AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फोन दरवाजाबाहेर, अगोदर दर्शन; मंदिरात जाण्यापूर्वीच जमा करा मोबाईल, 52 धार्मिक स्थळी धडाकेबाज फैसला

Tamil Nadu Temples Mobile Ban: तामिळनाडूमधील विजय यांच्या सरकारने अजून एक धडाकेबाज निर्णय घेतला आहे. राज्यातील 52 प्रसिद्ध मंदिरात आता भाविकांना त्यांचा मोबाईल नेता येणार नाही. या मंदिरातील घंटा नाद ऐकू येईल पण मोबाईलची रिंग ऐकू येणार नाही. या निर्णयाचे अनेक भाविकांनी स्वागत केले आहे.

फोन दरवाजाबाहेर, अगोदर दर्शन; मंदिरात जाण्यापूर्वीच जमा करा मोबाईल, 52 धार्मिक स्थळी धडाकेबाज फैसला
मंदिरात फोन बंदीImage Credit source: एजन्सी
| Updated on: Sep 02, 2026 | 2:30 PM
Share

Tamilnadu temples mobile ban rules: मंदिर परिसराचे पावित्र्य जपण्यासाठी तामिळनाडूमधील जोसेफ विजय सरकारने एक धडाकेबाज निर्णय घेतला आहे. मंदिर परिसरात अनेक इस्टाग्राम युझर्स रील्ससाठी धार्मिक पावित्र्य धोक्यात घालतात. काहीजण सेल्फीसाठी विचित्र प्रकार करतात. या भाविकांना आवार घालण्याचे मोठे आवाहन मंदिर प्रशासनासमोर कायम असते. यावर आता तामिळनाडू सरकारने जालीम उपाय शोधला आहे. राज्यातील 52 प्रसिद्ध मंदिरात भाविकांना मोबाईल घेऊन जाता येणार नाही. हा मोबाईल त्यांना मंदिराच्या बाहेरच जमा करावा लागेल. त्यासाठी 5 रुपये शुल्कही वसूल करण्यात येणार आहे. मंदिरातील शांती आणि पावित्र्यासाठी विजय यांच्या सरकारचे हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. यामुळे लोक देवदर्शनासाठी आणि आत्मिक शांतीसाठीच मंदिर परिसराचा उपयोग करतील अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

रील्स आणि फोटोग्राफीला लगाम

सध्या अनेकांच्या डोक्यात रील्स तयार करण्याचे आणि सेल्फीचे खूळ शिरले आहे. आपण कुठे आहोत आणि काय करत आहोत, याचे साधं भानंही अनेक रील स्टारला राहत नाही. रिअल लाईफमधील भावना, आदर यामुळे हरवत चालल्याची ओरड नेहमी होते. त्यातून अनेक ठिकाणी वाद उद्भवतात. तामिळनाडू सरकारने यावर अक्सर जालीम उपाय शोधला आहे. मंदिर परिसरात तुम्ही प्रवेश करताच अगोदर स्मार्टफोन जमा करावा लागणार आहे. राज्यातील 52 हिंदू मंदिरांसाठी हा नियम लागू करण्यात आला आहे. हा नवीन नियम राज्यात मंगळवारपासून लागू करण्यात आला आहे. हिंदू धार्मिक आणि धर्मादाय मंत्री रमेश यांनी मंदिरातील पावित्र्य आणि शांतता जपण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे म्हटले. या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.

स्मार्टफोनसाठी 5 रुपये शुल्क

नवीन नियमानुसार, जर एखादा भाविक मंदिर परिसात स्मार्टफोन घेऊन आला, तर त्याला मंदिराच्या प्रवेशद्वारावरच त्याचा स्मार्टफोन जमा करावा लागेल. त्यासाठी विशेष काऊंटरची व्यवस्था करण्यात आली आहे. याठिकाणी भाविकाला, भक्ताला 5 रुपये शुल्क अदा करावे लागेल. त्याला याबदल्यात एक टोकन देण्यात येईल. देव दर्शनानंतर त्याचा मोबाईल टोकन दाखवून परत करण्यात येईल. याठिकाणी सीसीटीव्हीची व्यवस्था पण असेल.

बेसिक फोन नेता येणार पण…

या नियमातून अगदी साध्या, बेसिक फोनला सूट देण्यात आली आहे. भाविकांना साधा फोन मंदिरात नेता येईल. पण हा साधा फोन सायलंट मोडवर, व्हायब्रंट मोडवर ठेवावा लागेल. मंदिर परिसरात मोठ्याने फोनवर बोलू नये अशी अपेक्षा मंत्र्यांनी व्यक्त केली आहे. यामुळे बेसिक फोनला मंदिरात मुभा देण्यात आली असली तरी भाविकांना नियम पाळावे लागतील.

Follow Us
मोठी बातमी! स्मिता जाधवांना पाठिंबा देण्यावर शंभूराज देसाईंची मोठी अट,
मोठी बातमी! स्मिता जाधवांना पाठिंबा देण्यावर शंभूराज देसाईंची मोठी अट, महायुतीत धुसफूस कायम
राज ठाकरेंच्या शिवतीर्थवर आमिर खानची अचानक एन्ट्री; शिवतीर्थवर नेमकं..
Aamir Khan Meet Raj Thackeray : राज ठाकरेंच्या शिवतीर्थवर आमिर खानची अचानक एन्ट्री; शिवतीर्थवर नेमकं काय घडतंय? कारण अद्याप गुलदस्त्यात
पत्रकार असल्याचा धाक दाखवून खंडणीचा डाव; थेट बार मालकाकडे...
Mumbai : पत्रकार असल्याचा धाक दाखवून खंडणीचा डाव; थेट बार मालकाकडे...
स्वतःचे आमदार सांभाळू शकले नाहीत...; उद्धव ठाकरेंवर फडणवीसांचा निशाणा
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray; स्वतःचे आमदार सांभाळू शकले नाहीत...; उद्धव ठाकरेंवर देवेंद्र फडणवीसांचा थेट निशाणा
मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांची मोहन भागवतांशी भेट; चर्चांना उधाण
मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांची मोहन भागवतांशी भेट; चर्चांना उधाण
कोल्हापुरात गोकुळ दूधसंघ निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार
Gokul Milk Union Election 2026 : कोल्हापुरात गोकुळ दूधसंघ निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार
उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पक्षातील रेजिम चेंजकडे लक्ष द्यावं...
Navnath Ban : उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पक्षातील रेजिम चेंजकडे लक्ष द्यावं; नवनाथ बन यांचा ठाकरे-राऊतांवर निशाणा
प्रसिद्ध Maple लॉन अँड रेस्टॉरंटचा अन्न परवाना निलंबित; तपासणीत 96....
Chhatrapati Sambhajinagar : प्रसिद्ध Maple लॉन अँड रेस्टॉरंटचा अन्न परवाना निलंबित; तपासणीत 96 पैकी फक्त....
पुणेकरांची FDA आयुक्त तुकाराम मुंढेंकडे मोठी मागणी; नेमकं काय म्हणाले?
पुणेकरांची FDA आयुक्त तुकाराम मुंढेंकडे मोठी मागणी; नेमकं काय म्हणाले?
गोकुळ निवडणुकीत शपथांचं राजकारण; शपथ मोडल्यास ब्रेन स्ट्रोक येतो.....
Gokul Elections : गोकुळ निवडणुकीत शपथांचं राजकारण; शपथ मोडल्यास ब्रेन स्ट्रोक येतो, के.पी. पाटील असं का म्हणाले?