Gyanesh Kumar: ज्ञानेश कुमार यांच्यावर मोठी जबाबदारी? CJP ला कोणती भीती?

CJP Ashutosh Ranka on Gyanesh Kumar: पुढील आठवड्यात संसदेचे विशेष अधिवेशन होत आहे. त्याचवेळी एक मोठी बातमी समोर येत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर मोठी जबाबदारी येण्याची शक्यता आहे. त्यावरून कॉकरोच जनात पार्टीने मोठी चिंता व्यक्त केली आहे.

Gyanesh Kumar: ज्ञानेश कुमार यांच्यावर मोठी जबाबदारी? CJP ला कोणती भीती?
ज्ञानेश कुमार यांच्यावर मोठी जबाबदारी? CJP ला कोणती भीती?
| Updated on: Nov 28, 2026 | 12:56 PM

CJP Ashutosh Ranka on Gyanesh Kumar: संसदेच्या आगामी विशेष अधिवेशनात महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना विधयेक मांडणार आहे. त्यावरून संपूर्ण देशात मोठे मंथन, चिंतन आणि महाभारत सुरू आहे. त्यातच दिल्लीतील गोटातून अजून एक मोठी बातमी समोर येत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर एक मोठी जबाबदारी टाकण्यात येणार असल्याची माहिती समोर यते आहे. कॉकरोच जनता पार्टीचे आशुतोष रांका यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट केलेी आहे. त्यानुसार, हे विधेयक मंजूर झाल्यास ज्ञानेश कुमार देशभरातील मतदारसंघाच्या सीमा निश्चित करतील असे सांगत या सर्व प्रक्रियेच्या निष्पक्षपातीपणाबद्दल रांका यांनी सवाल उपस्थित केला आहे.

प्रस्तावित मतदारसंघ पुनर्रचना आयोगाची रचना

Loading...

केंद्र सरकारच्या प्रस्तावित विधेयकानुसार, मतदारसंघ पुनर्रचना आयोगाची निर्मिती करण्यात येणार आहे. त्याच्या अध्यक्षपदी सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान अथवा माजी न्यायाधीश असतील. मुख्य निवडणूक आयुक्त अथवा त्यांनी नामनिर्देशित केलेले निवडणूक आयुक्त, संबंधित राज्याचे निवडणूक आयुक्त सदस्य म्हणून काम पाहतील. या आयोगाकडून सामूहिकरित्या लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना आणि सीमा निश्चित करण्यात येतील. या आयोगाला मदतीसाठी राज्यातील खासदार आणि आमदारांना सहयोगी सदस्य म्हणून समाविष्ट करण्याचा प्रस्ताव असला तरी त्यांना अंतिम निर्णयावर मतदान करण्याचा अथवा स्वाक्षरीचा कोणता अधिकार नसेल.

ज्ञानेश कुमार यांच्या नावाला मोठा आक्षेप

मतदार यांद्याच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या (SIR) मुद्यावरून ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीवर यापूर्वीच विरोधकांनी रान उठवलेले आहे. राहुल गांधी यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. त्यासाठी दिल्लीसह देशात मोठी आंदोलनंही झाली आहेत. या महिन्याच्या सुरुवातीच्या दिवसातही काँग्रेसने जहाल प्रतिक्रिया दिली आहे. दक्षिण भारतात लोकसंख्या नियंत्रण यशस्वी झाले आहे. तर उत्तर भारतात त्याला म्हणावे तितके यश आलेले नाही. त्यामुळेच दक्षिण राज्यात मतदारसंघ पुनर्रचनेत अन्याय होण्याची भीती व्यक्त होत आहे. तर आता परिस्थिती बदलली आहे. एनडीएला इंडिया आघाडीतील काही घटक पक्षांचा पाठिंबा मिळण्याची दाट शक्यता आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us