केंद्र सरकारचा कोरोना लसीचा मेगा प्लॅन तयार, पहिल्या टप्प्यात 30 कोटी नागरिकांना लस?

| Updated on: Dec 08, 2020 | 5:50 PM

भारतात कोरोना लसीचा मेगा प्लॅन आखण्यात आला आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात 30 कोटी नागरिकांना लस दिली जाणार आहे (Modi Government Mega plan of Corona Vaccination).

केंद्र सरकारचा कोरोना लसीचा मेगा प्लॅन तयार, पहिल्या टप्प्यात 30 कोटी नागरिकांना लस?
Follow us on

नवी दिल्ली : भारतात कोरोना लसीचा मेगा प्लॅन आखण्यात आला आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात 30 कोटी नागरिकांना लस दिली जाणार आहे. केंद्र सरकारने लसीकरण्यासाठी आखून दिलेल्या समितीने आधी लस कुणाला द्यायची याबाबत काही सूचना दिल्या आहेत. पहिल्या टप्प्यात 1 कोटी आरोग्य कर्मचारी, 2 कोटी पोलीस, आर्मी आणि सुरक्षा यंत्रणांमधील कर्मचाऱ्यांना लस देण्याचं सूचवण्यात आलं आहे. तर 27 कोटी 50 वर्षावरील आणि 50 वर्षाखालील नागरिकांना लस देण्यास सूचवण्यात आलं आहे. लसीकरण्यासाठी प्रत्येक राज्य, जिल्हा आणि तालुका पातळीवर टास्क फोर्स असणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत याबाबत माहिती देण्यात आली (Modi Government Mega plan of Corona Vaccination).

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी लसीकरणाबाबत महत्त्वाची माहिती दिली. “वैज्ञानिकांकडून लसीबाबत एकदा हिरवा कंदिल मिळाल्यानंतर तातडीने लसीचं मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरु केलं जाईल. त्यासाठी आम्ही पूर्णुपणे तयारी केली आहे. लसीचं उत्पादन वाढवण्यासाठी रुपरेखा आखण्यात आली आहे. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त लोकांपर्यंत लस कशी पोहोचेल याचं नियोजन आम्ही करत आहोत”, असं राजेश भूषण यांनी सांगितलं.

काही कंपन्यांनी कोरोना लस तयार केली आहे. त्यांपैकी काहींना पुढच्या काही आठवड्यांमध्ये लायसन्स दिलं जाईल, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली.

“तीन लसी या प्री-क्लिनिकल स्टेजमध्ये आहेत. तर सहा लस क्लिनिकल ट्रायलमध्ये आहेत. मात्र, या दोन ते तीन डोजवाल्या लसी आहेत. प्रत्येक डोजनंतर तीन ते चार आठवड्यांचं अंतर आहे. काही लसींना पुढच्या आठवड्यांमध्ये लायसन्स दिलं जाईल”, असं राजेश भूषण यांनी सांगितलं.