AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lucknow news : ओळख लपवून प्रेमात पाडलं, मग दुसऱ्याच तरूणीसोबत दिसला शहनवाज; विरोध करताच गर्लफ्रेंडला कार बोनेटवरून फरपटत नेलं, व्हिडीओने खळबळ

Lucknow news : याप्रकरणी तरूणीने तक्रार दाखल केली असून पोलिस तपास करत आहेत. सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून, घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांचीही चौकशी करण्यात येत आहे.

Lucknow news : ओळख लपवून प्रेमात पाडलं, मग दुसऱ्याच तरूणीसोबत दिसला शहनवाज; विरोध करताच गर्लफ्रेंडला कार बोनेटवरून फरपटत नेलं, व्हिडीओने खळबळ
Lucknow Case
| Updated on: Sep 16, 2026 | 4:24 PM
Share

देशभरात हिट अँड रनच्या घटनांनी खळबळ माजली आहे. अवघ्या कही दिवसांपूर्वीच गुरुग्रामच्या गोल्फ कोर्सचा एक व्हिडीओ इंस्टाग्रामवर व्हायरल झाला होता. एक महिला बायकर तिची’अप्रिलिया RS 457 स्पोर्ट्स’ बाईक चालवत असताना एका कतारने पाठलाग करत तिला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र ती महिला न थांबवल्यावर त्याने बाईकला टक्कर मारली, ती महिला खाली पडून गंभीर जखमी झाली. तिच्या बाईकच्या कॅमेऱ्यामध्ये हा संपूर्ण प्रकार कैद झाला. आरोपी कार ड्रायव्हरला अखेर अठकही करण्यात आली. या घटनेवरून तापलेलं वातावरण अद्याप शांत झालेलं नसतानाच आता उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्येही हिट अँड रनचा भयानक प्रकार उघडकीस आला आहे. तिथे एका तरूणाने एका तरूणीला कारने टक्कर मारली. त्याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावरही व्हायरल झाला.

ती तरूणी चालत्या कारच्या बोनेटवर लटकलेली व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसून आलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार चालवणार आरोपी तरूण शहनवाज आणि अनामिका नावाची ती तरूणी आधीपासूनच एकमेकांना ओळखत होते. पोलिसांनी शहनवाजला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी अनामिका ही एका पार्कजवळ चहा पिण्यास गेली होती. त्याचवेळी शहनवाज हाँ देखील तिथे पोहोचला, त्याच्यासोबत एक दुसरी तरूणी देखील होती.अनामिकाने शहनवाजला ओळखलं आणि त्या दोघांमध्ये वादावादी सुरू झाली.

ते दोघो आधीपासून एकमेकांना ओळखत होते एकमेकांच्या संपर्कात होते, असं सांगितलं जातयं. सूत्रांच्या माहितीनुसार, तरूणीने असा आरोप लावला की शाहनवाजने त्याची ओळख लपवली आणि तिला प्रेमात पाडलं. मात्र तिला त्याची खरी ओळख समजल्यानंतर तिने त्याला जाब विचारला आणि विरोध केला.

भांडणानंतर काढला पळ

पाहता पाहता त्यांचा वाद वाढला, त्यानंतर शाहनवाजने कार घेऊन तिथून निघून जाण्याचा प्रयत्न केला. अनामिकाने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला आणि ती त्याच्या कारसमोर जाऊन उभी राहिली. मात्र ते पाहूनही त्या तरूणाने कार पुढे नेली. व्हायरल व्हिडीओमध्ये ती तरूणी कारच्या बोनेटवर लटकलेली स्पष्टपणे दिसून आली. ती जोरजोरात ओरडत होती. काही अंतर पुढे गेल्यावर ती कारवच्या बोनेटवरून खाली पडली, त्यानंतरही न थांबता त्या तरूणाने कार तशीच पुढे नेली आणि तो तिथून निघून गेला.

तरूणी जखमी, रुग्णालयात दाखल

कारवरून खाली पडल्यामुळे ती तरूणी जखमी झाली. उपचारांसाठी तिला रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती समोर आली, मात्र ती कितपत गंभीर जखमी आहे, ती माहिती अजून स्पष्टपणे समोर आलेली नाही. जखमी तरूणीने तक्रार दाखल केली. त्यानंतर व्हायरल व्हिडीओच्या आधारेपोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे. पोलिसांनी घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांचीही पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. त्या दोघांमध्ये नेमका वाद कशावरून झाला हे शोधून काढण्यात येत आहे.

Follow Us
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं..
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं काय घडतंय?
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो...
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो’ अभियानाची तुफान चर्चा
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा, आत्मलिंग...
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा आणि आत्मलिंग कथा
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई पुन्हा राज्यभर चर्चेत
आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला
Ganeshotsav | आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला महत्त्वाचा संदेश
कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा!
Radhakrishna Vikhepatil | कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा! राधाकृष्ण विखे पाटलांचं मनोज जरांगेंना आवाहन
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला
Nitin Nabin | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राजकीय कारण काय?
जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती
ChandrakantPatil | जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती; पुढे म्हणाले...
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी फडणवीस-नबीन; सिद्धिविनायक मंदिरात...
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी CM फडणवीस- नितीन नबीन; सिद्धिविनायक मंदिरात घेतले बप्पांचे दर्शन!