11 वर्षांचा वनवास पूर्ण, न्यायालयाच्या आदेशानुसार ‘या’ प्रभू रामाचीही पोलीस ठाण्यातून सुटका

| Updated on: Nov 13, 2022 | 7:43 PM

रुरा शहरातील बाजारपेठेत बांधलेल्या मंदिरामधून राम आणि लक्ष्मण या दोन्ही मूर्ती चोरीला गेल्या होत्या. त्यानंतर चोरट्यांचा छडा लावून या मूर्ती पोलिसांनी पोलीस स्थानकात 11 वर्षे ठेवल्या होत्या.

11 वर्षांचा वनवास पूर्ण, न्यायालयाच्या आदेशानुसार  या प्रभू रामाचीही पोलीस ठाण्यातून सुटका
Follow us on

नवी दिल्लीः मर्याद पुरुषोत्तम भगवान श्री राम यांनी त्रेतायुगात 14 वर्षे वनवास भोगला होता. तर कलियुगातील प्रभूंना 11 वर्षे पोलीस ठाण्यात राहावे लागले आहे. उत्तर प्रदेशातील कानपूरमधील ही घटना आहे. येथील भगवान राम, लक्ष्मण आणि माता जानकी यांनाही येथे 11 वर्षांचा वनवास भोगावा लागला आहे. मंदिरातील तीन मूर्ती चोरट्यांनी चोरून पळवून घेऊन गेले होते. या मूर्ती चोरट्यांकडून जप्त केल्यानंतर एका पदार्थात ठेवल्या होत्या असंही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. परंतु हे प्रकरण निकाली काढल्यानंतर या मूर्ती आता शुक्रवारी मंदिर प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत.

वास्तविक, हे गाव अयोध्येपासून सुमारे 300 किमी अंतरावर असून कानपूर ग्रामीण भागातील रुरा पोलीस ठाण्यापासूनही लांब असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या पोलीस स्थानकातून आता प्रभू श्री राम, माता जानकी आणि लक्ष्मण यांची 11 वर्षांनंतर पोलीस स्थानकातून सोडून देण्यात आले आहे.

रुरा शहरातील बाजारपेठेत बांधलेल्या मंदिरामधून राम आणि लक्ष्मण या दोन्ही मूर्ती चोरीला गेल्या होत्या. त्यानंतर चोरट्यांचा छडा लावून या मूर्ती पोलिसांनी पोलीस स्थानकात ठेवण्यात आल्या होत्या.

तर त्यानंतर 11 वर्षांनी न्यायालयाच्या आदेशानुसार पोलीस ठाण्यातून या मूर्ती मंदिर प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत. आतापर्यंत मंदिरात इतर देवदेवतांची पूजा केली जात होती.

मात्र रामाचा दरबार रिकामा होता असंही येथील पुजारी सांगतात. त्यामुळे मूर्ती आता मंदिर प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आल्याने येथील नागरिकांनी आता आनंद व्यक्त केला आहे.

उत्तर प्रदेशातील रुरा टाउन मार्केटमध्ये राहणारे किराणा दुकानदार, राजेश आणि राम बाबू यांनी 1964 हे मंदिर बांधले होते. त्यामध्ये राम, सीता आणि अष्टधातूतील लक्ष्मण यांच्या मूर्तींसोबतच इतर देवतांच्या मूर्तींची स्थापना करण्यात आल्या होत्या. त्यानंतर 2011 मध्ये चोरट्यांनी मंदिरातून अष्टधातूपासून बनवलेल्या राम, लक्ष्मण आणि माता सीता यांच्या मूर्ती चोरीला गेल्या होत्या.