प्रथमच ट्रेनमध्ये गरम पाणी अन् गरम हवा…पुढील महिन्यात सुरु होणार या दोन नवीन रेल्वे

काश्मीरात रेल्वेने जाणे आता आरामदायी होणार आहे. रेल्वे जानेवारी महिन्यात दोन सेंट्रली हिटेड स्लीपर ट्रेन सुरु करत आहे. या दोन्ही ट्रेनमध्ये जबरदस्त सुविधा प्रवाशांना मिळणार आहे. त्यात गरम हवेपासून गरम पाणीपर्यंत सुविधा दिली जाणार आहे.

प्रथमच ट्रेनमध्ये गरम पाणी अन् गरम हवा...पुढील महिन्यात सुरु होणार या दोन नवीन रेल्वे
रेल्वे
| Updated on: Dec 22, 2024 | 5:28 PM

देशात वंदे भारत ट्रेन सुरु झाली. सेमी हायस्पीड असलेली ही ट्रेन प्रवाशांच्या पसंतीला उतरली. या ट्रेनची मागणी वाढत असताना रेल्वेकडून आणखी दोन वेगळ्या ट्रेन सुरु करण्यात येणार आहे. या ट्रेन वंदे भारत नाहीत. परंतु या ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्यांना आरामदायक वातावरण मिळणार आहे. हिवाळ्यातील थंडीचा त्रास होणार नाही. या ट्रेन पुढील महिन्यापासून सुरु होणार आहे. सेंट्रली हिटेड स्लीपर ट्रेन असे त्या ट्रेनचे नाव असून नवी दिल्ली ते काश्मीर असा प्रवास ही ट्रेन करणार आहे.

जानेवारी महिन्यात सुरु होणार

काश्मीरात रेल्वेने जाणे आता आरामदायी होणार आहे. रेल्वे जानेवारी महिन्यात दोन सेंट्रली हिटेड स्लीपर ट्रेन सुरु करत आहे. या दोन्ही ट्रेनमध्ये जबरदस्त सुविधा प्रवाशांना मिळणार आहे. त्यात गरम हवेपासून गरम पाणीपर्यंत सुविधा दिली जाणार आहे. यामुळे काश्मीरच्या थंड वातावरणात उबदार वातावरण रेल्वे प्रवाशांना मिळणार आहे.

दिल्ली ते श्रीनगर असणार उबदार प्रवास

पहिली ट्रेन नवी दिल्ली ते श्रीनगर दरम्यान धावणार आहे. ही ट्रेन सुरु झाल्यामुळे जम्मू ते श्रीनगर जाण्यासाठी आता वेगळी ट्रेन बदलावी लागणार नाही. ही ट्रेन दिल्ली ते श्रीनगर हे अंतर 13 तासांत पूर्ण करणार आहे. ही ट्रेन 359 मीटर उंचे चेनाब पुलावरुन जाणार आहे. दुसरी ट्रेन आठ कोचची असणार आहे. ही ट्रेन टेअर कार सीटींगची असणार आहे. कटरा आणि बारामुल्ला दरम्यान ही रेल्वे धावणार आहे. करटा आणि बारामुल्ला हे 246 किलोमीटरचे आंतर ही रेल्वे केवळ दहा तासांत पूर्ण करणार आहे. त्यासाठी फक्त साडे तीन तास लागणार आहे. बसने हा प्रवास 10 तासांचा आहे.

सेंट्रली हिटेड स्लीपर ट्रेनमध्ये विशेष सुविधांचाही समावेश आहे. त्यात पाण्याच्या टाक्यांसाठी सिलिकॉन हिटिंग पॅड असणार आहे. त्यामुळे थंडीपासून संरक्षण होईल. या परिस्थितीत प्रवाशांना ट्रेनमध्ये गरम पाणी मिळणार आहे. या ट्रेनच्या टॉयलेटसाठी डक्ट खास डिझाईन करण्यात आला आहे. जेणेकरून त्यात गरम हवा येत राहते.

खिडक्यांवर बर्फ जमणार नाही

अधिकाऱ्याने सांगितले की, लोको पायलटसाठी पुढील काच खास एम्बेडेड हिटिंग एलिमेंटसह डिझाइन करण्यात आली आहे. भारतीय रेल्वेमध्ये पहिल्यांदाच या तंत्राचा वापर करण्यात आला आहे. तापमान शून्य अंशांच्या खाली गेले तरी समोरच्या काचेवर बर्फ तयार होणार नाही.