
इंदूरचा राजा रघुवंशी खून प्रकरणात मुख्य आरोपी पत्नी सोनम रघुवंशी आणि तिचा प्रियकर राजा याला अटक करण्यात आली. तेव्हापासून या प्रकरणात एका मागून एक खुलासे होत आहे. हा खून करणाऱ्या तीन सुपारी किलरला सुद्धा अटक करण्यात आली. पोलीस सूत्रानुसार, मेघालय येथील शिलाँगचा डोंगर चढताना सुपारी किलर्स थकले होते. त्यांनी राजाची हत्या करण्यास मनाई केली. पण त्याला ठार करा असे सोनम ओरडत होती. तिने त्यासाठी किलर्सला पैशांचे आमिष दाखवले. यापूर्वी खूनासाठी जी रक्कम ठरवली होती. त्यात तिने 40 पट वाढ केली.
पोलिसांच्या सूत्रांनुसार, 23 मे रोजी फोटोशूट करण्याच्या बहाण्याने सोनम ही राजाला एकदम निर्जन डोंगर रांगाकडे घेऊन गेली. चढताना ती मधातच थांबली. तिने राजाला पुढे पाठवले आणि त्याच्या मागोमाग तीनही सुपारी किलर्सला पाठवले. जेव्हा योग्य वेळ आली तेव्हा तिने ओरडून सांगितले की याला ठार करा. त्यानंतर आरोपी विशाल चौहान याने राजाच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार केला. तर या भागात दुसरा आरोपी आकाश राजपूत हा बाईकवर घडामोडींवर लक्ष ठेवत होता.
आरोपींनी सांगितला तो थरार
आरोपींनी पोलिसांना खूनाचा घटनाक्रम सांगितला. त्यानुसार ते डोंगरावर चढता चढता थकले होते. तेव्हा सोनमने त्यांना 20 लाख रुपये देणार असल्याचे सांगितले. तर त्याचवेळी तिच्याकडे असलेल्या राजच्या पाकिटातून तिने 15 हजार रुपये काढून त्यांना दिले. राजा याच्या खुनाची सुपारी 50 हजाराची होती. पण आरोपींनी खून करणार नसल्याचे सांगितल्यावर सोनमने लागलीच 20 लाख देणार पण राजाचा खून करा असे सांगितले.
राजाच्या अंत्यविधीतही राज
राजाच्या अंत्यविधीत आरोपी राज कुशवाह हा हजर होता. इतकेच नाही तर तो राजाचे सासरे देवी सिंह यांचे सांत्वन करत होता. त्याचा एक व्हिडिओ पण समोर आला आहे. या व्हिडिओत राज कुशवाह हा एकदम भावनिक दिसून येत आहे. तो देवी सिंह यांचे सांत्वन करताना दिसून येत आहे.