AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कॅन्सरच्या रुग्णांना मोठा झटका…औषधांच्या किंमतीत 50 टक्क्याने वाढ; का घेतला सरकारने असा निर्णय?

कॅन्सर रुग्णांसाठी धक्कादायक बातमी आहे, कारण महत्त्वाच्या औषधांच्या किंमतीत 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. कार्बोसिसप्लेटिनसारखी कर्करोगरोधी औषधे आता महाग झाली आहेत. प्लॅटिनमच्या कच्च्या मालाच्या तुटवड्यामुळे आणि पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण संस्थेने (NPPA) हा निर्णय घेतला आहे.

कॅन्सरच्या रुग्णांना मोठा झटका...औषधांच्या किंमतीत 50 टक्क्याने वाढ; का घेतला सरकारने असा निर्णय?
Image Credit source: प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Jun 12, 2026 | 2:44 PM
Share

करण्यात आली आहे. सरकारच्या दवा मूल्य निर्धारण संस्थेने (National Pharmaceutical Pricing Authority) काही महत्त्वाच्या कॅन्सररोधी औषधांच्या किंमतीत वाढ करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे कॅन्सरच्या रुग्णांच्या खर्चात वाढ होणार आहे.

एनपीपीएने याबाबत प्रतिक्रियाही दिली आहे. औषधांच्या किंमतीत वाढ का करण्यात आली या मागचं कारणही एनपीपीएने दिलं आहे. प्लॅटिनमवरील आधारीत कच्च्या मालाच्या (Platinum) किंमतीत अव्वाच्या सव्वा वाढ झाली आहे. त्यामुळे या कच्च्या मालाचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. या कच्च्या मालाच्या आपूर्ती बाबतची चिंता आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं एनपीपीएचं म्हणणं आहे. वाढलेल्या किंमती कॅन्सरच्या सर्वच औषधांना लागू होणार नाही. तर मुख्यत्वेकरून कॅन्सरच्या दोन औषधांच्याच किंमती वाढल्या आहेत. यात कार्बोप्लेटिन (Carboplatin) आणि सिस्प्लाटिन (Cisplatin) आदी कॅन्सरच्या उपचारासाठी उपयोगात येणाऱ्या औषधांच्याच किंमती वाढल्या आहेत, असं सांगण्यात आलं आहे.

किती वाढल्या किंमती ?

नव्या आदेशानुसार, कार्बोप्लाटिन इंजेक्शनची किमत जवळपास 60.49/ml ने वाढून ₹90.74/ml करण्यात आली आहे. तर सिस्प्लाटिन (Cisplatin Injection)ची किंमत ₹7.26/ml ने वाढवून ₹10.89/ml करण्यात आली आहे.

सरकार काय म्हणालं ?

एनपीपीच्या म्हणण्यानुसार, DPCOच्या पॅरा 19 चा वापर करून या किंमती वाढवण्यात आल्या आहेत. अत्यंत आवश्यक असलेल्या औषधांचा साठा पुरेसा राहावा यासाठी या किंमती वाढवण्यात आल्या आहेत. या औषधांचा प्रामुख्याने ओवेरियन, यकृत, ब्लॅडर आणि टेस्टिकुलर कॅन्सरच्या उपचारासाठी वापर करण्यात येतो. त्याशिवाय इतर कॅन्सरमध्येही या औषधांचा वापर केला जातो. काही दिवसांपूर्वीच औषध कंपन्यांनीही इशारा दिला होता. वाढत्या खर्चामुळे उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. बाजारात औषधांचा तुटवडा निर्माण होऊ शकतो, असा इशारा औषध निर्मात्या कंपन्यांनी दिला होता. आता यातून मार्ग काढण्यासाठी सरकारने औषधांच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून औषधांचा तुटवडा निर्माण होऊ नये.

एनपीपीएच्या म्हणण्यानुसार, रुग्णांचं हित आणि औषधांच्या निरंतर उपलब्धतेला ध्यानात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वीही प्लॅटिनमच्या कमतरतेमुळे या औषधांच्या तुटवड्यांच्या बातम्या आल्या होत्या.

Follow Us
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालय...
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालयाचा मोठा निर्णय
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत...
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत दौरा, CM फडणवीस देखील ब्रिक्स परिषदेसाठी रवाना
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले...
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले स्वागत
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन; आणीबाणीच्या काळात...
मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगेंना कोर्टाचा दणका
मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगेंना कोर्टाचा दणका
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल