AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

व्हिएतनाममध्ये गरिब व्यक्तीही होईल श्रीमंत, भारतीय चलनाची ‘ही’ किंमत ऐकून तुम्ही व्हाल थक्क

भारताचे चलन डॉलरपेक्षा कमकुवत असले तरी भारतीय रुपया अनेक देशांमध्ये प्रभावी आहे. व्हिएतनाम हा अशा देशांपैकी एक आहे जिथे भारतीय चलन खूप मजबूत आहे. चला तर मग आजच्या लेखात याबद्दल जाणून घ्या.

व्हिएतनाममध्ये गरिब व्यक्तीही होईल श्रीमंत, भारतीय चलनाची 'ही' किंमत ऐकून तुम्ही व्हाल थक्क
currency-of-vietnamImage Credit source: Tv9 Network
| Edited By: | Updated on: Dec 25, 2025 | 6:30 PM
Share

बऱ्याचदा जेव्हा भारतीय रुपयांची चर्चा केली जाते तेव्हा त्याची तुलना अमेरिकन डॉलरशी केली होत असते. कारण भारतीय रूपयापैक्षा अमेरिकन डॉलर हा मजबूत आहे. पण जगभरातील काही देशांमध्ये भारतीय रुपया इतका मजबूत आहे की तिथे तुम्ही काही भारतीय रूपये घेऊन गेलात तर ती एक छोटीशी रक्कम लाखोंमध्ये बदलू शकते. आजच्या या लेखात आपण चलनाच्या तुलनेमध्ये व्हिएतनाम या देशाबद्दल बोलत आहोत. जिथे भारतीय रूपया खूप मजबूत आहे. आग्नेय आशियात स्थित असलेल्या व्हिएतनाम त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी जगभरात ओळखले जाते. भारतीयांसाठी हा देश मध्यमवर्गीयांसाठी स्वर्ग मानला जातो.

सध्याच्या विनिमय दरानुसार भारतीय रुपया व्हिएतनामी चलनापेक्षा लक्षणीयरीत्या मजबूत आहे. Vice.com च्या अहवालानुसार भारतातील 1 रुपयाची किंमत व्हिएतनाम मध्ये अंदाजे 293 व्हिएतनामी डोंग आहे. याचा अर्थ असा की जर तुम्ही भारतातून व्हिएतनाममध्ये 1 लाख रुपये नेले तर ते अंदाजे 29 लाख 41 हजार डोंगमध्ये रूपांतरित होते. हे आकडे आश्चर्यकारक वाटत असले तरी त्यामुळेच भारतीयांना या ठिकाणी काही गोष्टी स्वस्त वाटतात.

व्हिएतनामच्या चलनाबद्दल महत्वाचे तथ्य

व्हिएतनामचे अधिकृत चलन व्हिएतनामी डोंग आहे, ज्याला VND असेही म्हणतात. हे चलन स्टेट बँक ऑफ व्हिएतनामद्वारे जारी केले जाते. हे देशातील एकमेव कायदेशीर पैसे देण्याच माध्यम आहे. जरी अनेक ठिकाणी आणि हॉटेलमध्ये कधीकधी अमेरिकन डॉलर स्वीकारले जात असले तरी, स्थानिक बाजारपेठेत डोंग हे सर्वात जास्त वापरले जाणारे चलन आहे. हे लक्षात घेतले पाहिजे की डोंग हे 1978 पासून व्हिएतनामचे अधिकृत चलन आहे, जे फ्रेंच इंडोचायनीज पियास्ट्रेची जागा घेत आहे.

भारतीय रूपयांची किंमत डब्बल झाल्यावर करोडपतीसारखे असल्यासारखे वाटते का?

हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की फक्त मोठी चलन असल्याने माणूस श्रीमंत होत नाही. स्थानिक अर्थव्यवस्थेनुसार किंमती देखील निश्चित केल्या जातात, परंतु भारतीय रुपयाची ताकद भारतीयांसाठी व्हिएतनाममध्ये प्रवास करणे, राहणे आणि खरेदी करणे अत्यंत आरामदायक आणि परवडणारे बनवते.

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.