AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CJP आंदोलनामागे एलॉन मस्क? भाजपच्या बड्या नेत्याच्या दाव्याने एकच खळबळ

CJP -Elon Musk: आज दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीने तिरंगा मार्चचे आयोजन केले आहे. कनॉट भागातील सेंट्रल पार्कमध्ये हे आंदोलन होणार आहे. त्यापूर्वीच भाजपच्या एका बड्या नेत्याने या आंदोलनामागे एलॉन मस्क असल्याचा आरोप केला आहे.

CJP आंदोलनामागे एलॉन मस्क? भाजपच्या बड्या नेत्याच्या दाव्याने एकच खळबळ
सीजेपी आंदोलनामागे एलॉन मस्क? कुणाचा आरोप
| Updated on: Oct 16, 2026 | 1:12 PM
Share

CJP Ahijeet Dipke-Elon Musk: माजी खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांनी कॉकरोच जनता पार्टीवर मोठा आरोप केला आहे. आज दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीचे लहरा दो तिरंगा आंदोलन होत आहे. या मार्चपूर्वीच सिंह यांनी मोठा दावा केला आहे. सीजेपी आंदोलनामागे जगातील सर्वात मोठा श्रीमंत व्यक्ती आणि उद्योगपती एलॉन मस्क असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. बांग्लादेश, नेपाळ, श्रीलंकेप्रमाणेच भारतात अराजकता पसरवण्यासाठी हा खेळ सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. ही आंदोलनं मोठे षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला.

लहरा दो तिरंगा मार्चवर भडकले बृजभूषण

माजी खासदारांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी सीजेपीवर तिखट प्रतिक्रिया दिली. दिल्लीतील आंदोलनं ही मस्क यांच्या इशाऱ्यावरून होत असल्याचा आरोप त्यांनी केला. अमेरिकेतील उद्योगपती एलॉन मस्क आहे, त्यांच्याच इशाऱ्यावरून देशात ही आंदोलने होत आहेत. आपल्या देशाविरोधात एक मोठे षडयंत्र सुरू आहे. आता भारताची तुलना बांगलादेशाशी आणि पाकिस्तानशी होऊ लागली आहे. हा मोठा धोका असल्याचे ते म्हणाले.

या देशात सर्वोच्च न्यायालयाला धमकावण्यासाठी इतिहासातील पहिला मोर्चा निघाला. यापूर्वी असे कधीच घडले नाही. हे जे परदेशी नागरीक आहेत, त्यांना त्यांच्याच अटी आणि शर्तींवर आपल्या देशात व्यवसाय करायचा आहे. येथील सरकारने त्यांना विरोध केल्यावर ते इथल्या आंदोलनाला रसद पुरवत आहेत. ते या आंदोलनाला हवा देत आहेत, असा आरोप बृजभूषण शरण सिंह यांनी केला. अर्थात या आरोपांना त्यांनी कुठलाही पुरावा दिला नाही. पण ही आंदोलने परदेशी शक्तींकडून करण्यात येत असल्याचे आणि यामागे एलॉन मस्क असल्याचा आरोप त्यांनी केला.

लहरा दो तिरंगा मार्च

सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी आज 16 ऑक्टोबर रोजी दिल्लीतील कनॉट प्लेसमध्ये लहरा दो तिरंगा मार्चची घोषणा केली आहे. सेंट्रल पार्कमध्ये हे आंदोलन होणार आहे. आम आदमी पक्षाने या आंदोलनाला समर्थन दिले आहे. या आंदोलनात डाव्या पक्षांच्या विद्यार्थी संघटना (AISA आणि SFI) सहभागी होतील. आज संध्याकाळी 5 वाजता सेंट्रल पार्कमध्ये राष्ट्रीय ध्वज हातात घेऊन या रॅली, मार्च, आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन दिपके यांनी केले आहे.

या आंदोलनात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरात तब्बल 27 हजार सुरक्षा रक्षकांचा गरडा असेल. तर संपूर्ण परिसरात कलम 163 (यापूर्वीचे कलम 144) लागू करण्यात आले आहे. दिल्ली पोलिस आणि केंद्रीय निमलष्करी दलाचे, त्यात CRPF, RAF यांच्यासमावेशासह 27 हजार जवान तैनात करण्यात आली आहेत. चौका चौकात पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे.दिल्लीतील अनेक भागात कलम 163 लागू केले आहे. त्यानुसार, 5 अथवा त्यापैक्षा अधिक लोकांच्या एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

Follow Us
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र.....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे....
मटका व्यावसायिकाला VIP दर्शन घडवलं; तुळजाभवानी मंदिराच्या व्यवस्था....
Tuljabhavani Temple : मटका व्यावसायिकाला VIP दर्शन घडवलं; तुळजाभवानी मंदिराच्या धार्मिक व्यवस्थापकावर थेट....
कुणाल कामरा याच्या त्या पोस्टनंतर पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता
Kunal Kamra : कुणाल कामरा याच्या त्या पोस्टनंतर पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता
सुप्रीम कोर्टाची माफी मागतो, पण आम्हाला न्याय हवा, संजय राऊत....
Sanjay Raut : सुप्रीम कोर्टाची माफी मागतो, पण आम्हाला न्याय हवा, संजय राऊत स्पष्टच म्हणाले....
धाराशिवमध्ये FDA चा दणका; 15 दिवसांत सहा हॉटेल्सचे परवाने निलंबित
Dharashiv FDA Action : धाराशिवमध्ये FDA चा दणका; 15 दिवसांत सहा हॉटेल्सचे परवाने निलंबित
महायुतीत तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेटचा प्रयत्न; पडद्यामागे काय?
Mahayuti : महायुतीत तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेटचा प्रयत्न; पडद्यामागे काय घडतंय?
10 कोटींची सुपारी फक्त कागदोपत्रीच नष्ट; त्या नेत्याने दिली माहिती....
FDA : 10 कोटींची सुपारी फक्त कागदोपत्रीच नष्ट; त्या नेत्याने दिली माहिती, FDA च्या पाच अधिकाऱ्यांवर थेट...
आज मुंबईच्या आझाद मैदानात सीजेपीचं लहरा दो तिरंगा आंदोलन...
CJP Protest : आज मुंबईच्या आझाद मैदानात सीजेपीचं लहरा दो तिरंगा आंदोलन...
डोंगराळे प्रकरणी आरोपीला फाशी की जन्मठेप? आज होणार निर्णय...
Malegaon Case | डोंगराळे प्रकरणी आरोपीला फाशी की जन्मठेप? आज होणार निर्णय...
फडणवीस बोलले, महायुती म्हणून एकत्र लढू; शिंदेंचा मात्र अपक्षाला खुला..
Mahayuti : फडणवीस बोलले, महायुती म्हणून एकत्र लढू; शिंदेंचा मात्र अपक्षाला खुला पाठिंबा, नेमकं प्रकरण काय?