विश्वासच बसणार नाही… सून नव्हे तर ही व्यक्ती निघाली खूनी; विनीत मिनोचा मर्डर केसमध्ये मोठा ट्विस्ट

Kanpur Vineet Minocha Case Update : कानपुरमधील विनीत मिनोचा मर्डर केसमध्ये मोठा ट्विस्ट आला आहे. नोकर विशालच्या दाव्यानंतर पोलिसही हैराण झाले असून आता या केसमध्ये आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. कोण आहे ती व्यक्ती ?

विश्वासच बसणार नाही... सून नव्हे तर ही व्यक्ती निघाली खूनी;  विनीत मिनोचा मर्डर केसमध्ये मोठा ट्विस्ट
vineet minocha murder case
| Updated on: Sep 24, 2026 | 6:08 PM

Kanpur Crime News : उत्तर प्रदेशाच्या कानपूरमधील औषध व्यापारी विनीत मिनोचा यांचं हत्याकांड प्रचंड गाजलं. त्यांच्या घरात घुसलेल्या माजी नोकराने आणि साथीदाराने विनीत यांची हत्या केली. त्यांच्या सुनेने, शालू हिने आपल्याला हत्येची सुपारी दिल्याचा दावा मारेकऱ्यांनी केला होता, त्यानंतर सूनबाईंना अटकही करण्यात आली. मात्र आता या हत्याकांड प्रकरणात एक नवा आणि मोठ्ठा ट्विस्ट आला. विनीत मिनोचांची हत्या करण्याची सुपारी, त्यांचा मुलगा सुब्रत यानेच दिली होती असा दावा चौकशीदरम्यान मारेकरी विशालने पोलिसांसमोर केला. त्यानंतर पोलिसांनी त्वरित कारवाई करत विनीत यांचा मुलगा सुब्रत मिनोचाला अटक केली.

पोलिसांच्या चौकशीदरम्यान आरोपी नोकर विशालने अनेक खळबळजनक खुलासे केले. त्याच्या सांगण्यानुसार – वडिलांची हत्या केलीस तर मी तुला 6 लाख रुपये देईन असं वचन सुब्रतने मला दिलं होतं. एवढंच नव्हे जर तू पकडला गेलास तर हत्येचा संपूर्ण आरोप त्याची पत्नी, मिनोचा यांची सन शालूवर टाक, असंही सुब्रतने विशालला सांगितलं होतं. तसेच दुकानातून औषध चोरी करण्यासाठी सुब्रतने आपल्याला सांगितल्याचं विशालने म्हटलं. मात्र ही चोरी पकडली गेल्यावर सुब्रतनेच त्याला झापलं आणि त्याला नोकरीवरून काढून टाकलं होतं. आरोपी मारेकरी विशालच्या या दाव्यामुळे केसला नवं वळण मिळालं आहे.

मृत्यू नैसर्गिक वाटला पाहिजे

ज्या दिवशी विनीत मिनोचा यांची हत्या झाली त्यादिवशी सुब्रतने आपल्याला जवळपास 6 वेळा कॉल केला आणि काम लौकर संपवण्यास सांगितलं, असा दावा विशालने केला. विनीत यांचा मृत्यू नैसर्गिक वाटला पाहिजे, हत्या नव्हे , अशी सुब्रतची इच्छा होती. मात्र त्या दिवशी विनीत मिनोचा यांनी विशालला खोलीत पाहिलं आणि आरडाओरडा सुरू केला. यामुळे घाबरलेल्या विशालने आणि साथीदाराने विनीत यांच्यावर टाकूने हल्ला केला.

पोलिस ठाण्यात पती समोर येताच शालूला अश्रू अनावर

बुधवारी पोलिस स्टेशनमध्ये सुब्रत, त्याची पत्नी शालू आणि मारेकरी नोकर विशाल यांना समोरासमोर बसवून पोलिसांनी त्यांची चौकशी करत 40 प्रश्न विचारले. शालूला तिचा पती सुब्रत समोर दिसताच ती ओक्सा-बोक्शी रडू लादला. मला याप्रकरण बळजबरीने अडकवण्यात आलंय, आसा दावा तिने केला.

विनीत मिनोचा यांचा मुलगा सुब्रतवर 15 लाखांचं कर्ज होतं, ते फेडण्यासाठी आणि संपत्ती मिळवण्यासाठी त्याने हा भयानक कट रचला असं पोलीस तपासात समोर आलं आहे. मात्र सुब्रतने हे आरोप फेटाळले आहे. मारेकरी विशाले याने केलेले दावे त्याने फेटाळून लावले. मी वडिलांच्या हत्येची सुपारी दिलेली नाही आणि विशाल मला खोट्या प्रकरणात अडकवतोय असा दावा सुब्रतने केला. त्याच्यावरील आरोपांचा तपास केला जात असून पुरावे शोधण्यात येत आहे, असं पोलिसांनी नमूद केलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us