Kargil Vijay Diwas: जेव्हा पाकिस्तानच्या किचनमध्ये झाली भारतीय सैनिकांची मेजवाणी, मेन्यूत होता कराची हलवा, मेव्याची खीर, पण..

Kargil Vijay Diwas : तोलोलिंग मध्ये विजय मिळवल्यानंतर भारतीय वीर जवान शत्रूंच्या गोळीपासून तर वाचले. परंतू उपास आणि तहानेने व्याकुळ झाल्याने ते अत्यवस्थ झाले होते.अखेर त्यांनी एक असा निर्णय घेतला त्याने शत्रू देखील गोंधळला...

Kargil Vijay Diwas: जेव्हा पाकिस्तानच्या किचनमध्ये झाली भारतीय सैनिकांची मेजवाणी, मेन्यूत होता कराची हलवा, मेव्याची खीर, पण..
Kargil Vijay Diwas
| Updated on: Jul 26, 2026 | 7:32 PM

Kargil Vijay Diwas: कारगिल युद्धाचा पहिला विजय तोलोलिंगच्या शिखरांवर भारतीय सैनिकांचा वाट पाहात होता. मात्र भारतीय जवानांनी हा निर्णय घेतला की काहीही होवो तोलोलिंगवर ते भारताचा तिरंगा फडकवणारच. शत्रूचा मुकाबला करण्यासाठी दारुगोळा कमी पडू नये म्हणून भारतीय वीर जवानांनी आपल्या बॅगेत अन्नपदार्थाच्या ऐवजी काडतूस आणि हँडग्रेनेड भरले होते. त्यानंतर निश्चित झाले की भारतीय सैनिकांची टीम आधी शत्रूंवर हल्ला करेल. तोलोलिंगवर कब्जा मिळवल्यानतर दुसरी टीम रसद आणि औषधे घेऊन घटनास्थळी पोहचेल. संपूर्ण रात्र आणि दिवसभर झालेल्या लढाईनंतर भारतीय शुरवीरांनी शत्रूंच्या बहुतांशी जवानांना ठार केले. मात्र, या लढाईत जे वाचले ते घटनास्थळ सोडून पळाले.

या लढाईत सहभागी असलेल्या कॅप्टन अखिलेश सक्सेना हे सांगतात की भारतीय शूरवीरांनी कारगिर युद्धाचा पहिला विजय मिळवल्यानंतर तोलोलिंगच्या शिखरावर तिरंगा फडकवला. शत्रूने कधी स्वप्नातही विचार केला नसेल की सुमारे अशक्य वाटणारी ही लढाई भारतीय सैन्य जिंकू शकेल. यामुळे भांबालेल्या पाकिस्तानी सैन्याने तोलोलिंगच्या शिखरावर आणि आजूबाजूच्या भागात शेलिंग करुन तोफगोळ्याची बरसात केली. यावेळी आकाशातून केवळ आगीचे आणि तप्त लोखंडाचे गोळे बरसत होते. याचा परिणाम असा झाला की भारतीय जवानांनी जी टीम जेवणाचे साहित्य घेऊन येणार होती. ती रस्त्यातच अडकली. इकडे गेल्या २४ तासांपासून उपाशी आणि तहानेने व्याकुळ असलेले भारतीय जवान एक थेंब पाण्यासाठी तडफडत होते.

एकावळी आम्हा सर्वांना वाटले की एक वेळ शत्रूंच्या गोळ्यांपासून वाचू परंतू अन्न पाण्यावाचून आपला मृत्यू होऊ शकतो. कारण ४८ तासांपासून दोन्ही बाजूंनी तोफ गोळ्यांचा भडीमार सुरु होता. या युद्धात शेकडो हँडग्रेनेड फुटले होते. गोळ्यांचा जणू पाऊस होत होता. तोलालिंगच्या शिखरावर जमलेले बर्फ संपूर्णपणे विषारी बनले होते. आता आमच्याकडे हा देखील पर्याय नव्हता आणि आम्ही बर्फ चोखून आपला जीव वाचवू शकू असे कॅप्टन अखिलेश सक्सेना यांनी म्हटले आहे.

कॅप्टन अखिलेश सक्सेना यांनी सांगितले की अन्नपाण्यावाचून आता जीव जाण्याऐवजी जीवंत राहण्यासाठी पोटात काही जाणे गरजेचे होते. शत्रूच्या गोळ्यांपासून वाचलो तरी अन्नपाण्यावाचून जीव जाणे किती दुर्भाग्यपूर्ण असेल असा आम्ही विचार केला. त्यानंतर आम्ही उपाशी न मरण्याचा निर्णय घेतला. आणि सर्वात आधी बर्फ खोदण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांच्या लक्षात आले की शत्रू गेल्या तीन महिन्यांपासून येथे तळ धरुन आहे. त्यामुळे त्याने खाण्यापिण्याचा बंदोबस्त तर केलाच असावा. शत्रूकडे औषधे आणि मेडिकलच्या सुविधा देखील असतील असे आम्हाला वाटले. दोन पिक्समध्ये तयार केलेल्या स्ट्रक्चरमध्ये जेवण असणार असे आम्हाला वाटले. परंतू तेथे पोहचणे कठीण होते. समोरील पर्वतावर भांबावलेला शूत्र घात लावून बसला होता. आम्ही एक पाऊल पुढे करताच गोळ्यांचा बरसात होत होती.

आमच्याकडे दोनच पर्याय होते. एक म्हणजे शत्रूंच्या गोळ्याचे शिकार होणे आणि दुसरा उपाशी मरणे. नंतर आम्ही ठरवले की काही झाले तरी उपाशी मरायचे नाही. त्यानंतर मी एका अन्य अधिकाऱ्यासोबत खाली जाण्याचा निर्णय घेतला. आम्ही दोघे आपल्यापाठीला रिकाम्या बॅग बांधून आणि स्मोक बॉम्ब घेऊन खाली पळण्यास सुरुवात केली. आम्हाला अशा प्रकारे पळताना पाहून शत्रू गोंधळला होता. त्यांनी विचार केला की केवळ दोन लोक त्यांच्याकडे असे पळत का येत आहेत. ते गोंधळल्याने गोळी चालवतील तोपर्यंत आम्ही त्या स्ट्रक्चरपर्यंत पोहचलो देखील.

शत्रूच्या स्वयंपाक घरावरच कब्जा

त्या स्ट्रक्चरमध्ये पाकिस्तानी सैन्याने विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी पंच पक्वाने तयार केली होती. मेव्याची खिर, सुकामेवा, कराची हलवा, बिर्याणी आणि बरेच अन्न पदार्थ तेथे होते आणि औषधे देखील होती. आम्ही स्वत:चा विचार न करता आधी जखमी सैनिकांसाठी हे अन्न पदार्थ बॅगेत भरायला सुरुवात केली. त्यानंतर स्मोक बॉम्बचा वापर करत आम्ही वरच्या दिशेने गेलो आणि सहकाऱ्यांना हे पदार्थ दिले.  शत्रूला वाटले की त्यांना विजय मिळाल्यानंतर ते येथे पार्टी करतील. मात्र, आम्ही बाजी पलटली होती आणि आम्ही त्यांच्या स्वयंपाक घरावरच कब्जा केला होता असे कॅप्टन अखिलेश सक्सेना यांनी सांगितले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us