जपानच्या बुलेट ट्रेनला ‘देशी बुलेट ट्रेन’ टाकणार मागे? महत्वांकाक्षी हायस्पीड प्रकल्पाचा आतापर्यंतचा प्रवास
भारताची पहिली सेमी हायस्पीड 'वंदेभारत भारत एक्सप्रेस' चेन्नईच्या आयसीएफ रेल फॅक्टरीत तयार करण्यात आली होती. तिच्या यशानंतर अनेक देशांनी तिची तारीफ केली आणि ऑर्डरही नोंदविली. मुंबई ते अहमदाबाद हा जपानी बुलेट ट्रेन प्रकल्प प्रचंड महागडा ठरल्याने आता देशातील इंजिनियर्स 'मेक इन इंडिया' अंतर्गत देशी बुलेट ट्रेन बनविण्याच्या मागे लागले आहेत. काय आहे ही नेमकी योजना, देशात आणखी कुठे कुठे बुलेट ट्रेन धावणार आहेत पाहा..

एकीकडे मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरु आहे. तर दुसरीकडे देशात विविध मार्गांवर येत्या काही वर्षांत बुलेट ट्रेनचे विविध प्रकल्प सुरु होणार आहेत. जपानच्या सहकार्याने तयार होणाऱ्या मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन या प्रकल्पाचा अंदाजित खर्च एक लाख दहा हजार कोटी रुपयांचा आहे. आता या प्रकल्पाचे बजेटही वाढणार आहे. त्यामुळे बुलेट ट्रेन प्रकल्पाला एकीकडे पांढरा हत्ती म्हटले जात आहे. त्यातच आता देशातीलच तंत्रज्ञान वापरुन देशी बुलेट ट्रेन तयार केली जात आहे. आणि देशातील विविध मार्गांवर बुलेट ट्रेनचे जाळे विणले जाणार आहे. आता वंदेभारत ट्रेनच्या धर्तीवर देशातच 250 किमीच्या वेगाने धावणारी देशी बुलेट ट्रेन बनविली जाणार आहे. काय आहे बुलेट ट्रेनचा आतापर्यंतचा प्रवास, देशात कुठे-कुठे धावणार बुलेट ट्रेन पाहा… ...
