Corona Caller Tune | ‘याद रहे हमें बीमारी से लड़ना है, बीमार से नहीं..’ म्हणणाऱ्या जसलीन भल्लांचा आवाज पुन्हा ऐकू येणार!

| Updated on: Jan 15, 2021 | 1:23 PM

भारतात कोरोना लसीकरण 16 जानेवारीपासून सुरु करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता महानायक अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील कॉलर ट्यून बदलली जाणार आहे.

Corona Caller Tune | ‘याद रहे हमें बीमारी से लड़ना है, बीमार से नहीं..’ म्हणणाऱ्या जसलीन भल्लांचा आवाज पुन्हा ऐकू येणार!
Follow us on

मुंबई : जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम लवकरच सुरू होणार आहे. भारतात कोरोना लसीकरण 16 जानेवारीपासून सुरु करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता महानायक अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील कॉलर ट्यून बदलली जाणार आहे. या आधी कोणत्याही व्यक्तीला कॉल केला की कोरोना प्रतिबंधात्मक उपाय सांगणाऱ्या अमिताभ बच्चन यांचा आवाज ऐकू यायचा. आता ही कॉलर ट्यून बदलण्यात आली आहे. पुन्हा एकादा जुना आवाज अर्थात जसलीन भल्ला यांचा आवाज ऐकू येणार आहे (Jasleen Bhalla new Caller Tune on corona vaccination).

जसलीन भल्ला यांनी नुकताच नवीन कॉलरट्यूनला आवाज दिला आहे. ‘महानायक’ अमिताभ बच्चन गेल्या काही महिन्यांपासून कॉलर ट्यूनच्या माध्यमातून कोरोनापासून बचाव आणि सावधगिरी बाळगण्याविषयी लोकांना इशारा देत होते. मात्र आता कोरोना लसीकरणाविषयी माहिती दिली जाणार आहे.

पुन्हा ऐकू येणार जसलीन यांचा आवाज!

गेल्या वर्षी मार्च-एप्रिलमध्ये कोरोना विषाणूमुळे लादलेल्या लॉकडाऊन दरम्यान जसलीन भल्ला अचानक चर्चेत आल्या होता. त्यावेळी संपूर्ण देशात डीफॉल्ट कॉलरट्यून म्हणून जसलीनच्या आवाजात ‘’कोरोना वायरस या कोविड-19 से आज पूरा देश लड़ रहा है. मगर, याद रहे हमें बीमारी से लड़ना है, बीमार से नहीं. उनसे भेदभाव न करें…’  हा संदेश ऐकू येत होता. आता पुन्हा एकदा त्यांचा आवाज देशभरात ऐकू येणार आहे (Jasleen Bhalla new Caller Tune on corona vaccination).

सुप्रसिद्ध व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट जसलीन

जसलीन भल्ला या एक सुप्रसिद्ध व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट आहेत. गेल्या दशकभरापासून व्हॉईस ओव्हर कलाकार म्हणून काम करणाऱ्या जसलीनने दिल्ली मेट्रो, स्पाइस जेट आणि इंडिगो यांनाही आपला आवाज दिला आहे. जसलीन भल्ला व्हॉईस ओव्हर कलाकार होण्यापूर्वी एका चॅनेलमध्ये स्पोर्ट्स पत्रकार म्हणून कार्यरत होत्या. परंतु, गेल्या 10 वर्षांपासून त्या केवळ व्हॉईस-ओव्हर आर्टिस्ट म्हणून काम करत आहे.

कोरोना कॉलरट्यूनची कथा

जसलीन यांच्या आवाजातील कॉलरट्यून मागे एक मनोरंजक किस्सा देखील आहे. एका वृत्तवाहिनीशी झालेल्या संभाषणादरम्यान जसलीन म्हणाल्या की, एक दिवस आपला आवाज संपूर्ण देश ऐकेल याची त्यांना कल्पनाही नव्हती. जसलीन भल्ला म्हणाल्या, ‘एक दिवस अचानक मला हा मेसेज रेकॉर्ड करण्यास सांगितले गेले. मी तो रेकॉर्ड केला, परंतु त्याचा वापर कुठे होणार याबद्दल मला काहीही माहित नव्हते. मग अचानक एक दिवस मला मित्र आणि नातेवाईक यांचे कॉल येऊ लागले, त्यांनी मला याबद्दल सांगितले’.

(Jasleen Bhalla new Caller Tune on corona vaccination)

हेही वाचा :