SSLV : इस्त्रोच्या नव्या प्रक्षेपकाचे-रॉकेटचे लॉन्चिंग यशस्वी, पण उपग्रहांशी संपर्क तुटला

PSLV म्हणजेच ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन हे 44 मीटर लांब आणि 2.8 मीटर व्यासाचे रॉकेट आहे. तर, SSLV ची लांबी 34 मीटर आहे. त्याचा व्यास 2 मीटर आहे.

SSLV : इस्त्रोच्या नव्या प्रक्षेपकाचे-रॉकेटचे लॉन्चिंग यशस्वी, पण उपग्रहांशी संपर्क तुटला
इस्त्रोच्या नव्या प्रक्षेपकाचे-रॉकेटचे लॉन्चिंग यशस्वी, पण उपग्रहांशी संपर्क तुटला
Image Credit source: twitter
| Updated on: Aug 07, 2022 | 11:28 AM

नवी दिल्ली – भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) आज देशाचे नवीन रॉकेट प्रक्षेपित केले. आंध्र प्रदेशातील (Andra Pradesh)श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरच्या लॉन्च पॅड 1 वरून हे प्रक्षेपण यशस्वीरित्या पार पडले. EOS02 आणि AzaadiSAT उपग्रह स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल (SSLV) मध्ये पाठवण्यात आले आहेत. प्रक्षेपण यशस्वी झाले. रॉकेटने व्यवस्थित काम करत दोन्ही उपग्रहांना त्यांच्या नेमलेल्या कक्षेत आणले. रॉकेट फुटले. मात्र त्यानंतर उपग्रहांचा संपर्क तुटल्याची माहिती मिळाली आहे.

इस्रो मिशन कंट्रोल सेंटर डेटा लिंक मिळवण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे

इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ म्हणाले की, इस्रो मिशन कंट्रोल सेंटर डेटा लिंक मिळवण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे. लिंक स्थापित होताच आम्ही देशाला कळवू. EOS02 हा पृथ्वी निरीक्षण उपग्रह आहे. जे 10 महिने अंतराळात काम करेल. त्याचे वजन 142 किलो आहे. यात मध्यम आणि लांब तरंगलांबीचा इन्फ्रारेड कॅमेरा आहे. ज्याचे रेझोल्यूशन 6 मीटर आहे. म्हणजेच रात्रीच्या वेळीही ते निरीक्षण करू शकते. AzaadiSAT Satellites हा SpaceKidz India नावाच्या स्वदेशी खाजगी अवकाश संस्थेचा विद्यार्थी उपग्रह आहे. हा उपग्रह देशातील 750 मुलींनी मिळून बनवला आहे.

ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन हे 44 मीटर लांब

PSLV म्हणजेच ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन हे 44 मीटर लांब आणि 2.8 मीटर व्यासाचे रॉकेट आहे. तर, SSLV ची लांबी 34 मीटर आहे. त्याचा व्यास 2 मीटर आहे. PSLV चे चार टप्पे आहेत. तर SSLV चे फक्त तीन टप्पे आहेत. PSLV चे वजन 320 टन आहे, तर SSLV चे वजन 120 टन आहे. PSLV 1750 किलो वजनाचा पेलोड 600 किमी अंतरापर्यंत वाहून नेऊ शकतो. SSLV 500 किमी अंतरासाठी 10 ते 500 किलो वजनाचे पेलोड वाहून नेऊ शकते. PSLV 60 दिवसांत तयार होईल. स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल अवघ्या 72 तासांत तयार होते.