AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतातील 3 सर्वात श्रीमंत कथावाचक, एका कार्यक्रमासाठी इतक्या लाखांचे शुल्क, पहिल्या नंबरवर कोण?

India Richest Kathawachak: देशातील अनेक भागात, गावांत धार्मिक कार्यक्रम, उत्सव सुरूच असतात. या ठिकाणी महाभारत, रामायण, श्रीमद भागवत, शिवपुराण आणि इतर धार्मिक ग्रंथांचे श्रवण केले जाते. त्यासाठी सुप्रसिद्ध कथावाचक बोलवले जातात. काही दाव्यानुसार देशातील तीन सर्वात श्रीमंत कथावाचक कोण?

भारतातील 3 सर्वात श्रीमंत कथावाचक, एका कार्यक्रमासाठी इतक्या लाखांचे शुल्क, पहिल्या नंबरवर कोण?
देशातील सर्वात श्रीमंत कथावाचकImage Credit source: एजन्सी
| Updated on: Sep 02, 2026 | 12:14 PM
Share

देशात कुठे ना कुठे धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन होतच होतं. आपल्याकडे अखंड हरिनाम सप्ताह, पारायण, महाभारत, रामायण, श्रीमद भागवत, शिवपुराण आणि इतर धार्मिक ग्रंथांचे श्रवण केले जाते. त्यासाठी सुप्रसिद्ध कीर्तनकार, कथावाचक यांना बोलावण्यात येते. हा कार्यक्रम केवळ त्या धार्मिक स्थळापुरता, गावापुरता मर्यादीत नसतो. तर आता तंत्रज्ञानावर आरूढ होत हा कार्यक्रम विविध ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर दाखवला जातो. कथावाचकाला मोठे मानधन देण्यात येते. एका कार्यक्रमासाठी त्याचे शुल्क ठरवले जाते. ते लाखोंमध्ये असते. माध्यमातील काही दाव्यानुसार, देशातील प्रसिद्ध कथावाचकांसाठी 10 लाख ते 18 लाख रुपयांचे शुल्क मोजले जाते. देशातील सर्वात तीन श्रीमंत कथावाचक कोणते?

तिसर्‍या क्रमांकावर जया किशोरी

विविध माध्यमातील दाव्यानुसार, भजन आणि कथा वाचनात जया किशोरी यांनी त्यांची वेगळी छाप सोडली आहे. प्रसंग वर्णन, भावार्थ विश्लेषण, भाषेची, शब्दांची फोड आणि गोड वाणीमुळे त्या जन माणसात प्रसिद्ध आहेत. काही दाव्यानुसार, त्यांनी आतापर्यंत 500 पेक्षा अधिक कथा वाचन कार्यक्रम केले आहे. माध्यमातील दाव्यानुसार, एका कथा वाचन कार्यक्रमासाठी त्या जवळपास 10 लाख रुपये शुल्क घेतात.

दुसर्‍या क्रमांकावर देवकीनंदन ठाकुर

देवकीनंदन ठाकुर यांचे नाव देशातील बड्या कथावाचकांपैकी एक आहे. असे म्हटले जाते की, त्यांनी अवघ्या 13 व्या वर्षी श्रीमद्भागवत कंठस्थ केले होते. त्यांची कथा ऐकण्यासाठी लाखोंच्या संख्येने भाविकांची गर्दी उसळते. एका दाव्यानुसार, एका कथावाचन कार्यक्रमासाठी ते जवळपास 12 ते 15 लाख रुपयांपर्यंत मानधन घेतात.

पहिल्या क्रमांकावर अनिरुद्ध आचार्य

अनिरुद्ध आचार्य यांची लोकप्रियता गेल्या काही वर्षात मोठ्या वेगाने वाढली आहे. त्यांच्या कथाकथन कार्यक्रमात लाखो भक्त सहभागी होतात. ते भाविकभक्तांच्या मजेशीर प्रश्नांना मिश्किल उत्तरं देतात. त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल आहेत. भारतच नाही, तर परदेशातही त्यांचा फॅन फॉलोअर्सची संख्या अधिक आहे. एका कथा वाचनासाठी ते जवळपास 15 ते 18 लाख रुपयांपर्यंत मानधन घेतात असा दावा करण्यात येतो.

डिस्क्लेमर: ही माहिती सोशल मीडिया आणि ऑनलाईन माहिती आधारे देण्यात आली आहे. टीव्ही 9 मराठी या दाव्याची पुष्टी करत नाही.

Follow Us
5 हजार रुपये म्हणजे...; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
Vijay Wadettiwar : 5 हजार रुपये म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
Abhijeet Dipke : तिरंगा फडकवणं गुन्हा नाही; CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, अभिजीत दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे
Pradeep Purnekar Case : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे; अनेक गोष्टी समजल्या...
दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला
Bonus For Railway Employees : दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला महत्वाचा निर्णय, तब्बल....
फडणवीस, शरद- सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
Pune : मुख्यमंत्री फडणवीस, शरद पवार, सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्याय
CJP : जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्यायालयाने सुनावली एवढ्या दिवसांची कोठडी
दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले
Devendra Fadnavis : दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले, थेट म्हणाले...
निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं...
Supreme Court : निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं आयोगाला सुनावलं; रेकॉर्ड सादर करा, अन्यथा...
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटलांच्या अध्यक्षतेखाली
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक सुरू
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात...
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात मुलींचा पोलिसांवर आरोप