AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! ममता बॅनर्जींच्या तब्बल 19 खासदारांचे बंड? यादी पहिल्यांदाच समोर

आमदारांच्या बंडानंतर आता खासदारदेखील बंड करणार असल्याचे म्हटले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार तृणमूल काँग्रेसचे एकूण 19 खासदार बंड करण्याच्या तयारीत आहेत. या खासदारांची यादीदेखील समोर आली आहे.

मोठी बातमी! ममता बॅनर्जींच्या तब्बल 19 खासदारांचे बंड? यादी पहिल्यांदाच समोर
mamata banerjeeImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 10, 2026 | 9:17 PM
Share

TMC MP Revolt : पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री तथा तृणमूल काँग्रेस पक्षाच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. त्यांचा पक्षाची शकलं होण्याची दाट शक्यता आहे. साधारण 58 आमदार त्यांच्याविरोधात उभे ठाकले आहेत. आमदारांच्या बंडानंतर आता खासदारदेखील बंड करणार असल्याचे म्हटले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार तृणमूल काँग्रेसचे एकूण 19 खासदार बंड करण्याच्या तयारीत आहेत. या खासदारांची यादीदेखील समोर आली आहे. विशेष म्हणजे ममता बॅनर्जी यांच्या अत्यंत जवळ असणाऱ्या आणि विश्वासू असणाऱ्या काही खासदारांचाही यात समावेश आहे.

खासदारांनी दिले लोकसभा अध्यक्षांना पत्र

मिळालेल्या माहितीनुसार तृणमूल काँग्रेसच्या 19 खासदारांनी बंड केले आहे. या सर्वच खासदारांनी एक पत्र लोकसभेच्या खासदारांना दिले आहे. या बंडखोर खासदारांच्या यादीत अभिनेता आणि राजकीय नेते शत्रूघ्न सिन्हा, माजी क्रिकेटर युसुफ पठाण, ममता बॅनर्जी यांच्या विश्वासू मानल्या जाणाऱ्या सयोनी घोष यांचा समावेश आहे. खासदारांच्या या बंडाविषयी मात्र तृणमूल काँग्रेसने अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही.

बंडखोर खासदारांच्या यादीत कोणाकोणाचा समावेश?

– काकोली घोष (बारासत) – जगदीशचंद्र बसुनिया (कूचबिहार) – खलीलूर रहमान (जंगीपूर) – युसूफ पठाण (बहारमपूर) – अबू ताहिर खान (मुर्शिदाबाद) – पार्थ भौमिक (बराकपूर) – बापी हलदर (मथुरापूर) – सयोनी घोष (जादवपूर) – माला रॉय (कोलकाता दक्षिण) – मिताली बॅग (आरामबाग) – दीपक अधिकारी (घाटाळ) – कालीपद सोरेन (झारग्राम) – जून मालिया (मेदिनीपूर) – अरुप चक्रवर्ती (बांकुरा) – डॉ. शर्मिला सरकार (वर्धमान पूर्व) – शत्रुघ्न सिन्हा (आसनसोल) – असितकुमार मल (बोलपूर) – शताब्दी रॉय (बीरभूम) – रचना बॅनर्जी (हुगली)

खासदारांचे पुढचे नियोजन काय?

दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार बंड केलेल्या खासदारांनी सध्याच राजीनामा न देण्याचा तसेच सध्याच भाजपात सामील न होण्याचा निर्णय घेतला आहे. थेट भाजपात जाण्यापेक्षा एनडीएला पाठिंबा देणारा एक वेगळा गट म्हणून काम करण्याची या भूमिका या बंडखोर खासदारांची आहे, असे सांगितले जात आहे. पक्षांतर विरोधी कायद्याच्या कचाट्यात सापडू नये यासाठी हा निर्णय घेतला जाऊ शकतो. या बंडखोर खासदारांचे नेतृत्त्व काकोली घोष करत आहेत.

Follow Us
लाठ्या-बंदुका आणा... मी तिरंगा घेऊन येतो! सरकारला ठाकरेंचा थेट इशारा
Uddhav Thackeray | लाठ्या-बंदुका आणा... मी तिरंगा घेऊन येतो! सरकारला उद्धव ठाकरेंचा थेट इशारा
दिल्लीच्या आंदोलनाची धग मुंबईत! आदित्य -अमित एकाच मंचावर
Dadar | दिल्लीच्या आंदोलनाची धग मुंबईत! शिवाजी पार्कवर विद्यार्थ्यांचा महासागर; आदित्य ठाकरे-अमित ठाकरे एकाच मंचावर
पंतप्रधान मोदींचा अचानक Gen Z अवतार! सेल्फी व्हिडिओमागचं गुपित काय?
Pm Narendra Modi | पंतप्रधान मोदींचा अचानक Gen Z अवतार! सेल्फी व्हिडिओमागचं गुपित काय?
विद्यार्थ्यांवर पॅलेट गन का चालवली? जखमी आंदोलकाला समोर आणत....
Rahul Gandhi | विद्यार्थ्यांवर पॅलेट गन का चालवली? जखमी आंदोलकाला समोर आणत राहुल गांधींचा सरकारला थेट सवाल
CJP च्या दोन मागण्या मान्य, मात्र प्रधानांच्या राजीनाम्याचं काय?
CJP च्या दोन मागण्या मान्य, मात्र धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचं काय? काय म्हणालं सरकार?
पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा...
NEET Paper Leak Update | पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा, सरकारचा मोठा निर्णय
CJP-सरकारची निर्णायक बैठक सुरू; प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम
मोठी बातमी! CJP-सरकारची निर्णायक बैठक सुरू; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम
आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
Abhijeet Dipke | आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच रद्द?
Delhi Police News | विद्यार्थी आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच केल्या रद्द, नवा आदेश काय?
हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप
Varsha Gaikwad | मुंबई पोलिसाकडून महिला आंदोलकाशी गैरवर्तन? हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप