संतापजनक ! अल्पवयीन मुलीचं अपहरण, नंतर सलग आठ दिवस सामूहिक बलात्कार, नराधम अटकेत

उत्तर प्रदेशचा मैनपुरी जिल्हा एका अल्पवयीन मुलीवरील सामूहिक बलात्काराच्या घटनेने हादरला आहे (Minor Girl gang raped in mainpuri UP).

संतापजनक ! अल्पवयीन मुलीचं अपहरण, नंतर सलग आठ दिवस सामूहिक बलात्कार, नराधम अटकेत
ही गोष्ट कोणाला समजली तर तुझे बॉक्सिंग करिअर खराब करेन, अशी धमकीही या प्रशिक्षकाने मुलीला दिली होती.
| Updated on: Feb 01, 2021 | 11:37 PM

लखनऊ : उत्तर प्रदेशचा मैनपुरी जिल्हा एका अल्पवयीन मुलीवरील सामूहिक बलात्काराच्या घटनेने हादरला आहे. आरोपींनी आधी पीडितेचं अपहरण केलं. त्यानंतर सलग आठ दिवस तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीनही आरोपींना अटक केली आहे (Minor Girl gang raped in mainpuri UP).

पीडित 13 वर्षीय मुलगी आपल्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. काही नराधमांनी 15 जानेवारी रोजी जबरदस्ती तिला एका गाडीत डांबत अपहरण केलं. त्यानंतर ते सगल आठ दिवस तिच्यावर अत्याचार करत राहिले. यादरम्यान पीडितेचे कुटुंबीय तिचा शोध घेत होते. सुदैवाने तिच्या कुटुंबियांना तिचा तपास लागला. त्यांच्या प्रयत्नांमुळे पीडित मुलगी नराधमांच्या तावडीतून सुटली. सध्या पीडितेवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

या प्रकरणी पीडितेच्या कुटुंबियांनी पोलिसात अपहरण आणि बलात्काराची तक्रार केली. मात्र, पोलिसांनी त्याची गंभीरतेने दखल घेतली नाही, असा आरोपी पीडितेच्या कुटुंबियांनी केला आहे. मात्र पोलिसांनी या आरोपांचं खंडन केलं आहे.

औंछा पोलीस ठाण्याचे पोलीस इन्स्पेक्टर ऋषी कुमार यांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला नसल्याचं कबूल केलं आहे. कलम 164 अंतर्गत त्याबाबतचा गुन्हा दाखल केला जाईल, असं त्यांनी सांगितलं (Minor Girl gang raped in mainpuri UP).

याबाबत पीडितेच्या काकांनी टाइम्स ऑफ इंडियाला प्रतिक्रिया दिली आहे. “पोलिसांनी याप्रकरणी फक्त अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. सुरुवातीला समाजाच्या भितीने आम्ही आमच्या मुलीची बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांकडे केली नव्हती. आम्ही दिल्लीहून अपहरणकर्त्यांच्या तावडीतून आमच्या मुलीची सुटका केली. अपहरणकर्त्यांनी मुलीवर बलात्कार केल्याची माहिती मिळाल्यानंतर आम्ही पोलिसांना तक्रार केली. मात्र, पोलिसांनी दुर्लक्ष केलं”, असं पीडितेचे काका म्हणाले.