AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut: पवार, सुळेंनी अचानक संविधानाविरोधी भूमिका का घेतली? संजय राऊत यांचा खडा सवाल, म्हणाले अमित शाह हे…

Sanjay Raut on Sharad Pawar NCP: खासदार संजय राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेतून भाजप, अमित शाह यांच्याविरोधात जोरदार हल्लाबोल केला. तर त्याचवेळी त्यांनी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनाही खडा सवाल केला आहे.

Sanjay Raut: पवार, सुळेंनी अचानक संविधानाविरोधी भूमिका का घेतली? संजय राऊत यांचा खडा सवाल, म्हणाले अमित शाह हे...
पवार, सुळेंनी अचानक संविधानाविरोधी भूमिका का घेतली? राऊंताचा खडा सवाल
| Updated on: Nov 29, 2026 | 11:14 AM
Share

Sanjay Raut on Sharad Pawar NCP: मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून राज्यातील महाविकास आघाडीतील धुसफूस समोर आली. राष्ट्रवादीने डिलिमिटेशनविषयी घेतलेल्या भूमिकेवरून ठिणगी पडली आहे. खासदार संजय राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेतून भाजप, अमित शाह यांच्याविरोधात जोरदार हल्लाबोल केला. तर त्याचवेळी त्यांनी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनाही खडा सवाल केला आहे.

अचानक सुप्रिया सुळे यांनी भूमिका का बदलली?

डिलिमिटेशन बिलाला, आम्ही बदनाम शैतानी बिल म्हणतो. माझा देवेंद्र फडणवीस, अमित शाह यांना सवाल आहे की, तुम्ही कोणत्या देशहितासाठी त्यांचा पक्ष फोडला? असं कोणतं देशहित होतं की त्यासाठी शरद पवार यांचा पक्ष तुम्ही फोडला. त्यासाठी तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडली. याचं उत्तर त्यांनी दिलंच पाहिजे. अमित शाह म्हणतात की या देशातील भ्रष्टाचाराचे शिरोमणी हे शरद पवार आहेत. या भारतातील लोकशाही गुलाम बनवण्यासाठी हे डिलिमिटेशन बिल आणण्यात आले आहे. शरद पवार आणि सुप्रिया सुळे या सातत्याने कालपर्यंत या बिलाला पाठिंबा देत नव्हत्या. रामलीला मैदानावरती एक महिन्यापूर्वी रॅली झाली. त्यावेळी आमच्यासोबत सुप्रिया सुळे होत्या. त्यांनी संविधान बचावासाठी आलेल्या जनसागराला त्या अभिवादन करत होत्या. प्रत्येकाच्या मनात आता प्रश्न आहे की, तुम्ही अचानक संविधानाच्या विरोधात भूमिका का घेतली, असा सवाल राऊतांनी केला.

पण अजूनही इंडिया आघाडीने लढाई सोडलेली नाही. माझ्या माहितीनुसार मल्लिकार्जुन खरगे हे मुंबईत येत आहेत. बहुतेक राहुल गांधी, सोनिया गांधी हे पण सोबत असतील. ते शरद पवार यांची भेट घेणार आहेत. ते चेन्नईला जाऊन स्टॅलिन यांनाही भेटणार आहेत. शेवटच्या मिनिटापर्यंत लोकशाही आणि देश बचावाची लढाई सुरूच राहिल, असे खासदार संजय राऊत यांनी यावेळी ठणकावले.

उद्धव ठाकरे यांचे देशाच्या इतिहासात नाव

या लढाईत शिवसेना एक मोठा फॅक्टर आहे. उद्धव ठाकरे यांच्यावरही पाठिंबा देण्यासाठी दबावाचा प्रयत्न झाला. आमचे सहा खासदार फोडले आहेत. तीन खासदार आमच्याकडे आहेत. त्यांचाही पाठिंबा त्यांना हवा आहे. पण या देशाच्या इतिहासात उद्धव ठाकरे यांच्या नावाची नोंद राहिल. सर्व दबाव आणि आमिषं झुगारून उद्धव ठाकरे हे देशाच्या लोकशाही रक्षणासाठी, संविधान रक्षणासाठी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. ते डचमळले नाहीत, असे खासदार संजय राऊत म्हणाले. मोदी-शाह यांचं राष्ट्रहित फक्त गौतम अदानी यांचा फायदा करून देणे हेच आहे. या देशातील जल, जमीन, जंगल त्यांच्या ताब्यात देण हेच त्यांचे धोरण असल्याचा आरोप त्यांनी केला.

