इंडिगो गोंधळानंतर 2 नव्या विमान कंपन्यांना सरकारची मंजूरी, त्यांचे मालक आणि इतिहास काय ?

केंद्र सरकारने साऊथच्या दोन कंपन्यांना एअरलाईन सुरु करण्याची मंजूरी दिली आहे. लवकरच कंपन्यांना डीजीसीएकडून एओसी देखील मिळणार आहे. ज्यानंतर इंडिगो एअरलाईन्सची मोनोपॉली संपणार आहे. चला तर पाहूयात अखेर या दोन कंपन्या कोणत्या आणि त्यांचे मालक कोण आहेत.

इंडिगो गोंधळानंतर 2 नव्या विमान कंपन्यांना सरकारची मंजूरी, त्यांचे मालक आणि इतिहास काय ?
new airline company
| Updated on: Dec 25, 2025 | 6:15 PM

केंद्र सरकारने इच्छुक एअरलाईन्सच्या सोबत अनेक बैठका घेतल्यानंतर भारतात नव्या एअरलाईन्सना ऑपरेशनना परवानगी दिली आहे. नागरिक उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी बुधवारी सांगितले की त्यांनी गेल्या आठवड्यात शंख एअर, अलहिंद एअर आणि फ्लाय एक्सप्रेसच्या टीमची भेट घेतली. ते पुढे म्हणाले की शंख एअरला आधीच एनओसी मिळाली आहे, तर अल हिंद एअर आणि फ्लाय एक्सप्रेसला या आठवड्यात एनओसी प्राप्त झाली आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात इंडिगोची 4,000 हून अधिक विमाने रद्द झाली आणि या क्षेत्रात अराजकता निर्माण झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

नायडू यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर लिहिले आहे की एका आठवड्यात भारतीय आकाशात उड्डाण भरु इच्छुक नवीन एअरलाईन्स – शंख एअर,अल हिंद एअर आणि फ्लाय एक्सप्रेसच्या टीमना भेट घेऊन आनंद झाला. शंख एअरला मंत्रालयाच्या आधीच एनओसी मिळाली आहे. जेव्हा अल हिंद एअर आणि फ्लाय एक्सप्रेसला याच आठवड्यात एनओसी प्राप्त झाली आहे. अलिकडेच ज्या दोन एअरलाईन्स अल हिंद एअर आणि फ्लाय एक्सप्रेसना एनओसी दिली गेली आहे. चला या संदर्भात विस्ताराने माहिती घेऊयात…

FlyExpress ची लॉजिस्टीक सर्व्हीसमध्ये स्पेशालिटी

FlyExpress ही भारतात अलिकडेच सुरु झालेली एक नवीन एअरलाईन आहे, जिला अलिकडेच नागरी उड्डाण मंत्रालयातून राष्ट्रीय मान्यता मिळालेली आहे. प्रतिस्पर्धा वाढवणे आणि विभिन्न क्षेत्रांशी चांगला संपर्क स्थापित करणे ज्यांचा उद्देश्य आहे,त्यात ही कंपनी आहे. हैदराबाद येथील ही कंपनी मुख्य रुपाने कुरिअर आणि कार्गो सर्व्हीसवर केंद्रीत आहे. ही कंपनी भारतात जगभरातील डेस्टीनेशन्सपर्यंत माफक दरात लॉजिस्टीक्स सर्व्हीस प्रोवाईड करते. FlyExpress डॉक्युमेंट्स, पार्सल, फूड प्रोडक्ट्स, औषधे, सामान, घरगुती साहित्य आणि इंडस्ट्रीयल प्रोडक्ट्स अमेरिका, ब्रिटन, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, कॅनडा, जर्मनी, दुबई आणि फ्रान्स सह अनेक देशात पोहचते.

कोण आहे कंपनीचा मालक ?

फ्लायएक्सप्रेसचे मुख्यालय हैदराबाद येथील बेगमपेट येथे असून तेच कोअर ऑपरेशनल सेंटरच्या रुपात कार्य करण्याची शक्यता आहे. सध्या फ्लायएक्सप्रेस तिच्या फूल ऑपरेशनल फेज स्थितीत आहे. एनओसी मिळाल्यानंतर एअरलाईनला निर्धारित कमर्शियल उड्डाणे सुरु करण्यासाठी आधी नागरिक उड्डयन महासंचालनालयाकडून (डीजीसीए) एअर ऑपरेटर सर्टीफिकीट्स (एओसी) प्राप्त करावी लागणार आहे. फ्लाय एक्सप्रेस कुरिअर एण्ड कार्गो कंपनी संदर्भात माहिती मर्यादित आहे. मीडियातील बातम्यानुसार याचे प्रमुख कोंकटी सुरेश आहेत. सध्या याची मालकी कॉर्पोरेट बॅकग्राऊंड, विमानांचा ताफा आणि मार्गां संदर्भात अधिक माहिती मिळालेली नाही. एअरलाईन्सच्या वेबसाईटवर सेवा लवकरच सुरु होतील अशी माहिती दिलेली आहे.

अलहिंद एअरचा मालक कोण ?

केरळ येथील अलहिंद एअरच्या मालकाचे नाव Mohammed Haris T आहे. अलहिंद लवकरच डोमेस्टीक आणि इंटरनॅशनल रुट्सवर एटीआर 72 विमानांचा उपयोग करण्याची योजना आखत आहे. अलहिंद ग्रुपचा कोअर बिझनस टुर एण्ड ट्रॅव्हल्स आहे.

टुर एण्ड ट्रॅव्हल्समध्ये अलहिंद ग्रुप देशातील मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे. कंपनीला एनओसी मिळाली आहे. आता लवकरच कंपनीला DGCA कडून तिचे एअर ऑपरेटर सर्टिफिकेट (AOC) मिळेल. कंपनी केरळातील कोच्ची स्थित कोचीन आंतरराष्ट्रीय एअरपोर्टवरुन आपले ऑपरेशन सुरु करेल. कंपनी सुरुवातीला डोमेस्टीक फ्लाईट्सवर आपले फोकस करणार आहे.त्यानंतर संयुक्त अरब अमिराती आणि सौदी अरब सारख्या इंटरनॅशनल डेस्टीनेशन्सपर्यंत विस्तार करणार आहे.