गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावर मिग 29K लढाऊ विमान कोसळलं; सुदैवाने पायलट बचावला

| Updated on: Oct 12, 2022 | 12:48 PM

या मोठ्या दुर्घटनेत पायटल बचावला आहे. मात्र, विमान दुर्घटनेवर अनेक सवाल केले जात आहे. या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून त्यातून सर्व माहिती समोर येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावर मिग 29K लढाऊ विमान कोसळलं; सुदैवाने पायलट बचावला
गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावर मिग 29K लढाऊ विमान कोसळलं
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

पणजी: गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावर मिग 29K हे लढाऊ विमान कोसळलं आहे. गोव्याच्या समुद्र तटावर नियमित उड्डाण भरताना विमान क्रॅश झालं. विमानात तांत्रिक बिघाड जाल्याने ही दुर्घटना झाल्याचं सांगण्यात येतं. सुदैवाने या दुर्घटनेत पायलट बचावला आहे. पायलटची प्रकृती स्थिर असल्याचं नौदलाने स्पष्ट केलं आहे. दरम्यान, या दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

काही वेळापूर्वीच मिग 29k लढाऊ विमान कोसळल्याची माहिती समोर आली आहे. नियमितपणे उड्डाण भरणाऱ्या विमानांपैकी हे एक विमान आहे. पायलट हे विमान घेऊन समुद्राच्यावरून जात होता. त्याचवेळी टेक्निकल एरर आला आणि विमान तिथेच क्रॅश झालं.

हे सुद्धा वाचा

या मोठ्या दुर्घटनेत पायटल बचावला आहे. मात्र, विमान दुर्घटनेवर अनेक सवाल केले जात आहे. या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून त्यातून सर्व माहिती समोर येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

भारत सरकारने रशियाकडून एकूण 25 मिग-29K लढाऊ विमान खरेदी केले होते. 2011मध्ये या पैकी एक विमान दुर्घटनाग्रस्त झालं होतं. त्यात दोन पायलटांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या विमानांच्या विश्वासहार्यतेवर प्रश्न उपस्थित केले गेले होते.

 

मिग 29Kचे एअरफ्रेम, आरडी एमके-33 इंजिन आणि फ्लाय बाय वायर सिस्टिमशी संबंधित समस्या या विमानात असल्याचा ठपका कॅगने ठेवला होता. या विमानांची सर्व्हिसेबिलटी खूप कमी असल्याचंही या अहवालात म्हटलं होतं.

काही दिवसांपूर्वी अरुणाचल प्रदेशातील तवांग जिल्ह्यात लष्कराचं चिता हेलिकॉप्टर दुर्घनाग्रस्त झालं होतं. त्यात लष्कराचे एक लेफ्टिनेंट कर्नल शहीद झाले होते. तर पायलट गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर पुन्हा एकदा चेतक आणि चित्ता या हेलिकॉप्टरचा मुद्दा ऐरणीवर आला होता. हे दोन्ही हेलिकॉप्टर जुने झाले असून त्यात आधुनिक उपकरणांची कमी असल्याचं सांगितलं जात होतं.