AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धोकातंत्र म्हणत राज ठाकरे यांची थेट शरद पवार यांच्यावर टीका, डिलिमिटेशनला पाठिंबा..

डिलिमिटेशन बिलावरून राज ठाकरे यांनी मोठा आरोप केला. भाजपाचा नक्की काय करण्याचा डाव आहे, हे सांगताना राज ठाकरे दिसले. यासोबतच शरद पवार यांच्यावरही जोरदार टीका राज ठाकरे यांनी केली. सत्तेकडे जाणारा अजित पवारांचा पहिला गट असल्याचे विधान त्यांनी केले.

धोकातंत्र म्हणत राज ठाकरे यांची थेट शरद पवार यांच्यावर टीका, डिलिमिटेशनला पाठिंबा..
Raj Thackeray and Sharad Pawar
| Updated on: Nov 29, 2026 | 11:28 AM
Share

राज ठाकरे यांनी डिलिमिटेशन बिलाच्या मुद्द्यावर सरकारवर जोरदार टीका केली. राज ठाकरे यांनी म्हटले की,  हे आता का सुरु आहे हे लक्षात घेतले पाहिजे. ⁠महिला आरक्षण उभे करायचे. ⁠हे सर्व कशासाठी. 543 काय दिवे लावतायेत ते अजून खासदार वाढवावे वाटतायेत. यामुळे राज्याला आर्थिक स्वायत्त मिळणार आहे. ⁠संपुर्ण देश केंद्र शासित करण्याचा डाव आहे. ⁠भविष्यात उत्तर विरुद्ध दक्षिण असा संघर्ष पेटल्या शिवाय राहणार नाही, अशीही मोठी शंका राज ठाकरे यांनी व्यक्त केली. पुढे राज ठाकरे यांनी म्हटले की, अजित पवार म्हणजे सत्तेच्या दिशेने गेलेली पहिली टीम होती. संपूर्ण देश केंद्रशासित करण्याचा भाजपाचा डाव आहे. मी 2018 पासून हे सर्व असल्याचे मी सांगत आहे. काही लोक म्हणतात की, राज ठाकरे यांना मतं मिळत नाहीत, पण मतं मिळतात पण ती इकडे जातात.

पुढे राज ठाकरे यांनी म्हटले की, विधानसभेत महायुतीच्या 232 जागा तरीही सगळीकडे सन्नाटा होता. हे त्यांनाही माहिती आहे की, या जागा कशा आल्या. चोरीमारी करून आलेल्या. माझा आता निवडणूक आयोगावर विश्वासच नाही. विधानसभेत शेवटच्या तासात मतदान वाढले. शरद पवार म्हणजे धोकातंत्र असल्याचे मोठे विधान राज ठाकरे यांनी केले.

सत्ता सत्तेतून पैसा हेच सुरू आहे, असेही राज ठाकरे यांनी म्हटले. सरकारवर जोरदार टीका करताना राज ठाकरे दिसले. पुढे त्यांनी म्हटले की, आता एक गोष्ट पळणे गरजेचे आहे की ही का सुरू आहे. 543 खासदार आहेत ते काय दिवे लावत आहे जे तुम्हाला अजून खासदार वाढवायचे आहेत. या नंतर राज्याला आर्थिक स्वययथा मिळणार आहे का? भविष्यात उद्या उत्तर विरुद्ध दक्षिण असा संघर्ष झाल्याशिवाय राहणार नाही.

कारण दक्षिण म्हणजे महाराष्ट्र बोलत आहे सर्व राज्यावर अन्याय होणार तो जास्त प्रमाणात होणार. दक्षिण या शब्दाला मोगल दखण म्हणायचे त्यानंतर इंग्रज दख्खन बोलायचे आणि हा या दक्षिणवर होणारा मोठा अन्याय असले. केंद्रावर शासन अवलंबून ठेवणे हा डाव आहे. शरद पवारांबद्दल बोलताना राज ठाकरे यांनी म्हटले की, मागे मी बोलो होतो जंतर मंतरवर. खोकायंत्र दिशा दाखवतो पण हे धोकायंत्र आहे.

अजित पवार भाजपसोबत गेले तेव्हा मी ट्विट केल होत. पहिली टीम रवाना झाली आहे, त्यानंतर दुसरी होईल ते होते. आता त्याला आकार येऊ दे मग त्यावर बोलता येईल. जनतेने ठरवणं गरजेचे आहे की कशा प्रकारे निवडणूक लढवू.  ठाण्यात शेवटच्या एका तासात 80/85हजार मतदान कसा शक्य आहे हे कोण करत आहेत.

Follow Us
शरद पवारांच्या NCP ने डिलिमिटेशन विधेयकाच्या विरोधात मतदान करावे...
शरद पवारांच्या NCP  ने डिलिमिटेशन विधेयकाच्या विरोधात मतदान करावे; काँग्रेस नेत्याचे पुन्हा आवाहन!
बारामतीच्या पॉवर मॅरेथॉनमध्ये अजितदादांची आठवण; दत्तात्रय भरणे भावुक,
बारामतीच्या पॉवर मॅरेथॉनमध्ये अजितदादांची आठवण; दत्तात्रय भरणे भावुक, सुनेत्रा पवारांचेही केले कौतुक!
आधी भ्रष्टाचाराचे शिरोमणी म्हणाले, आता सोबत का घेताय? संजय राऊतांचा...
आधी भ्रष्टाचाराचे शिरोमणी म्हणाले, आता सोबत का घेताय? संजय राऊतांचा अमित शाहांना सवाल
मोठी बातमी! समाजवादी पक्षाचा खासदारांना व्हिप, तीन विधेयकांविरोधात...
मोठी बातमी! समाजवादी पक्षाचा खासदारांना व्हिप, तीन विधेयकांविरोधात मतदानाचे आदेश
भिवंडीत प्रसिद्ध मॉलमध्ये विक्रीसाठी ठेवलेल्या खजुरात अळ्या...
भिवंडीत प्रसिद्ध मॉलमध्ये विक्रीसाठी ठेवलेल्या खजुरात अळ्या; ग्राहकांमध्ये संताप!
डिलिमिटेशन विधेयकाविरोधात काँग्रेसची मोठी तयारी! मल्लिकार्जुन खर्गें..
डिलिमिटेशन विधेयकाविरोधात काँग्रेसची मोठी तयारी! मल्लिकार्जुन खर्गें घेणार स्टॅलिन-पवारांची प्रत्यक्ष भेट
छत्रपती संभाजीनगरमध्ये FDA चा मोठा दणका! 12 हॉटेल्ससह ब्लिंकइट...
छत्रपती संभाजीनगरमध्ये FDA चा मोठा दणका! 12 हॉटेल्ससह ब्लिंकइट स्टोअर्सचे परवाने निलंबित
डिलिमिटेशन विधेयकावरून दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग; राजकीय पक्षांची
डिलिमिटेशन विधेयकावरून दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग; राजकीय पक्षांची आज महत्त्वाची बैठक!
एकनाथ शिंदेंनी जपली माणुसकी; विनोद कांबळींच्या कुटुंबाला मदतीचा हात!
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंनी जपली माणुसकी; विनोद कांबळींच्या कुटुंबाला मदतीचा हात!
'रेजिम चेंज'वरून फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा; संविधान आणि लोकशाहीबाबत
'रेजिम चेंज'वरून फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा; संविधान आणि लोकशाहीबाबत मोठं विधान!