AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Trade Deal: भारत-अमेरिका व्यापार कराराबाबत मोठी बातमी, पीयूष गोयल यांनी दिली महत्त्वाची माहिती

India USA Trade Deal: अमेरिकेने भारतावर 50 टक्के कर लादल्याने दोन्ही देशांमधील व्यापारावर परिणाम झाला आहे. त्यामुळे आता दोन्ही देशांमधील व्यापार करारावर संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. अशातच आता या व्यापार कराराच्या वाटाघाटीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

Trade Deal: भारत-अमेरिका व्यापार कराराबाबत मोठी बातमी, पीयूष गोयल यांनी दिली महत्त्वाची माहिती
Trade Deal News
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Sep 26, 2025 | 9:18 PM
Share

भारत आणि अमेरिकेतील संबंध गेल्या काही काळापासून ताणले गेलेले आहेत. अमेरिकेने भारतावर 50 टक्के कर लादल्याने दोन्ही देशांमधील व्यापारावर परिणाम झाला आहे. त्यामुळे आता दोन्ही देशांमधील व्यापार करारावर संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. अशातच आता या व्यापार कराराच्या वाटाघाटीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. दोन्ही देशांमधील बोलणी आता सकारात्मक दिशेने सुरु आहेत. त्यामुळे आगामी काळात लवकरच दोन्ही देशांमध्ये व्यापार करार होण्याची शक्यता आहे. यामुळे दोन्ही देशांमधील रखडलेला व्यापार करार पूर्वपदावर येण्यास मदत होणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

22 ते 24 सप्टेंबर दरम्यान पार पडली बैठक

समोर आलेल्या माहितीनुसार 22 ते 24 सप्टेंबर दरम्यान दोन्ही देशांमधील व्यापार करारबाबत महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी कराराच्या बाबतील अनेक प्रमुख मुद्द्यांवर चर्चा झाली. दोन्ही देशांच्या प्रतिनिधींनी आपले विचार आणि अटी मांडल्या. शेवटी दोन्ही देशांच्या हितांचे संतुलन राखून व्यापार करार केला जाईल यावर सहमती झाली. भारताचे वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी तीन दिवसांचा अमेरिकेचा दौरा केला. दौऱ्यावरून परत आल्यानंतर त्यांनी ‘या भेटीमुळे द्विपक्षीय व्यापार संबंध मजबूत झाले असून आगामी काळात पुढील चर्चा होणार आहे’ अशी माहिती दिली.

अमेरिकेचे अधिकारी आणि कंपन्यांसोबत बैठका

पीयूष गोयल यांनी आपल्या अमेरिका दौऱ्यात यूएसटीआर (यूएस व्यापार प्रतिनिधी) जेमिसन ग्रीर यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांनी विविध व्यापारी मुद्द्यांवर खुली चर्चा केली. तसेच गोयल यांनी या दौऱ्यात भारतातील गुंतवणूक वाढवण्यासाठी तंत्रज्ञान आणि उद्योग क्षेत्रातील भागीदारी मजबूत करण्यासाठी अनेक अमेरिकन कंपन्यांमधील प्रमुख अधिकारी आणि गुंतवणूकदारांची भेट घेतली असल्याचेही समोर आले आहे.

व्यापार करार लवकर होणे फायद्याचे

दोन्ही देशांसाठी हा व्यापार करार फायदेशीर आहे. त्यामुळे दोन्ही देशांनी व्यापार कराराबाबत लवकरात लवकर पुढच्या फेरीची चर्चा आयोजित करण्याची गरज व्यक्त केली आहे. जितक्या लवकर व्यापार करार होईल, तितक्या लवकर व्यापार पूर्वपदावर येणार आहे. तसेच या व्यापार कराराचा फायदा दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थांनाही होणार आहे.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?