
मध्य पूर्वेत अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धाचा आज 14 दिवस असून, मध्य पूर्वेत मोठा तणाव पहायला मिळत आहे. एकीकडे इस्रायल आणि अमेरिकेकडून इराणवर सुरू असलेल्या हल्ल्यांमुळे इराणचं प्रचंड नुकसान झालं आहे. मात्र दुसरीकडे इराणकडून देखील तेवढ्याच ताकदीने अमेरिका आणि इस्त्रालयवर हल्ले केले जात आहेत. इराणच्या हल्ल्यांमध्ये इस्त्रायलचं मोठं नुकसान झालं आहे, तर या युद्धात अमेरिकेचे देखील अनेक सौनिक मारले गेले आहेत. इराणने शुक्रवारी अमेरिकेचं चौथ विमान पाडलं आहे. या युद्धामध्ये अमेरिकेनं आतापर्यंत प्रचंड प्रमाणात पैसा खर्च केला आहे. हे युद्ध आपण व्हेनेझुएला आणि इराक प्रमाणे काही दिवसांमध्ये संपून टाकू असा अमेरिकेचा अंदाज होता. मात्र अमेरिकेचा हा अंदाज पूर्णपणे चुकल्याचं दिसून येत आहे.
दरम्यान दुसरीकडे मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे काही दिवसांपूर्वी इराणने आपला नवा सर्वोच्च नेता निवडताच रशियानं इराणला संपूर्ण पाठिंबा जाहीर केला होता. तसेच यावेळी रशियाकडून हे आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन असल्याचं म्हणत अमेरिका आणि इस्त्रायलला सुनावण्यात आलं होतं. रशियाच्या या पावलावर पाऊल ठेवून आता चीनने मोठा निर्णय घेतला आहे. युद्धात होरपळलेल्या इराणच्या मदतीसाठी तब्बल 2 लाख डॉलरची मदत देण्याची घोषणा चीनकडून करण्यात आली आहे, याबाबत चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून माहिती देण्यात आली आहे. दरम्यान चीनकडून जर इराणला रसर पुरवठा सुरूच राहिला तर हे युद्ध आणखी काही दिवस सुरूच राहण्याची चिन्ह आहेत.
या युद्धामध्ये इराणचं प्रचंड नुकसान झालं आहे. त्यामुळे मानवतेच्या दृष्टीकोणातून आम्ही इराणला दोन लाख डॉलरची मदत करणार आहोत, या मदतीमुळे यु्द्धात होरपळत असलेल्या इराणच्या नागरिकांना दिलासा मिळू शकेल असं चीनने म्हटलं आहे. एवढंच नाही तर इराणला आवश्यक असणारी मदत सुरूच राहणार असल्याचं देखील चीनने म्हटलं आहे. दरम्यान चीनच्या या निर्णयामुळे आता अमेरिकेचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. चीन आणि रशियाकडून इराणला पाठिंबा मिळत आहे. दुसरीकडे होर्मुजची सामुद्रधुनी इराणने बंद केल्यामुळे जगभरात प्रचंड प्रमाणात इंधन तुटवडा निर्माण झाला आहे, त्याचा मोठा फटका हा भारताला देखील बसला आहे.