अभिजीत दिपके यांच्याकडून थेट हनुमान चालिसाचा अपमान, प्रश्न विचारताच भडका..

अभिजीत दिपके अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. त्यांनी थेट हनुमान चालीसा मोदी वाजवली. हिंदु धर्माचा अपमान अभिजीत दिपके यांच्याकडून करण्यात आल्याचा आरोप होत आहे. अभिजीत दिपके यांनी हिंदु धर्माच्या लोकांच्या भावना दुखावल्याचे सांगितले जात आहे.

अभिजीत दिपके यांच्याकडून थेट हनुमान चालिसाचा अपमान, प्रश्न विचारताच भडका..
Abhijeet Dipke
| Updated on: Nov 26, 2026 | 9:35 AM

कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांच्या एका विधानाने मोठी खळबळ उडाली. थेट त्यांनी हनुमान चालिसाचा मजाक उडवला, ज्यामुळे त्यांच्यावर आता जोरदार टीका केली जात आहे. अभिजीत दिपके यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. बुधवारी अभिजीत दिपके यांनी एक पत्रकार परिषद बोलावले. या पत्रकार परिषदेची सुरूवात त्यांनी थेट एका गाण्याने केली. हे गाणे मोदी चालीसा… होते. या गाण्यानंतर अभिजीत दिपके यांनी मोदींचा नाही तर हनुमान चालिसाचा अपमान केल्याचा आरोप केला जात आहे. मात्र, याबाबत विचारले असता अभिजीत दिपके चांगलेच भडकले. अभिजीत दिपके यांनी आरोप करत म्हटले की, सोशल मीडियावर फक्त नरेंद्र मोदी यांनाच प्रमोट केले जाते. दिपकेंनी आरोप केला की, इंस्टाग्रामवरील 50 लाख पोस्ट काढण्यात आल्या.पंतप्रधान नरेंद्र मोदी सोडले तर इतर विरोधातील नेत्यांच्या पोस्ट सोशल मीडियावर मेटाकडून काढल्या जात आहेत.

मेटावर दबाव आहे. यावरच पुढे बोलताना अभिजीत दिपके यांनी म्हटले की, इंस्टाग्राम आणि मेटावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोदी चालीसा ठेवण्यात आली. ज्यावेळी अभिजीत दिपके यांच्याकडून हे आरोप केले जात होते, त्यावेळी आशुतोष रांका देखील उपस्थित होते. अभिजीत दिपकेने मोदी चालीसा म्हणत थेट हिंदु धर्माच्या भावनांना ठेच पोहोचवल्याचा आरोप आहे.

Loading...

अभिजीत दिपके यांनी म्हटले की, ज्या गायकाने हे गाणे म्हटले, त्याचा तात्काळ अटक करा. त्याने हे गाणे कसे बनवले. त्याला तात्काळ जेलमध्ये टाका. हेच नाही तर पुढे अभिजीत दिपके यांनी म्हटले की, भाजपाच्या सोशल मीडियावर कारवाई करा. कारण हे गाणे आम्ही तिथूनच उचलले आहे. यापूर्वीही सीजेपीवर सनातन धर्माचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला.

त्यातच आता या गाण्यामुळे मोठा वाद पेटला आहे. सीजेपीच्या दिल्लीतील आंदोलनावेळी थेट सीता के पती अशा घोषणा देण्यात आल्या होत्या, त्यावरून मोठा वाद सुरू झाला होता. अभिजीत दिपके या गाण्यामुळे वादात सापडण्याची शक्यता आहे. थेट हनुमान चालिसाचा अपमान केल्याचा आरोप लावला जात आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us