आज रात्री 8 वाजता शिक्षण मंत्रालय करणार सर्वात मोठी घोषणा; सीजेपीच्या आंदोलनाला मोठं यश

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून आज रात्री आठ वाजता एक मोठी घोषण करण्यात येणार आहे. शिक्षण मंत्रालय नेमकी काय घोषणा करणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. नीट पेपर लीक प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर या घोषणेला महत्त्व प्राप्त झालं आहे.

आज रात्री 8 वाजता शिक्षण मंत्रालय करणार सर्वात मोठी घोषणा; सीजेपीच्या आंदोलनाला मोठं यश
dharmendra pradhan
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 24, 2026 | 7:13 PM

नीट परीक्षेचा पेपर लीक झाल्यामुळे सध्या देशभरात वातावरण चांगलंच तापलं आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे, त्यासाठी गेल्या महिनाभरापासून कॉकरोच जनता पार्टीचं दिल्लीमधील जंतर मंतर मैदानावर आंदोलन सुरू आहे. सीजेपीच्या वतीने संसदेवर देखील मोर्चा काढण्यात आला होता. दरम्यान यामुळे आता राष्ट्रीय टेस्टिंग एजेन्सी (NTA) च्या कार्यपद्धतीवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून आज रात्री आठ वाजता एक मोठी घोषणा करण्यात येणार आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिक्षण मंत्रालयाकडून NTA मधील सुधारणांशी संबंधित महत्त्वाचे निर्णय आणि नवीन प्रणाली जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. परीक्षेमध्ये पारदर्शकता आणि सुरक्षा यांची जबाबदारी निश्चित करण्याच्या दिशेनं हे एक मोठं पाऊल असणार आहे, असं बोललं जात आहे. मात्र अद्याप यासंदर्भातील मंत्रालयाकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये.

नीट परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर देशभरात मोठा गोंधळ उडाला होता. अखेर ही परीक्षा रद्द करून पुन्हा परीक्षा घेण्यात आली. नीट परीक्षेचा पेपर रद्द झाल्यानंतर  विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या देखील काही घटना घडल्या होत्या. त्यामुळे वातावरण चांगलंच तापलं. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी कॉकरोच जनता पार्टीकडून करण्यात आली. शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी गेल्या महिनाभरापासून कॉकरोच जनता पार्टीचं जंतर मंतरवर आंदोलन सुरू आहे.

विद्यार्थ्यांकडून संसदेवर देखील मोर्चा काढण्यात आला होता, या मोर्चात आंदोलक आणि पोलीस आमने-सामने आले. पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला.  आंदोलकांना पांगवण्यासाठी आश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या, त्यामुळे हे आंदोलन चांगलंच पेटलं. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर आज रात्री आठ वाजता शिक्षण मंत्रालयाकडून एक मोठी घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिक्षण मंत्रालयाकडून NTA मधील सुधारणांशी संबंधित महत्त्वाचे निर्णय आणि नवीन प्रणाली जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. या घोषणेकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us