Vinod Kambli: ना धड बोलता येतंय, ना स्वतःच्या पायावर उभं राहता येतंय, एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर विनोद कांबळी काय म्हणाले? Video पाहून व्हाल स्तब्ध
Vinod Kambli On Eknath Shinde: एकेकाळी मैदान गाजवलेले विनोद कांबळी यांची सध्याची अवस्था बिकट झाली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विनोद कांबळी यांची भेट घेतली, या भेटीत नेमके काय घडले ते पाहा...

Vinod Kambli Reaction After DCM Eknath Shinde: भारतीय क्रिकेटमध्ये एकेकाळी आपल्या फलंदाजीने चर्चेत राहिलेले माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी सध्या कठीण परिस्थितीतून जात आहेत. मैदानावर मोठ्या गोलंदाजांना चोप देण्यासाठी ओळखले जाणारे कांबळी अनेक आरोग्य समस्यांना तोंड देत आहेत. यावेळी त्यांच्या कुटुंबीयांना काहीसा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कांबळी यांना मदतीचा हात पुढे केला आहे. त्यांनी केवळ त्यांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च उचलण्याचे आश्वासन दिले नाही, तर त्यांच्या दोन मुलांच्या शिक्षणासाठीही पाठिंबा जाहीर केला आहे.
विनोद कांबळी यांनी आपल्या कुटुंबीयांसह महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या शासकीय निवासस्थान नंदनवन येथे भेट घेतली. या भेटीनंतर शिंदे यांनी कांबळी यांना ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात आवश्यक उपचार मिळतील, असे आश्वासन दिले. त्यांच्या उपचाराचा खर्चही उचलला जाईल, जेणेकरून आर्थिक अडचणींमुळे त्यांच्या उपचारात अडथळा येणार नाही.
Mumbai, Maharashtra: Former cricketer Vinod Kambli, speaking about his meeting with Deputy Chief Minister Eknath Shinde says, “We had a very good conversation. I reminded him of Shane Warne, we will never forget Shane Warne” https://t.co/sYH6bqmo9P
— IANS (@ians_india) November 28, 2026
कांबळींच्या कुटुंबाला पाठिंबा देत, एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या दोन मुलांच्या शिक्षणासंदर्भात एक महत्त्वपूर्ण घोषणा केली. त्यांनी सांगितले की, शिवसेना कांबळींची मुले, जीझस आणि जोहाना यांना पाठिंबा देईल. एकनाथ शिंदे यांच्या म्हणण्यानुसार, विनोद कांबळी यांना मेंदूत रक्ताची गाठ, स्मरणशक्ती कमी होणे आणि इतर आरोग्य समस्या असल्याचे निदान झाले आहे. या बैठकीदरम्यान कांबळींची पत्नी, अँड्रिया ह्युइट, त्यांची दोन मुले आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे खेळपट्टी क्युरेटर, नदीम मेमन हे देखील उपस्थित होते.
शिंदे यांच्या भेटीनंतर विनोद कांबळी म्हणाले,” एकनाथ शिंदे साहेब मला बोलले की सगळं ठीक होईल, माझ्या मुलांना घेऊन मी त्यांना भेटायला आलो, यामुळे मला प्रोत्साहन मिळाले, मी शिंदेसाहेबांना सोबत खूप वेळ बोललो, मी त्यांना हेही सांगितले की, शेन वॉर्नला जसं मारलं होते, तसं मी शॅन वॉर्नला अजून मारेन असं बोलून दाखवले.” हे बोलत असताना विनोद कांबळी यांचे शब्द स्पष्ट ऐकूही येत नव्हते. ते अडखळत बोलत होते. त्यांची अशी अवस्था पाहून चाहत्यांना पुन्हा दु:ख झाले आहे.
