CJP Protest : सरकारकडून CJP ची एक मागणी मान्य, आता नड्डांच्या घरी चर्चेचा प्रश्नच मिटला

CJP Protest : या आंदोलनाचा प्रमुख चेहरा असलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी 26 दिवसांपासून सुरु असलेलं आमरण उपोषण सोडलं. रात्री उशिरा केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांनी रुग्णालयात जाऊन वांगचूक यांची भेट घेतली.

CJP Protest : सरकारकडून CJP ची एक मागणी मान्य, आता नड्डांच्या घरी चर्चेचा प्रश्नच मिटला
CJP Protest
| Updated on: Jul 24, 2026 | 11:05 AM

कॉकरोच जनता पार्टी आणि केंद्र सरकारमध्ये चर्चेचे दरवाजे उघडण्याचे संकेत मिळाले आहेत. न्यूट्रल वेन्य म्हणजे तटस्थ ठिकाणी चर्चेची CJP ची मागणी सरकारने मान्य केली आहे. CJP ने हा दावा केला आहे. दोन्ही पक्षांमध्ये 24 जुलै रोजी नवी दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडियामध्ये चर्चा होईल. न्यूट्रल वेन्यवर चर्चा करण्याची आमचा प्रस्ताव सरकारने स्वीकारला आहे. आम्ही याचं स्वागत करतो असं CJP चे मुख्य प्रवक्ते सौरव दास यांनी म्हटलं आहे. पक्ष आपल्या सर्व प्रमुख मागण्या आधीप्रमाणेच मजबुतीने सरकारसमोर मांडेल असं सौरव दास म्हणाले. सरकार न्यूट्रल वेन्यूवर भेटण्यासाठी तयार आहे, असं सीजेपी प्रवक्त्या वैष्णवी गौर म्हणाल्या. पक्ष आपल्या चार प्रमुख मागण्यांवर कायम आहे. यात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, परीक्षा अनियमिततेमुळे प्रभावित झालेल्या कुटुंबांना नुकसान भरपाई, निर्दोष आंदोलकांविरुद्धचे सर्व गुन्हे मागे घेणं आणि परीक्षा व्यवस्थेत व्यापक सुधारणा या सीजेपीच्या चार प्रमुख मागण्या आहेत.

या आंदोलनाचा प्रमुख चेहरा असलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी 26 दिवसांपासून सुरु असलेलं आमरण उपोषण सोडलं. रात्री उशिरा केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांनी रुग्णालयात जाऊन वांगचूक यांची भेट घेतली. नड्डा यांच्या हातून ज्यूस पिऊन वांगचूक यांनी उपोषण सोडलं. वांगचूक यांनी सरकारकडून तीन आश्वासनं घेऊन उपोषण सोडलं. यात आंदोलनातील विद्यार्थ्यांवर कोणताही गुन्हा दाखल होणार नाही, पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांवर चर्चा आणि जीवन संपवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना नुकसानभरपाई अशी तीन आश्वासनं वांगचूक यांनी सरकारकडून घेतली आहेत.

धैर्याला आणि त्यागाला मनापासून सलाम

CJP संस्थापक अभिजीत दीपके यांनी वांगचूक यांच्या उपोषण सोडण्याच्या निर्णयाचं स्वागत केलं. पण आपलं आंदोलन सुरुच राहणार असल्याच त्यांनी स्पष्ट केलं. “सोनम सरांनी त्यांचं उपोषण मागे घेतल्याने आम्हाला दिलासा मिळाला असून आम्ही त्यांचे मनापासून आभार मानतो. सोनम सर, तुमच्या असामान्य धैर्याला आणि त्यागाला मनापासून सलाम” असं अभिजीत दीपके म्हणाले.

Follow Us