Congress : नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut on Hardeep Puri : हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले, ही तर....