मी केली ती राजनिती, मग प्रियंका चोप्रा आणि दिलजीत दोसांझची कोणती निती? : कंगना रनौत

"शाहीन बागची आजी जी वाचू-लिहू शकत नाही ती आपल्या नागरिकतासाठी आंदोलन करते. पंजाबची एक आजी मला घाणेरड्या शिव्या देत आहे", असं कंगना म्हणाली (Kangana Ranaut slams Diljit Dosanjh and Priyanka Chopra).

मी केली ती राजनिती, मग प्रियंका चोप्रा आणि दिलजीत दोसांझची कोणती निती? : कंगना रनौत
| Updated on: Dec 19, 2020 | 5:46 PM

मुंबई : अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह असते. ती सोशल मीडियावर देशात घडणाऱ्या घडामोडींवर व्यक्त होत असते. दिल्ली सीमेवर गेल्या पंधरा ते वीस दिवसापांसून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनावर कंगना रनौतने टीका केली. कंगनाने याआधी ट्विटरवर अनेक बॉलिवूड कलाकारांवर निशाणा साधला. यावेळीदेखील तिने ट्विटरवर व्हिडीओ शेअर करत गायक दिलजीत दोसांझ आणि अभिनेत्री प्रियंका चोप्रा यांच्यावर टीका केली. त्याचबरोबर आपल्याला जीवे मारण्याची धमकीदेखील येत असल्याची माहिती तिने दिली (Kangana Ranaut slams Diljit Dosanjh and Priyanka Chopra).

कंगना नेमकं काय म्हणाली?

“नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला वचन दिलं होतं की, जेव्हा शेतकरी आंदोलनाचा भांडाफोड होईल, जसं शाहीनबाग आंदोलनाचा झाला होता, तेव्हा मी तुमच्याशी बात करेल. कारण गेल्या 10 ते 12 दिवसात मला फिजिकल, मेंटल आणि ऑनलाईन लिंचिंगचा सामना करावा लागला. मला बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्यामुळे देशाला प्रश्न विचारावा हा माझा हक्क आहे”, असं कंगना म्हणाली (Kangana Ranaut slams Diljit Dosanjh and Priyanka Chopra).

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्याच शंकेला जागा सोडलेली नाही. त्यामुळे शेतकरी आंदोलन हे राजकीय उद्देशानेच सुरु आहे. या आंदोलनात अतिरेकी देखील सहभागी होऊ लागले आहेत. मी पंजाबमध्ये लहानाची मोठी झाली. पंजाबच्या 99 टक्के नागरिकांना खलिस्तान नकोय. त्यांना देशाचा फक्त एक तुकडा नकोय. त्यांना पूर्ण देश हवा आहे. हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश, महाराष्ट्र सर्व त्यांचं आहे. ते सर्वच देशप्रेमी आहेत”, असा दावा कंगनाने केला.

“माझी अतिरेक्यांबाबत तक्रार नाही. मला त्या लोकांना सवाल करायचा आहे ज्यांना देश तोडायचा आहे. निष्पाप लोक या लोकांमध्ये वाहत जातात. शाहीन बागची आजी जी वाचू-लिहू शकत नाही ती आपल्या नागरिकत्वसाठी आंदोलन करते. पंजाबची एक आजी मला घाणेरड्या शिव्या देत आहे. तीच आजी आपली जमीन वाचवण्यासाठी सरकारला विनंती करत आहे. काय सुरु आहे या देशात? मित्रांनो आपण स्वत:ला या अतिरेकी आणि विदेशी शक्तींच्या स्वाधीन का करतोय? मला तुमच्याशी तक्रार आहे. मला दररोज माझा हेतू सांगावा लागतोय. एका देशभक्ताला इतक्यावेळा सांगावं लागतंय”, असं कंगना म्हणाली.

कंगनाने दिलजीत दोसांझ आणि प्रियंका चोप्रा यांच्यावरही निशाणा साधला. “दिलजीत दोसांझ आणि प्रियंका चोप्रा सारखे लोक कशाप्रकारे निती करत आहे. जर मी देशाच्या हिताची बात करते तर मी राजनिती करते असं म्हणतात. मगा यांनाही विचारा ते कोणती निती करत आहेत”, अशी टीका कंगनाने केली.

हेही वाचा : बंगालमध्ये मोठमोठ्या नेत्यांचा भाजपात प्रवेश, अमित शाहांचा ममता दीदींवर निशाणा, भाषणातील 10 महत्त्वाचे मुद्दे