
लोकसभा निवडणुकीचे निकाल आले आहेत. 400 पारचा नारा देणाऱ्या भाजपला या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. स्वबळावर बहुमत मिळवण्यात देखील पक्ष अपयशी ठरलाय. गेल्या दोन लोकसभा निवडणुकांच्या तुलनेत हे वर्ष पक्षासाठी सर्वात वाईट ठरले आहे. यावेळी पक्ष केवळ 240 पर्यंत मर्यादित असल्याचे दिसत आहे. गेल्या निवडणुकीत पक्षाने स्वबळावर 303 जागा जिंकल्या होत्या. एनडीएमधील इतर मित्रपक्षासोबत आता भाजपला सत्ता स्थापन करावी लागणार आहे. पण विशेष म्हणजे देशातील 7 राज्ये आणि 4 केंद्रशासित प्रदेशांमध्ये भाजपला एकही जागा मिळालेली नाही.
या राज्यात लोकसभा निवडणुकीत भाजपच्या मतांचा टक्का ही घसरला आहे. यावेळी पक्षाला 240च्या आसपास जागा मिळाल्याचे दिसत आहे. गेल्या निवडणुकीत पक्षाला 303 जागा मिळाल्या होत्या. 2014 च्या निवडणुकीत पक्षाने स्वबळावर 282 जागांचा आकडा गाठला होता. यावेळी पक्षाला 36.61 टक्के मते मिळाली होती. 2019 मध्ये मतांची टक्केवारी 37.69 होती. मात्र 2014 मध्ये पक्षाला 31 टक्के मते मिळाली होती. गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत पक्षाला 19.66 टक्के मते मिळाली होती. गेल्या निवडणुकीत काँग्रेसला 52 जागा मिळाल्या होत्या. यावेळी काँग्रेस 100 च्या आसपास जागा जिंकत असल्याचे दिसत आहे.
पंजाबमध्ये भाजपला मोठा धक्का बसलाय. पंजाबमध्ये पक्ष पूर्णपणे भूईसपाट झालाय. गेल्या निवडणुकीत पक्षाचे दोन खासदार होते. यावेळी भाजपला पंजाबमध्ये एकही जागा मिळालेली नाही. पंजाबमध्ये भाजपने शिरोमणी अकाली दलशी युती केली असती तर येथे त्यांना फायदा झाला असता.
दक्षिण भारतातील तामिळनाडूमध्ये पक्षाला पुन्हा एकदा खाते उघडण्यात अपयश आलेय. पंतप्रधान मोदींचा दौरा आणि निवडणूक प्रचाराचा पक्षाला फायदा झाला नाही. राज्यातील 39 जागांपैकी पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही.
मणिपूरमधील लोकसभेच्या दोन जागा काँग्रेसने काबीज केल्यात. भाजपला येथे ही खाते उघडता आले नाही. भाजपला येथे 16.58 टक्के मते मिळाली. सिक्कीममध्ये लोकसभेची एक जागा आहे. सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाने ही जागा जिंकलीये.
या राज्यांमध्ये खाते उघडलेले नाही
तामिळनाडू
पंजाब
सिक्कीम
मणिपूर
मेघालय
मिझोराम
नागालँड
केंद्रशासित प्रदेश
पुद्दुचेरी
चंदीगड
लडाख
लक्षद्वीप
केंद्रशासित प्रदेशातही भाजपला झटका बसलाय. चंदीगडची जागा भाजपला गमवावी लागलीये. चंदीगड मतदारसंघातून भाजपचे उमेदवार संजय टंडन यांचा 2504 मतांनी पराभव झाला. गेल्या वेळी पक्षाच्या नेत्या किरण खेर यांनी या जागेवरून निवडणूक जिंकली होती. त्याचप्रमाणे पुद्दुचेरी, लडाख आणि लक्षद्वीपमध्येही पक्षाला खाते उघडता आले नाही.