माजी खासदाराची Love Story राजकारणात बनली चर्चेचा विषय, दोघांच्या वयात 23 वर्षांच अंतर, कोण आहे नीरजा? आईने मुलाला दारावरच अडवलं

मानवेंद्र सिंह यांचा मुलगा हमीर सिंहने एक नोटीस काढली आहे. या नोटिसमध्ये त्याने वडिलांचं नाव घेतलं आहे. कुटुंबाला त्यांचे कुठल्याही बाहेरच्या महिलेसोबतचे संबंध मान्य नसल्याचं म्हटलं आहे.

माजी खासदाराची Love Story राजकारणात बनली चर्चेचा विषय, दोघांच्या वयात 23 वर्षांच अंतर, कोण आहे नीरजा? आईने मुलाला दारावरच अडवलं
manvendra singh jasol-neerja singh charan
| Updated on: Mar 17, 2026 | 1:33 PM

माजी खासदार मानवेंद्र सिंह जसोल आणि नीरजा सिंह चारण यांची जवळीक राजकीय वर्तुळापासून समाज जीवनात चर्चेचा विषय बनली आहे. जोधपूरच्या एका जीप शोरुममध्ये दोघांची पहिली भेट झाली. सर्विसिंगच्या निमित्ताने दोघांनी पहिल्यांदा एकमेकांना पाहिलं. त्यानंतर सुरु झालेल्या या कथेने आता वादाचं रुप धारण केलय. यात कुटुंब, परंपरा आणि खासगी निर्णय यावरुन वादविवाद सुरु आहेत. हे प्रकरण माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह जसोल यांचा मुलगा आणि माजी खासदार मानवेंद्र सिंह जसोल यांच्याशी संबंधित आहे. वयाच्या 60 व्या वर्षी मानवेंद्र सिंह जसोल यांचं नाव नीरजा सिंह चारण सोबत जोडलं जातय. त्यांच्या खासगी आयुष्यात वादळ आलय. या सगळ्या घटनाक्रमाने कुटुंब आणि परंपरांना आमने-सामने आणलय.

37 वर्षाची नीरजा चारण राजस्थानच्या पाली जिल्ह्यातील खीनामडी गावची राहणारी आहे. ती जोधपूरच्या एका लग्जरी कार जीपच्या शोरुममध्ये जनरल मॅनेजर म्हणून नोकरी करायची. असं म्हटलं जातं की, मानवेंद्र सिंह आणि नीराजा यांची पहिली भेट इथेच कार सर्विसिंगच्यावेळी झाली. सुरुवातीला दोघांमध्ये व्यावसायिक ओळख होती. पण वेळेबरोबर ओळख मैत्रीमध्ये बदलली. चर्चा अशी सुद्धा आहे की, पत्नी चित्रा सिंहच्या निधनानंतर मानवेंद्र सिंह यांच्यासाठी एक कठिण मानसिक, भावनात्मक काळ होता. त्यावेळी नीरजा त्यांच्या जवळ आली. त्यांना आधार दिला.

हॅप्पी बर्थ डे नीरजा

या नात्याबद्दल कुठली अधिकृत पुष्टि झालेली नाही. पण सोशल मीडियावर समोर आलेल्या काही फोटोंमधून चर्चांचा बाजार गरम आहे. जोधपूरच्या एका हॉटेलमध्ये पार्टी झाली. त्या फोटोंमध्ये मानवेंद्र आणि नीरजा परस्परांच्या गळ्यात माळा घालून दिसत आहेत. केकवर हॅप्पी बर्थ डे नीरजा लिहिलेलं आहे. त्याशिवाय नीरजाच्या एका मैत्रिणीने इन्स्टाग्रामवर हॅप्पी 3 मंथ गाइस लिहून एक स्टोरी शेअर केलीय. त्यामुळे दोघांनी लग्न केल्याची चर्चा आहे.

आई घराच्या दरवाजावर उभी राहिली

एका नात्यात भावूक करणारा क्षण तेव्हा आला, जेव्हा मानवेंद्र सिंह यांच्या 90 वर्षीय आईने शीतल कंवर यांनी या नात्याला जाहीरपणे विरोध केला. सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओमध्ये त्या आपल्या घराच्या दरवाजावर उभ्या दिसतात. पोलिसांसोबत आलेल्या मानवेंद्र यांना घरात प्रवेश करण्यापासून रोखतात. कुटुंबाच्या परंपरांचं रक्षण करणाऱ्या शीतल कंवर यांनी स्पष्ट शब्दात हे नातं मान्य नसल्याचं सांगितलं.

 

Follow Us