इंफोसिसची सुरुवात कशी झाली?, कोण्या बँकेतून मिळाले नव्हते मूर्ती यांना कर्ज

| Updated on: May 15, 2023 | 10:06 PM

इंफोसिसची सुरुवात करताना जे महत्त्व नारायण मूर्ती यांना आहे, तेवढेच महत्त्व सुधा मूर्ती यांनाही आहे. कारण त्यावेळी सुधा मूर्ती यांनी दहा हजार रुपये दिले नसते, तर इंफोसिसची सुरुवात झाली नसती.

इंफोसिसची सुरुवात कशी झाली?, कोण्या बँकेतून मिळाले नव्हते मूर्ती यांना कर्ज
Follow us on

मुंबई : इंफोसिस आणि कंपनीचे फाऊंडर नारायण मूर्ती यांना ओळखत नाही, असे फारच कमी लोकं आहेत. मोठ्या मेहनतीने त्यांनी सॉफ्टवेअर कंपनी सुरू केली. या कंपनीची सुरुवात कशी झाली, याची मजेदार स्टोरी आहे. या कंपनीला उभं करण्यासाठी कर्ज कोण्या बँकेकडून मिळाले नव्हते. एका अशा व्यक्तीने मदत केली ज्यांचा संबंध नारायण मूर्ती यांच्याशी आहे. नारायण मूर्ती यांना कंपनी उभी करण्यासाठी मदत करणारी व्यक्ती म्हणजे सुधा मूर्ती होय. सुधा मूर्ती यांनी नारायण मूर्ती यांना कंपनी उभी करण्यासाठी पैसे दिले. कपिल शर्मा यांच्या शोमध्ये देशासमोर ही स्टोरी सांगितली गेली.

पत्नी सुधा मूर्ती यांच्या कर्जाने इंफोसिसची सुरुवात

सुधा मूर्ती यांनी सांगितलं की, इंफोसिसची सुरुवात १९८१ मध्ये झाली. त्यावेळी ते मुंबईतील बांद्रा येथे किरायाच्या घरात राहत होते. एक दिवस नारायण मूर्ती घरी आले आणि त्यांनी सॉफ्टवेअऱ कंपनी सुरू करण्याबाबत चर्चा केली. पैसे कुठून येतील, हे सुधा मूर्ती यांनी त्यांना विचारलं. कारण ते मध्यमवर्गातून आले होते. सॉफ्टवेअर कंपनी सुरू करण्यासाठी लागणारी रक्कम मोठी होती. नारायण मूर्ती यांनी देशातील सॉफ्टवेअर रिव्हॅलुशनबद्दल सांगितलं.

दहा हजारांचे बिलीयन झाले

पुढील तीन वर्षे मी काही कमवू शकणार नाही. तुला माझी मदत करावी लागेल. कमाई करून मला सपोर्ट करावा लागेल. असं नारायण मूर्ती यांनी सुधा मूर्ती यांना सांगितलं होतं. एका डब्यात मूर्तीत १० हजार २५० रुपये लपवले होते. त्यापैकी १० हजार रुपये दिले. २५० रुपये इमर्जन्सीसाठी ठेवले. त्यावेळी जे दहा हजार होते ते आज बिलीयन झाले आहेत, असं सुधा मूर्ती यांनी सांगितलं.

अकाउंट आमच्या डीएनएमध्ये आहे

दहा हजार रुपये परत करण्यासंदर्भात विचारणा करण्यात आली. तेव्हा सर्वकाही तुमचंच असल्याचं नारायण मूर्ती यांनी म्हंटलं. लग्नापूर्वी आम्ही कुलकर्णी होतो. तेव्हा अकाउंट व्यवस्थित सांभाळत होतो. अकाउंट आमच्या डीएनएमध्ये आहे. सुधा मूर्ती यांना म्हटलं होत की, तुमचं तुमच्याजवळ ठेवा. मला माझं मी ठेवेन. त्या दहा हजार रुपयांचा हिशोब वेगळा आहे.

इंफोसिसची सुरुवात करताना जे महत्त्व नारायण मूर्ती यांना आहे, तेवढेच महत्त्व सुधा मूर्ती यांनाही आहे. कारण त्यावेळी सुधा मूर्ती यांनी दहा हजार रुपये दिले नसते, तर इंफोसिसची सुरुवात झाली नसती.