Israel-Hamas War | हमासविरोधात भारतातील संतांनी ठोकले दंड, इस्त्राईलकडे केली ही मागणी

| Updated on: Oct 13, 2023 | 5:03 PM

Israel-Hamas War | हमासविरोधात आणि पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ अनेक जण सोशल मीडियावर, रस्त्यावर उतरले आहेत. केंद्र सरकारने इस्त्राईलची पाठराखण केली आहे. आता भारतातील काही साधूसंतांनी हमासविरोधात दंड थोपाटले आहे. जवळपास एक हजार साधूंनी इस्त्राईलकडे हे साकडे घातले आहे.

Israel-Hamas War | हमासविरोधात भारतातील संतांनी ठोकले दंड, इस्त्राईलकडे केली ही मागणी
Follow us on

नवी दिल्ली | 13 ऑक्टोबर 2023 : हमास-इस्त्राईल यांच्यामधील लढाई निर्णायक स्थितीकडे सरकत आहे. इस्त्राईलने हमासची मोठी कोंडी केली आहे. गाझा पट्टीत नाकाबंदी केली आहे. त्यामुळे या भागात वीज, पिण्याच्या पाण्याचे संकट उभं ठाकले आहे. ही लढाई व्यापक पण होताना दिसत आहे. अमेरिका, ब्रिटनसह इतर देशांनी इस्त्राईलला युद्ध नौका, क्षेपणास्त्रे आणि इतर दारुगोळ्याचा पुरवठा केला आहे. तर अरब राष्ट्रांनी पॅलेस्टाईन आर्थिक रसद पुरवण्यास सुरुवात केली आहे. लवकर युद्ध थांबवा नाहीतर इतर आघाड्या हल्ला करतील असा इशारा इराणने इस्त्राईलला दिला आहे. या घाडमोडीत भारतीय साधूसंतांनी हमासविरोधात दंड थोपाटले आहेत.

इस्त्राईलला घातले साकडे

इस्त्राईल आणि हमास युद्धात भारतातील एक हजार साधूसंतांनी इस्त्राईलला साकडे घातले आहे. गाजियाबाद येथील डासना देवी मंदिराचे महंत आणि महामंडलेश्वर यति नरसिम्हानंद यांनी हमासविरोधात लढण्याची तयारी दाखवली आहे. 1000 संत इस्त्राईलच्या बाजूने हमासविरोधात लढण्याच्या तयारीत असल्याचे निवेदन ते इस्त्राईलच्या परराष्ट्र मंत्रालयाला देणार आहेत. या युद्धात सहभागी होण्यासाठी इस्त्राईलकडे परवानगी मागण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा

दहशतवाद्यांविरोधात एकत्र

सर्व दहशतवादी संघटना इस्त्राईलविरोधात एकत्र येत असतील तर इस्त्राईलच्या बाजूने लढण्यासाठी पण तयार असायला हवे, असे मत या साधू संतांनी मांडले. सध्या इस्त्राईलने हमासला जेरीस आणले आहे. गाझा पट्टीतील हमासच्या ठिकाण्यावर जबरदस्त हल्ले सुरु आहेत. त्यात अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. इमारतींचे ढिगारेच या ठिकाणी दिसत आहेत. आता इस्त्राईलच्या सैनिकांसोबत हमास विरोधात लढण्यासाठी साधूसंतांनी परवानगी मागितली आहे. सोमवारी हे साधूसंत दिल्लीतील इस्त्राईलच्या दुतावासाला भेट देणार आहे.

इस्त्राईलला घातले साकडे


या साधूसंतांनी इस्त्राईलच्या परराष्ट्र मंत्रालयाला साकडे घातले आहे. जगभरात अशांतता माजविणारे दहशतवादी हे मानवतेचे शत्रू आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात सर्वांनी एकत्र लढणे आवश्यक असल्याचे पीठाधीश्वर यति नरसिम्हानंद यांनी सांगितले. या लढाईत ज्यांना हमासविरोधात लढायचे आहे, त्यांनी एकत्र येण्याची मागणी त्यांनी केली. इस्त्राईल हिंदूच्या धार्मिक श्रद्धा आणि मान्यतांसह त्यांना या लढाईत सहभागी करुन घेण्यास तयार असेल तर हमासविरोधातील लढाईत उतरण्याची तयारी या साधू संतांनी केली आहे.