
भारतानं मध्यरात्री पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला. या एअर स्ट्राईकमध्ये पीओके आणि पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे 9 अड्डे उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. या मिशनला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलं होतं. त्यानंतर आता गृहमंत्रालयानं दिलेल्या आदेशानुसार देशभरात युद्धाच्या पार्श्वभूमीवर मॉक ड्रिलचं आयोजन करण्यात आलं. समजा जर युद्ध झालंच तर निर्माण झालेल्या परिस्थितीला कसं तोडं द्यायचं, हवाई हल्ला झाला तर काय करायचं याबाबत नागरिकांना जागृत करण्याचा उद्देश या मॉक ड्रिलचा आहे.
दिल्लीच्या खान मार्केटमध्ये बुधवारी एक मॉक ड्रिल घेण्यात आलं. ज्यामध्ये सुरक्षा दल आणि आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित विभागानं सहभाग घेतला. दुसरीकडे दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात देखील मॉक ड्रील घेण्यात आलं. बंगळुरूमधील हलसुरू तलाव, जयपूरमधील एअआय रोड, पुण्यातील कॉन्सिल हॉल, आणि हैदराबादमधील काचेगुडा रेल्वे स्थानकामध्ये मॉक ड्रिल घेण्यात आलं. तर मुंबईतील क्रॉस मैदान आणि सीएसएमटी येथे मॉक ड्रिल घेऊन नागरिकांना हवाई हल्ल्यापासून बचावाचं प्रात्यक्षिक नागरिकांना दाखवण्यात आलं.
मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्निल निला यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, मुंबईतील सीएसएमटी स्थानकात मॉक ड्रिल घेण्यात आलं. यावेळी रेल्वेच्या तयारीचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले, तसेच सर्वसामान्यांनी सतर्क राहावे असा संदेश देखील देण्यात आला आहे. मुंबईसोबतच कल्याणमध्ये देखील मॉक ड्रिल घेण्यात आलं. पंजाब आणि हरियाणामध्ये देखील अशाच प्रकारे मॉक ड्रिल पार पडलं.
भारताचा एअर स्ट्राईक
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला होता, या हल्ल्याचा बदला भारतानं एअर स्ट्राईक करून घेतला आहे. पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करण्यात आला. या हल्ल्यामध्ये पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे 9 अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट झाला आहे, सीमेवर पाकिस्तानच्या सैनिकांकडून शस्त्रासंधीचं उल्लंघन करण्यात आलं आहे, तसेच या हल्ल्यात आमचे 26 लोक मारले गेल्याचा कागावाही पाकिस्तानकडून करण्यात आला आहे. 46 लोक जखमी झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे.