Indian Railway : ब्रिटीश काळापासून ‘सर्वात मोठी’ समस्या, रेल्वेने शोधला ‘इंटरनेट ऑफ थिंग्स’ आधारीत उपाय?

जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे जाळे असलेल्या भारतीय रेल्वेने दररोज दोन ते अडीच कोटी प्रवासी प्रवास करतात. परंतु, रेल्वेतील अस्वच्छ आणि दुर्गंधी युक्त प्रसाधनगृहांमुळे अनेक जण रेल्वेचा प्रवास करताना कचरतात. त्यावर भारतीय रेल्वेने एक अत्याधुनिक उपाय शोधण्याचा प्रयत्न केला आहे.

Indian Railway : ब्रिटीश काळापासून ‘सर्वात मोठी’ समस्या, रेल्वेने शोधला 'इंटरनेट ऑफ थिंग्स' आधारीत उपाय?
indian railway use to prevent toilet odors iot based technologyImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Apr 22, 2024 | 5:10 PM

मुंबई : गेली काही वर्षे भारतीय रेल्वेच्या ( Indian Railway ) आधुनिकीकरणाचा प्रयत्न सुरु आहे. वंदेभारत सारख्या नव्या प्रकारच्या आरामदायी ट्रेन सुरु करणे, स्थानकांचा पुनर्विकास करणे आणि इतर प्रवासी सोयी सुविधा वाढविण्याचे काम सुरु आहे. परंतु, भारतीय रेल्वेची दुर्गंधीयुक्त आणि अस्वच्छ टॉयलेट ही एक मोठी समस्या बनली आहे. भारतीय रेल्वेच्या या सर्वात मोठ्या समस्येवर उपाय शोधण्याचा विडाच जणू रेल्वेने उचलला आहे. त्यामुळे रेल्वेने आता ‘इंटरनेट ऑफ थिंग्स’ ( IoT based technology ) आधारित आधुनिक उपाय योजण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील विलीसो टेक्नॉलॉजीस या स्टार्टअपच्या मदतीने ही यंत्रणा रेल्वेच्या टॉयलेटमध्ये उभारली जाणार असल्याचे म्हटले जात आहे. सध्या हा प्रयोग चाचणी पातळीवर असून प्रायोगिक तत्वांवर रेल्वेच्या काही डब्यांमध्ये तो वापरला जाणार आहे. काय आहे हा अत्याधुनिक प्रयोग चला जाणून घेऊ…

DRDO ने बनविले बायो टॉयलेट

भारतीय रेल्वेच्या टॉयलेटमधील मानवी विष्ठा पूर्वी रेल्वेच्या ट्रॅकवर तशीच टाकली जात होती. त्यामुळे रेल्वेचा ट्रॅकचा परिसर दुर्गंधीने भरुन जायचा. अनारोग्यदायक वातावरण पसरायचे. रेल्वे ट्रॅकची डागडुजी करणारे तसेच साफसफाई करणारे रेल्वेचे गॅंगमन, ट्रॅकमन, स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या यांच्या आरोग्याचा प्रश्न यामुळे निर्माण होत होता. यावर संरक्षण मंत्रालयाच्या DRDO ( Defence Research and Development Organisation ) संघटनेने संशोधन करुन बायो टॉयलेटचा शोध लावला.

काय आहे बायो टॉयलेट?

भारतीय रेल्वेने जानेवारी 2011 पासून रेल्वे गाड्यांमध्ये बायो टॉयलेट बसविण्यास सुरुवात केली. यात एक सेप्टी टॅंक बसविला जातो. या टॅंकमध्ये साठविलेल्या मानवी विष्ठेचे एका बॅक्टेरियाद्वारे विघटन केले जाते. त्यानंतर तयार झालेला मिथेन गॅस हवेत सोडण्यात येतो. तर पाणी ट्रॅकवर सोडले जाते. त्यामुळे थेट मानवी विष्ठा रेल्वे ट्रॅकवर टाकण्याचा प्रकार बंद झाला. मात्र. या बायोटॉयलेटचा वापर अत्यंत काळजीपूर्वक करावा लागतो. या बायोटॉयलेटमध्ये प्रवासी कचरा, विड्या, सिंगारेटची थोटकं, नॅपकिन सरळ टाकून देतात. त्यामुळे ही बायो टॉयलेट बाद होतात आणि त्यांना पुन्हा दुरुस्त करावे लागते.

बायो टॉयलेट डबल डेकरचा अडसर

बायो टॉयलेट बसविल्यामुळे रेल्वेच्या ट्रॅकवर दुर्गंधी पसरविणारी मानवी विष्ठा थेट टाकण्याचा प्रकार बंद करण्याचा रेल्वेचा उद्देश्य आहे. सन 2020-21 पर्यंत सर्वच ट्रेनला बायो टॉयलेट बसविण्याचा संकल्प रेल्वेने सोडला होता. एलएचबी कोच आणि डबल डेकर कोचमध्ये बायो टॉयलेट बसविताना त्याच्या डिझाईनचा अडसर आला होता.

