Video : लाथा, बुक्क्या घातल्या, घरात डांबलं, डिलिव्हरी बॉयसोबत भयंकर कृत्य, घरमालकाने रागात….
एक तरुण डिलिव्हरी बॉय एका घरी ऑर्डर केलेले सामान द्यायला आला होता. त्याने घरासमोर येत दाराची बेल वाजवली. बेल वाजताच घरातून एक व्यक्ती समोर आली.

Delivery Boy Beating Video : आजकाल जेवण मागवणे, एखादे सामान ऑनलाईन मागवणे खूपच सोपे झाले आहे. वेगवेळ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून तुम्हाला अवघ्या काही मिनिटात जेवण घरपोच मिळते. परंतु जेवण घरपोच पोहोचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयबाबत अनेक धक्कादायक प्रसंग घडत आहेत. तशा काही घटनादेखील समोर आल्या आहेत. जेवण उशिराने का दिले? असा सवाल करत अनेकांनी याच डिलिव्हरी बॉयला मारहाण केल्याचेही प्रकार घडले आहेत. दरम्यान, सध्या तर खूपच धक्कादायक घटना घडली आहे. एका डिलिव्हरी बॉयला तर माणसाने आपल्या घरात डांबून मारहाण केली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला असून संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार समोर आलेली घटना उत्तर प्रदेशातील मेरठ येथील आहे. मेरठमध्ये भावनापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गंगा हाईट्स या इमारतीत ही घटना घडली. समोर आलेल्या व्हिडीओनुसार एक तरुण डिलिव्हरी बॉय एका घरी ऑर्डर केलेले सामान द्यायला आला होता. त्याने घरासमोर येत दाराची बेल वाजवली. बेल वाजताच घरातून एक व्यक्ती समोर आली. त्यानंतर त्या व्यक्तीने डिलिव्हरी बॉयशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. डिलिव्हरी बॉय आहेस, डिलिव्हरी बॉयसारखंच राहा, असा दमही संबंधित व्यक्तीने भरल्याचे दिसत आहे.
हा वाद पुढे वाढल्यावर घरातून बाहेर आलेल्या व्यक्तीने डिलव्हरी बॉयला थेट लाथआणइ बुक्क्या घातल्याचेही दिसत आहे. हा सर्व प्रकार घडत असताना डिलिव्हरी बॉय सर..सर…म्हणत स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न करतोय. मात्र रागाच्या भरात घरमालकाने त्याला थेट घरात ओढून दरवाजा बंद केल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसतंय. त्यानंतर घरात काहीतरी वाद झाल्याचे, मारझोड झाल्याचे या व्हिडीओत दिसत आहे. थोड्या वेळाने डिलिव्हरी बॉय दरवाजा उघडून बाहेर पडताना दिसत आहे.
In UP’s Meerut, a delivery agent, who got a bit delayed with the order, was assualted by a resident of Ganga Heights apartment. The man could be seen assaulting the delivery agent immediately after a brief verbal confrontion. The victim was later taken inside the apartment and… pic.twitter.com/MebFmkE9Q8
— Piyush Rai (@Benarasiyaa) August 14, 2026
हा व्हिडीओ समोर येताच सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जातोय. मारहाण करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करावी, अशी मागणी केली जातेय. तसेच असे प्रकार भविष्यात घडू नयेत म्हणून वेळीच कठोर उपायोजना कराव्यात, अशी मागणी केली जातेय.