PM Narendra Modi: कोण आहे तो गायक ज्याच्या भजनावर PM नरेंद्र मोदींनी धरला ठेका? ‘मन की बात’ मध्येही केले कौतुक
PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या ११० व्या जयंतीनिमित्त दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यांनी 'भजन क्लबिंग' कार्यक्रमात सहभाग घेतला. दरम्यान, ते ठेका धरताना दिसले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी अलीकडेच ‘भजन क्लबिंग’ इव्हेंटमध्ये सहभागी झाले. तिथे त्यांनी चित्रपट ‘हनुमान अंश’मधील प्रसिद्ध गाणे ‘जब जिद पर आई पार्वती’ ऐकले. ते सिंगर साधू तिवारी यांच्या परफॉर्मन्सचा आनंद घेताना दिसले. यादरम्यान त्यांनी पारंपरिक खंजरीही वाजवली. हा सांस्कृतिक कार्यक्रम पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या ११०व्या जयंतीच्या उत्सवाचा भाग होता. यामध्ये भक्ती संगीत तरुणांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. लोकांचे सर्वाधिक लक्ष त्या महिला सिंगरकडे गेले, जी पीएम मोदींच्या उपस्थितीत स्टेजवर सुंदर भजने गाताना दिसत होती.
या सांस्कृतिक कार्यक्रमात गाणाऱ्या सिंगरचे नाव प्राची अग्रवाल आहे. त्या आपल्या भाऊ राघव अग्रवाल यांच्यासोबत स्टेजवर भजने गातात. बहीण-भावाची ही जोडी भारतात ‘भजन क्लबिंग’ चळवळ लोकप्रिय करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. ही जोडी पारंपरिक भजन आधुनिक कॉन्सर्ट, लाइट्स आणि इलेक्ट्रॉनिक बीट्ससोबत कम्पोज करुन ‘जेन जी’साठी सादर करते. पीएम नरेंद्र मोदींनी आपल्या ‘मन की बात’ कार्यक्रमात त्यांच्या अनोख्या आधुनिक आध्यात्मिक संकल्पनेची प्रशंसा केली होती.
भाऊ-बहिणीचा आध्यात्मिक प्रवास
राघव आणि प्राची शोसाठी खूप प्रवास करतात. जेव्हा ते स्टेजपासून दूर असतात, तेव्हा ते इतर बहिण-भावासारखे असतात. ते छोट्या-छोट्या गोष्टींवर भांडत असतात. राघव म्हणतात की, “आम्ही स्टेजवर पाऊल ठेवताच आमची आपसी स्पर्धा एका खोल, आध्यात्मिक ताळमेळात रूपांतरित होते.” प्राची २३ वर्षांच्या आहेत. त्या भावापेक्षा लहान आहेत. त्या हसत सांगतात की, “आम्ही प्रत्येक गोष्टीवर भांडत असतो. शोपूर्वी आम्ही नेहमी भांडतो. म्हणूनच आमच्या मॅनेजरचे काम आम्हाला व्यवस्थापित करण्यापेक्षा आम्हा दोघांना नियंत्रित करणे जास्त असते.”
#WATCH | प्रधानमंत्री @narendramodi ने पंडित दीनदयाल उपाध्याय की 110वीं जयंती के अवसर पर दिल्ली के दीनदयाल उपाध्याय पार्क में ‘भजन क्लबिंग’ कार्यक्रम में हिस्सा लिया और भक्ति भजनों से सजी भावपूर्ण संध्या का आनंद लिया। #PMModi #DeendayalUpadhyayaJayanti #NewDelhi… pic.twitter.com/FbazCH6l8U
— डीडी न्यूज़ (@DDNewsHindi) September 25, 2026
कॉर्पोरेट नोकरी सोडून सुरू केले भजन जॅमिंग
राघव आणि प्राची यांनी दीड वर्षांपूर्वी आपल्या कॉर्पोरेट फायनान्सच्या नोकऱ्या सोडून पूर्णवेळ संगीत स्वीकारले. त्यांनी आपल्या निर्णयाबद्दल आई-वडिलांना सांगितले, तेव्हा मोठा भाऊ म्हणून राघवने ही जबाबदारी उचलली. एका अहवालानुसार, त्यांनी मजेशीर अंदाजात सांगितले की, “मी आधी माझी नोकरी सोडली आणि नंतर एक वर्षाने प्राचीलाही तिची नोकरी सोडायला लावली. पण आमचे आई-वडील खूप सपोर्टिव्ह आहेत. त्यांना गोष्ट समजली आणि आता आम्ही आमचे नाते मजबूत करत असतानाच भजन जॅमिंगही करत आहोत.”