बायो टॉयलेटमध्ये कोणता बॅक्टेरिया वापरतात

बायो टॉयलेटमधील मानवी विष्ठेचे विघटन करण्यासाठी एक प्रकारचा अॅनारोबिक बॅक्टरिया डीआरडीओ वापरते. थंड तापमानात टिकून राहण्याची त्याची क्षमता असते. मायनस 55 अंश सेल्सिअसपर्यंत टिकून राहण्याची या बॅक्टेरियाची क्षमता असते. हा जीवाणू पर्यावरणास अनुकूल पद्धतीने मानवी विष्ठेचे विघटन करुन कचरा कमी करण्यास मदत करतो.

आता रेल्वेची काय योजना?

रेल्वेच्या टॉयलेटमधील दुर्गंधीचे मोजमाप करणारे सेंसर टॉयलेटमध्ये बसविले जाणार असल्याचे म्हटले जात आहे. हवेतील दुर्गंधीला कारणीभूत घटकांची मोजणी या सेंसरद्वारे होईल आणि मग हे सेंसर हा डाटा केंद्रीय प्रणालीकडे इंटरनेटद्वारे पाठवतील. त्यामुळे संबंधित टॉयलेटला स्वच्छ करण्याची गरज असल्याचा संदेश पुढील स्थानकावरील क्रू ला जाईल आणि हे टॉयलेट स्वच्छ करण्यासाठी कर्मचारी जातील अशी ही यंत्रणा आहे. त्यामुळे टॉयलेटची रियल टाईम मॉनिटरींग आधुनिक पद्धतीने करता येईल असे म्हटल जात आहे.

‘गंधवेध टॉयलेट ट्रॅकींग’ सिस्टीम काय ?

विलीसो टेक्नॉलॉजीसच्या वेबसाईटवर या स्टार्टअपकडे स्वच्छता राखण्यासाठी अनेक आयओटी तंत्रज्ञान आधारित उपकरणे असल्याचे नमूद केले आहे. ‘गंधवेध’ नावाचे आयओटी तंत्रज्ञानावर आधारित उपकरण कंपनीने तयार केले आहे. व्होलटाईल ऑर्गेनिक कंपाऊंड ( हवेतील दुर्गंधी पसरविणारे घटक, तापमान, आद्रता याची मोजणी हे यंत्र करते. नंतर हा डाटा मोबाईल अॅप आणि वेब अॅपला पाठविला जातो. त्यामुळे संबंधित टॉयलेटला स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी असलेल्या केअरटेकर किंवा मॉनिटरींग अथोरिटीला टॉयलेट स्वच्छ करण्यासाठी संदेश पाठविला जातो.

कुठे झाला पहिला वापर

मुंबईतील मध्य रेल्वेचे मुख्यालय असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील स्वच्छतागृहात सर्वप्रथम हे आधुनिक तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनसवर स्वच्छतागृहातील दुर्गंधीवर ‘गंधवेध’ या आधुनिक यंत्रणेद्वारे नजर ठेवली जात होती. गंधवेध या विशिष्ट यंत्रांमार्फत दुर्गंधीची मोजली केली जाते. त्यानंतर आता हाच प्रयोग भारतीय रेल्वेच्या गाड्यांमध्ये केला जाणार असल्याचे वृत्त आहे.

वंदेभारतमध्येही झाला प्रयोग

भारतीय रेल्वेच्या वंदेभारत एक्सप्रेसचे टॉयलेट स्वच्छ आणि दुर्गंधीमुक्त राहण्यासाठी काही महिन्यांपूर्वी प्रायोगित तत्वावर स्मेल सेन्सर ( गंध सेन्सर ) बसवले होते. गाडीतील प्रसाधन गृहात वेळेवर स्वच्छता न झाल्यास दुर्गंधी वाढते. अशा वेळी स्मेल सेन्सरमुळे नियंत्रण केंद्राला संदेश जातो. तेथून नंतर स्वच्छता कर्मचाऱ्यांना संदेश जातो. आणि संबंधित प्रसाधनगृहाची स्वच्छता केली जाते. आगामी काळात भारतीय रेल्वेच्या सर्वच गाड्यांमध्ये ही यंत्रणा कार्यरत केली जाणार असल्याचे म्हटले जात होते. छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या स्वच्छता गृहात सर्वप्रथम ‘गंधवेध’ यंत्रणा वापरली गेली होती. त्यानंतर वंदेभारत एक्सप्रेसमध्ये तिची चाचणी केली होती. आता थेट भारतीय रेल्वेच्या सर्व गाड्यांमध्ये टप्प्याटप्प्याने ही यंत्रणा लागू केली जाणार असल्याचे म्हटले जात आहे.

