मोठी राजकीय घडामोड, मायावतींनी थेट पुतण्यालाच पक्षातून काढले; सासऱ्यामुळे अडचणी?

उत्तर प्रदेशच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. मायावतींनी पुतण्या आकाश आनंदला बहुजन समाज पार्टीच्या प्राथमिक सदस्यत्वातून मुक्त केलं आहे. त्यांच्या मते, आकाशचे सासरे अशोक सिद्धार्थ यांच्या भूमिकेमुळे आणि कौटुंबिक प्राधान्यामुळे ही कारवाई झाली. यामुळे राज्यातील राजकारण तापले असून, 2027च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी बसपमध्ये मोठे बदल अपेक्षित आहेत.

मोठी राजकीय घडामोड, मायावतींनी थेट पुतण्यालाच पक्षातून काढले; सासऱ्यामुळे अडचणी?
mayawati
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 10, 2026 | 10:17 AM

उत्तर प्रदेशच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी त्यांचा पुतण्या आकाश आनंद यांना पक्षातून काढून टाकलं आहे. मायावती यांनी यापूर्वी 3 सप्टेंबर 2026 रोजी आकाश आनंदला पक्षाचे राष्ट्रीय संयोजक पदावरून हटवलं होतं. मात्र आता मायावती यांनी आकाश आनंद यांना पक्षाच्या प्राथमिक सदस्य पदावरून मुक्त केलं आहे. उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच मायावती यांनी हा मोठा निर्णय घेतल्याने उत्तर प्रदेशच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

आकाश आनंद यांचे सासरे आणि माजी राज्यसभा सदस्य अशोक सिद्धार्थ यांनी राजकारणातून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर मायावतींनी प्रतिक्रिया दिली होती. अशोक सिद्धार्थ यांनी आधीच हा निर्णय घेतला असता तर आकाशला पक्षाच्या पदावरून हटवलं गेलं नसतं, असं मायावती म्हणाल्या होत्या. अशोक सिद्धार्थ यांनी वेळीच निर्णय घेतला नाही. त्यामुळे आकाश आनंद यांना सातत्याने अडचणीचा सामना करावा लागला. त्यामुळे संपूर्ण वातावरण त्यांच्या विरोधात गेल्याचं मायावती म्हणाल्या.

Loading...

डबल माइंड व्यक्ती…

मायावती यांनी ट्विट करून आकाश आनंद यांच्या भूमिकेवरही नाराजी व्यक्त केली आहे. आकाश पूर्वी माझ्या सर्व एक्स पोस्ट रिपोस्ट करायचे. पण अशोक सिद्धार्थशी संबंधित माझी पोस्ट त्यांनी रिपोस्ट केली नाही. यावरून आकाश पक्षापेक्षा कुटुंबाला अधिक महत्त्व देत असल्याचं स्पष्ट होतं. त्यामुळे जो व्यक्ती डबल माइंड होऊन काम करतो, तो पक्षाचं काय भलं करेल? असा सवाल मायावतींनी उपस्थित केला आहे.

आधीच संन्यास घेतला असता तर…

मायावती यांनी आकाश आनंद यांचे सासरे अशोक सिद्धार्थ यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. सिद्धार्थ यांना जर आकाश आनंदच्या भविष्याची आणि बहुजन चळवळीची चिंता असती तर त्यांनी आधीच राजकारणातून संन्यास घेतला असता. पण त्यांची नियत आणि वैयक्तिक महत्त्वकांक्षेवर अजूनही प्रश्नचिन्ह आहेत, असं मायावती यांनी म्हटलं आहे.

सर्वजन हिताय, सर्वजन सुखायचा नारा

मायावतींनी हा मोठा निर्णय घेतल्यानंतर कार्यकर्त्यांवर मोठी कामगिरी दिली आहे. विरोधकांच्या चालबाजीचा मुकाबला करा. उत्तर प्रदेशमध्ये 2027मध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत. या निवडणुकीत सर्वजन हिताय, सर्वजन सुखायच्या सिद्धांतावर काम करायचं आहे. सर्वांनी एकजुटीने काम करून पूर्ण बहुमताचं सरकार स्थापन करायचं आहे, असं आवाहन मायावती यांनी केलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us