‘या’ मंत्र्याचे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

| Updated on: Sep 07, 2022 | 1:34 AM

कट्टी हे हुक्केरी विधानसभा मतदारसंघातून नऊ वेळा विधानसभेवर निवडून गेले होते. ते मुख्यमंत्री बसवराज बोम्मई मंत्रिमंडळातील सर्वात ज्येष्ठ मंत्री होते आणि त्यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छाही व्यक्त केली होती.

या मंत्र्याचे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन
कर्नाटक मंत्री उमेश कट्टी
Image Credit source: Google
Follow us on

कर्नाटक : कर्नाटकचे वन, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार मंत्री उमेश कट्टी (Umesh Katti) यांचे बेंगळुरू येथे हृदयविकाराच्या झटक्या (Heart Attack)ने निधन झाले. ते 61 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी शीला, मुलगा निखिल आणि मुलगी स्नेहा असा परिवार आहे. कट्टी हे हुक्केरी विधानसभा मतदारसंघातून नऊ वेळा विधानसभेवर निवडून गेले होते. ते मुख्यमंत्री बसवराज बोम्मई मंत्रिमंडळातील सर्वात ज्येष्ठ मंत्री (Senior Minister) होते आणि त्यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छाही व्यक्त केली होती.

हुक्केरी तालुक्यातील बेल्लाडबागेवाडी येथील रहिवासी असलेले कट्टी यांनी विकास आघाडीवर लहान राज्यांमध्ये राज्याचे विभाजन करण्याच्या त्यांच्या मागणीसाठी आवाज उठवला होता.

1985 मध्ये पहिल्यांदा विधानसभेवर निवडून आले

वडील विश्वनाथ कट्टी यांच्या निधनानंतर 1985 च्या पोटनिवडणुकीत कट्टी पहिल्यांदा विधानसभेवर निवडून आले. जनता पक्षाचे उमेदवार म्हणून त्यांची पहिली निवडणूक होती. ते 1989 आणि 1994 मध्ये जनता दलाचे उमेदवार म्हणून आणि 1999 मध्ये जनता दल (युनायटेड) उमेदवार म्हणून निवडून आले. 2004 च्या निवडणुकीत ते काँग्रेसचे उमेदवार म्हणून पराभूत झाले.

हे सुद्धा वाचा

कट्टी 2008 मध्ये जनता दल (धर्मनिरपेक्ष) उमेदवार म्हणून निवडून आले पण ते भाजपमध्ये गेले. 2008 च्या पोटनिवडणुकीत, 2013 च्या निवडणुकीत आणि 2018 च्या निवडणुकीत ते भाजपचे उमेदवार म्हणून निवडून आले.

हुक्केरी मतदारसंघातून पाच वेगवेगळ्या पक्षातून विजयी झाले

हुक्केरी विधानसभा मतदारसंघातून पाच वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे उमेदवार म्हणून ते विजयी झाले होते. जे एच पटेल, बी एस येडियुरप्पा, डी. व्.ही सदानंदगौडा, जगदीश शेट्टार आणि बसवराज बोम्मई यांच्या मंत्रिमंडळात ते मंत्री होते. (Karnataka Minister Umesh Katti Passes Away in Bangalore due to heart attack)