खुशीने माझी बायको मुजीबला देतोय… पतीने स्वत: शोधला पत्नीसाठी नवा नवरा; हैराण करणारे प्रकरण समोर!

Man Search Husband for own Wife: उत्तर प्रदेशातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मेरठमधील एका व्यक्तीने आपल्या पत्नीसाठी नवरा शोधला आहे. यामागील कारण हैराण करणारे आहे.

खुशीने माझी बायको मुजीबला देतोय... पतीने स्वत: शोधला पत्नीसाठी नवा नवरा; हैराण करणारे प्रकरण समोर!
Husband Wife
| Updated on: Nov 03, 2025 | 3:58 PM

उत्तर प्रदेशातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मेरठमधील एका व्यक्तीने आपल्या पत्नीसाठी नवरा शोधला आहे. यामागील कारण हैराण करणारे आहे. येथील एका व्यक्तीने वडील, बहीण आणि तिच्या नवऱ्याच्या विरोधात पोलीसात तक्रार दाखल केली आहे. त्याने या तिघांवर आपले घर आणि जमीन बळकावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. हे घर माझ्या सासरच्या लोकांनी बांधलेले असून ते माझ्या पत्नीच्या नावावर आहे. या घरावर वडील आणि बहि‍णीचा डोळा आहे. यासाठी त्यांनी माझ्यावर हल्लाही केला असा आरोपही या व्यक्तीने केला आहे.

या व्यक्तीने म्हटलं की, ‘माझे वडील आणि बहीण माझ्या कुटुंबाला त्रास देत आहेत. त्यामुळे मी एका तरुणाला माझ्या पत्नीशी कोर्टात लग्न करण्यास आणि तिला आणि माझ्या मुलांना सोबत घेऊन जाण्यास राजी केले. मी राहतो ते घर माझ्या पत्नीच्या नावावर आहे. त्यामुळे जोपर्यंत ते मला राहु देत आहेत तोपर्यंत मी तिथेच राहू इच्छितो.’

ते मला वेडा सिद्ध करण्याच्या प्रयत्नात आहेत

ही घटना सरूरपूर पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या पांचाली बुझुर्ग गावात घडली आहे. पाडित व्यक्तीने वडील, बहीण आणि तिच्या पतीविरुद्ध पोलीसांत तक्रार दिली आहे. यात त्याने “माझे वडील, बहीण आणि तिचे पती संपत्तीसाठी माझा छळ करतात. त्यांनी माझ्यावर दोनदा हल्ला घडवून आणला आहे. यामुळे मला मानसिक त्रास झाला आहे. हे लोक मला वेडा सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच के मला खोट्या प्रकरणांमध्ये अडकवण्याची धमकी देत आहेत. ते माझ्या पत्नीच्या मालकीच्या संपत्तीचा अर्धा हिस्सा मागत आहेत. माझी पत्नी आणि मुलांना त्रास होऊ नये म्हणून मी माझ्या पत्नीचे लग्न मुजीबशी लावत आहे. जर मला आणि माझ्या पत्नीला आणि मुलांना त्रास झाला तर याला जबाबदार माझे वडील, बहीण आणि तिचा पती असेल.

मला आणि माझ्या पत्नीला वेगळे करण्याचा प्रयत्न करण्यात आला

पुढे आपल्या तक्रारीत या तरूणाने म्हटले की, ‘मी मुजीबला माझ्या पत्नीशी लग्न करण्याची विनंती केली. दोघांनी आधी निकाह करावा आणि नंतर कोर्ट मॅरेज करावे असं मी सांगितले. त्याने माझी विनंती मान्य केली आहे, तो माझ्या पत्नीशी लग्न करण्यास तयार आहे. मला आणि पत्नीला त्रास होऊ नये म्हणून मी हा निर्णय घेतला आहे.’ पत्नीच्या कुटुंबावर आरोप करताना या तरूणाने म्हटले की, माझ्या पत्नीचे कुटुंब माझ्यावर खोटे आरोप करत आहे. त्या लोकांना मला आणि पत्नीला वेगळे करण्याचाही प्रयत्न केला. दरम्यान, पोलीस सध्या या प्रकरणाची चौकशी करत असल्याची माहिती समोर आली आहे.