भारतीय व्यक्तीमुळे ट्रेनमध्ये  बांधले टॉयलेट

ब्रिटीशांनी एका भारतीय व्यक्तीच्या पत्रामुळे रेल्वेत टॉयलेट बांधल्याचे म्हटले जात आहे. ओखील चंद्र सेन यांना यासंदर्भात 1909 मध्ये साहिबगंज डिव्हीजनल रेल्वेला एक पत्र लिहिले होते. या पत्रात त्यांनी म्हटले होते की जेव्हा आपण अहमदपूर स्थानकात रेल्वेने उतरलो तेव्हा माझ्या पोटात जोरात कळ आली. त्यामुळे आपण ट्रेनच्या गार्डला विनंती करीत शौचालयाला गेलो. आपण येईपर्यंत ट्रेन सोडू नका अशी विनंतीही आपण केली होती. परंतू गार्डने ट्रेन सुरु केली आणि मला एका हातात लोटा आणि एका हातात धोतर पकडून ट्रेनच्या पाठी धावावे लागले. त्यातच धावती ट्रेन पकडताना आपण फलाटावर पडल्याने आणि त्यात धोतर सुटल्याने सर्व स्री-पुरुष प्रवाशांसमोर आपली अवस्था बिकट झाली, लाजीरवाणे व्हावे लागले. त्यामुळे अहमदपूर स्थानकात मला थांबावे लागले. त्या गार्डला दंड करावा अशी आपणाला मी विनंती करीत आहे. अन्यथा मी हे सर्व वृत्तपत्रांना कळवेन असे ओखील चंद्र सेन यांनी त्याकाळात साहिबगंज रेल्वे डिव्हीजनला पत्रात लिहीले होते. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने ट्रेनमध्ये टॉयलेट बसवण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले जाते.

परदेशातील टॉयलेट स्वच्छतेचा व्हिडीओ

परदेशातील ट्रेनमधील टॉयलेट प्रवाशांनी वापर करण्यापूर्वी पाण्याने कशा प्रकारे स्वच्छ केली जातात याचा एक व्हिडीओ समाजमाध्यमावर मागे व्हायरल झाला होता. या व्हिडीओतील रेल्वेच्या टॉयलेटमधील कमोड आणि त्याच्या बाजूचा परिसर पाण्याचा फवारा मारुन स्वच्छ होत असल्याचे या व्हिडीओत दाखविले होते. त्यामुळे हा व्हिडीओ खूपच पाहिला जात होता. आपल्या येथे असे तंत्रज्ञान का नाही ? अशा आशयाच्या प्रतिक्रिया या व्हिडीओवर आल्या होत्या. अलिकडे रेल्वेने राजधानी एक्सप्रेसमध्ये विमानतळाप्रमाणे व्हॉक्युम टॉयलेटचा प्रयोग केला आहे.

प्रत्येक झोनच्या दहा ट्रेनमध्ये वापर होणार

आधी 16 रेल्वे स्थानकांत गंधवेध या आयओडी बेस्ड टेक्नॉलॉजीचा वापर झाला. त्यानंतर ‘वंदेभारत ट्रेन’ मध्ये हे उपकरण लावले. त्यानंतर प्रवाशांच्या प्रतिक्रिया घेतल्या गेल्या. हे उपकरण आयओडी बेस्ड असल्याने मानवी हस्तक्षेपाशिवाय थेट मोबाईलवर याचा रिजल्ट कळतो. त्यामुळे आता रेल्वेने अमृतकाळ योजनेतंर्गत प्रत्येक झोनमधील दहा ट्रेनमध्ये हे गंधवेध उपकरण लावण्याचा निर्णय घेतल्याचे विलीसो टेक्नॉलॉजीस कंपनीचे सीईओ आणि सह संस्थापक चंद्रशेखर सकपाळ यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना सांगितले.

Non Stop LIVE Update
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सुपर संडे; कुठे, कोणाच्या सभांचा धडका?
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सुपर संडे; कुठे, कोणाच्या सभांचा धडका?.
अमरावती मतदारसंघात नवनीत राणांसह 'या' दोन उमेदवारांना आयोगाकडून नोटीस
अमरावती मतदारसंघात नवनीत राणांसह 'या' दोन उमेदवारांना आयोगाकडून नोटीस.
शरद पवारांच्या सांगता सभेचं मैदान पहिल्यांदा बदललं, बारामतीत काय घडलं?
शरद पवारांच्या सांगता सभेचं मैदान पहिल्यांदा बदललं, बारामतीत काय घडलं?.
नाऱ्या आडवा ये... ठाकरेंची टीका, राणेंनी प्रत्युत्तर देत काढली औकात
नाऱ्या आडवा ये... ठाकरेंची टीका, राणेंनी प्रत्युत्तर देत काढली औकात.
शाह ठाकरेंच्या विरोधात तर मोदी बाजूने? मोदींच्या मनात ठाकरेंबद्दल काय?
शाह ठाकरेंच्या विरोधात तर मोदी बाजूने? मोदींच्या मनात ठाकरेंबद्दल काय?.