शाहू-फुले-आंबेडकरांचा वसा

शरद पवार यांची प्रकृती ठीक नाही. पण त्यांच्या पक्षातील नेते सुप्रियाताई सुळे असतील, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि इतर नेते असतील. ते नेहमी शाहू-फुले-आंबेडकरांचा वसा सांगतात. मग या बिलाला पाठिंबा देण्याची त्यांच्या पक्षाची भूमिका हा वारसा पुढे नेणारी नाही, असे राऊत म्हणाले. अमित शाह हे महाराष्ट्राचे सर्वात मोठे शत्रू आहेत. त्यांना महाराष्ट्र तोडायचा आहे. त्यांना मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची आहे. मुंबई व्यापाऱ्यांच्या हाती द्यायची आहे. अशा अमित शाह यांच्या चरणावर आपले खासदार टाकणं, मग ते कोणी असो, हे कोणतं देशहित आहे. यामध्ये महिलांचं काय कल्याण होणार आहे? ही महाराष्ट्रासह देशाशी प्रतारणा आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

Follow Us
बारामतीच्या पॉवर मॅरेथॉनमध्ये अजितदादांची आठवण; दत्तात्रय भरणे भावुक,
बारामतीच्या पॉवर मॅरेथॉनमध्ये अजितदादांची आठवण; दत्तात्रय भरणे भावुक, सुनेत्रा पवारांचेही केले कौतुक!
आधी भ्रष्टाचाराचे शिरोमणी म्हणाले, आता सोबत का घेताय? संजय राऊतांचा...
आधी भ्रष्टाचाराचे शिरोमणी म्हणाले, आता सोबत का घेताय? संजय राऊतांचा अमित शाहांना सवाल
मोठी बातमी! समाजवादी पक्षाचा खासदारांना व्हिप, तीन विधेयकांविरोधात...
मोठी बातमी! समाजवादी पक्षाचा खासदारांना व्हिप, तीन विधेयकांविरोधात मतदानाचे आदेश
भिवंडीत प्रसिद्ध मॉलमध्ये विक्रीसाठी ठेवलेल्या खजुरात अळ्या...
भिवंडीत प्रसिद्ध मॉलमध्ये विक्रीसाठी ठेवलेल्या खजुरात अळ्या; ग्राहकांमध्ये संताप!
डिलिमिटेशन विधेयकाविरोधात काँग्रेसची मोठी तयारी! मल्लिकार्जुन खर्गें..
डिलिमिटेशन विधेयकाविरोधात काँग्रेसची मोठी तयारी! मल्लिकार्जुन खर्गें घेणार स्टॅलिन-पवारांची प्रत्यक्ष भेट
छत्रपती संभाजीनगरमध्ये FDA चा मोठा दणका! 12 हॉटेल्ससह ब्लिंकइट...
छत्रपती संभाजीनगरमध्ये FDA चा मोठा दणका! 12 हॉटेल्ससह ब्लिंकइट स्टोअर्सचे परवाने निलंबित
डिलिमिटेशन विधेयकावरून दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग; राजकीय पक्षांची
डिलिमिटेशन विधेयकावरून दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग; राजकीय पक्षांची आज महत्त्वाची बैठक!
एकनाथ शिंदेंनी जपली माणुसकी; विनोद कांबळींच्या कुटुंबाला मदतीचा हात!
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंनी जपली माणुसकी; विनोद कांबळींच्या कुटुंबाला मदतीचा हात!
'रेजिम चेंज'वरून फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा; संविधान आणि लोकशाहीबाबत
'रेजिम चेंज'वरून फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा; संविधान आणि लोकशाहीबाबत मोठं विधान!
NDA मध्ये यायचं असेल तर अधिकृत पत्र द्या; प्रफुल्ल पटेलांचा पवारांना..
NDA मध्ये यायचं असेल तर अधिकृत पत्र द्या; प्रफुल्ल पटेलांचा पवारांना सूचक संदेश!