Jammu Kashmir: मोठी बातमी! भारतीय लष्कराच्या छावणीत स्फोट, 1 जवान शहीद, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर

जम्मू आणि काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यातून मोठी बातमी समोर आली आहे. सुनारकोट येथील 16 व्या राष्ट्रीय रायफल्स (आरआर) च्या मुख्यालयात संध्याकाळी 7.45 वाजता ग्रेनेडचा स्फोट झाला. या स्फोटात एक जवान शहीद झाला आहे.

Jammu Kashmir: मोठी बातमी! भारतीय लष्कराच्या छावणीत स्फोट, 1 जवान शहीद, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर
Blast
| Updated on: Sep 29, 2025 | 10:40 PM

जम्मू आणि काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यातून मोठी बातमी समोर आली आहे. सुनारकोट येथील 16 व्या राष्ट्रीय रायफल्स (आरआर) च्या मुख्यालयात संध्याकाळी 7.45 वाजता ग्रेनेडचा स्फोट झाला. या स्फोटात एक जवान शहीद झाला आहे. 18 मेकॅनिकलचे शिपाई भावेश चौधरी असे शहीद झालेल्या जवानाचे नाव आहे. या घटनेनंतर परिसरात घबराट पसरली, त्यानंतर सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला असल्याचे समोर आले आहे.

सुनारकोट येथील छावणीत झालेला हा स्फोट दहशतवाद्यांनी घडवला की अपघात होता हे अद्याप समोर आलेले नाही. सध्या सुनारकोटमध्ये जम्मू आणि काश्मीर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असून या स्फोटाच्या तपासाला सुरूवात करण्यात आली आहे. या स्फोटात एक जवान शहीद झाला आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांना अलर्ट जारी करण्यात आला आहे, तसेच या प्रकरणाची चौकशीला सुरुवात झाली आहे.

स्फोटाबद्दल लष्कराने काय म्हटले?

या स्फोटाबद्दल बोलताना लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले की, ‘स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे. ही घटना दहशतवादाशी संबंधित असल्याचे दिसत नाही. त्यामुळे या घटनेची चौकशी झाल्यानंतर सविस्तर माहिती दिली जाईल.

पूंछ हे दहशतवाद्यांच्या घुसखोरीसाठी प्रसिद्ध

पूंछ हा परिसर दहशतवाद्यांच्या घुसखोरीसाठी ओळखले जाते. हा भाग नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) आहे. या भागातून बऱ्याचदा पाकिस्तानी दहशतवादी भारतात प्रवेश करतात आणि दहशतवादी कारवाया करतात. त्यामुळे या भागातील स्थानिक लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दहशतवादी कारवायांना आळा घालण्यासाठी या भागात वाहतूक आणि हालचालींवर कडक निर्बंध लादण्यात आलेले आहेत.

पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला

एप्रिलमध्ये दहशतवाद्यांनी पहलगाम येथे पर्यटकांवर हल्ला केला होता. यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. यामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढला होता. दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ल्याचा प्रयत्न केला होता. मात्र काही दिवसांनी दोन्ही देशांमध्ये युद्धबंदीचा निर्णय झाला होता. तसेच भारताविरोधातील दहशतवाद्या कारवायांना पाठिंबा दिल्यामुळे पाकिस्तानसोबत असलेला सिंधू जल करार स्थगित केला होता.