भारतीय लष्कराने 15000 फूट उंचावर फडकावला 76 फूट उंच राष्ट्रध्वज, ट्विटरवर व्हिडीओ शेअर

भारतीय लष्कराच्या फायर अँड फ्युरी कॉर्प्सने ध्वज फडकावला आणि त्याचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला. हा ध्वज भारतीय लष्कर आणि फ्लॅग फाऊंडेशन ऑफ इंडियाने तयार केलाय. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत हा ध्वज फडकावण्यात आल्याचे भारतीय लष्कराने सांगितले. व्हिडीओमध्ये राष्ट्रगीत वाजत असतानाच जवानांचे दोन गट ध्वजाला सलामी देताना दिसत आहेत.

भारतीय लष्कराने 15000 फूट उंचावर फडकावला 76 फूट उंच राष्ट्रध्वज, ट्विटरवर व्हिडीओ शेअर
indian flag
| Edited By: | Updated on: Nov 21, 2021 | 10:24 PM

नवी दिल्लीः भारत आणि चीनमध्ये (India-China) सुरू असलेल्या सीमा विवादाच्या (Border Dispute) पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराने (Indian Army) रविवारी लडाखमध्ये (Ladakh)  15,000 फूट उंचीवर 76 फूट उंच ध्वज फडकावला. हणले खोऱ्यात हा ध्वज फडकावण्यात आला. भारतीय लष्कराच्या फायर अँड फ्युरी कॉर्प्सने ध्वज फडकावला आणि त्याचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला. हा ध्वज भारतीय लष्कर आणि फ्लॅग फाऊंडेशन ऑफ इंडियाने तयार केलाय. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत हा ध्वज फडकावण्यात आल्याचे भारतीय लष्कराने सांगितले. व्हिडीओमध्ये राष्ट्रगीत वाजत असतानाच जवानांचे दोन गट ध्वजाला सलामी देताना दिसत आहेत.

लेहमध्ये जगातील सर्वात मोठा खादीचा राष्ट्रध्वज फडकावला

दुसरीकडे भारतीय लष्कराच्या या हालचालीकडे शत्रू एक कडक मेसेज म्हणूनही पाहत आहेत. यापूर्वी 2 ऑक्टोबरला लेहमध्ये जगातील सर्वात मोठा खादीचा राष्ट्रध्वज फडकावण्यात आला होता. हा ध्वज 225 फूट लांब आणि 150 फूट रुंद होता. श्रीनगरमधील संरक्षण जनसंपर्क अधिकारी कर्नल इम्रॉन मौसावी यांनी सांगितले की, फायर अँड फ्युरी कॉर्प्सने लेह गॅरिसनमध्ये एका ऐतिहासिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते, जिथे लेफ्टनंट गव्हर्नर आर. के. माथूर यांनी उंच पर्वतावर एक मोठा राष्ट्रध्वज फडकावला होता. चीफ जनरल एम एम नरवणे आणि नॉर्दर्न कमांडचे लेफ्टनंट जनरल वायके जोशी हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.

ऐतिहासिक ‘शाल्टेंगची लढाई’ पुन्हा साकारण्यासाठी लाईट आणि साऊंड शो आयोजित

भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या स्मरणार्थ भारतीय लष्कराने गेल्या काही महिन्यांत लडाखमध्ये अनेक कार्यक्रमांचे आयोजन केलेय. या महिन्याच्या सुरुवातीला भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सने 7 नोव्हेंबर 1947 रोजी शालतेंगच्या लढाईत काश्मिरी आणि भारतीय सैनिकांनी केलेल्या बलिदानाची आठवण ठेवण्यासाठी ऐतिहासिक ‘शाल्टेंगची लढाई’ पुन्हा साकारण्यासाठी लाईट आणि साऊंड शो आयोजित केला होता.

संबंधित बातम्या

75 वर्षांत जितकी प्रगती व्हायला हवी होती, तितकी झाली नाही, मोहन भागवतांचं मोठं विधान

पतीला गुप्त रोग असल्याचा संशय, संशयास्पद मृत्यू, नातेवाईकांचा पत्नीवर हत्येचा आरोप