लोकसभा आणि राज्यसभेच्या किती खासदारांनी कोरोना लस घेतली? एकही डोस न घेतलेले किती खासदार?

| Updated on: Jun 30, 2021 | 6:50 PM

भारताचं कायदेमंडळ म्हणजेच संसदेच्या लोकसभा आणि राज्यसभा सदस्यांपैकी नेमक्या किती जणांनी कोरोना लस घेतली याची माहिती समोर आली आहे.

लोकसभा आणि राज्यसभेच्या किती खासदारांनी कोरोना लस घेतली? एकही डोस न घेतलेले किती खासदार?
दोनपेक्षा अधिक मुले असल्यास कुटुंब गमावणार हे सरकारी लाभ
Follow us on

नवी दिल्ली: भारताता सध्या कोरोना लसीकरण (Corona Vaccination) मोठ्या प्रमाणात सुरु आहे. लसीकरणाचे रोज नव नवे विक्रम रचले जात आहेत. भारताचं कायदेमंडळ म्हणजेच संसदेच्या लोकसभा आणि राज्यसभा सदस्यांपैकी नेमक्या किती जणांनी कोरोना लस घेतली याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज्यसभेच्या 179 खासदारांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत. तर 39 खासदारांनी पहिला डोस घेतला आहे. तर, 9 खासदारांनी कोरोनाची लस घेतलेली नाही. लोकसभेच्या 96 खासदारांनी आतापर्यंत कोरोना लसीचा एकही डोस घेतलेला नाही. (Monsoon Session of Parliament how many Rajya sabha and Loksabha MPs taken Corona vaccine Jab)

लोकसभेच्या किती खासदारांनी लस घेतली?

लोकसभेच्या एकूण सदस्यांपैकी 320 खासदारांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. तर, दुसरीकडे 124 खासदारांनी खासदारांनी एक डोस घेतला आहे. तर, आतापर्यंत 96 खासदारांनी आतापर्यंत एकही डोस घेतलेला नाही. तर, कोरोना लसीकरणाची प्रक्रिया अद्याप सुरु आहे.

संसंदेचं पावसाळी अधिवेशन 19 जुलैपासून सुरु

संसंदेचे पावसाळी अधिवेशन 19 जुलैपासून सुरु होणार आहे. तर, मान्सून सत्राचा समारोप 13 ऑगस्टला होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पावसाळी अधिवेशनात 20 दिवस कामकाज चालण्याची शक्यता आहे. तर, स्वातंत्र्यदिनापूर्वी संसदेचं पावसाळी अधिवेशन समाप्त होईल. पावसाळी अधिवेशनात कोरोना नियमांचं पालन केलं जाणार आहे. पावसाळी अधिवेशन सुरु होण्यापूर्वी ज्यांनी कोरोना लस घेतली नाही ते खासदार कोरोना लसीचा पहिला डोस घेतील अशी शक्यता आहे.

भारतातील आतापर्यंतची आकडेवारी

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 3 लाख 62 हजार 848 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 2 कोटी 94 लाख 27 हजार 330 रुग्ण बरे झाले आहेत. तर 3 लाख 98 हजार 454 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 5 लाख 37 हजार 64 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 33 कोटी 28 लाख 54 हजार 527 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी

देशात 24 तासात नवे रुग्ण – 45,951

देशात 24 तासात डिस्चार्ज – 60,729

देशात 24 तासात मृत्यू – 817

एकूण रूग्ण – 3,03,62,848

एकूण डिस्चार्ज – 2,94,27,330

एकूण मृत्यू – 3,98,454

एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 5,37,064

आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 33,28,54,527

एका दिवसातील लसीकरण – 36,51,983

संबंधित बातम्या:

दिल्लीच्या गाझीपूर बॉर्डरवर शेतकरी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झटापट, मोठा गदारोळ

Special Report | कोरोनापासून फक्त लसच वाचवू शकते!

लसीकरण या एकाच मंत्राने तिसरी लाट थोपवता येईल, आरोग्यमंत्र्यांचं जनतेला आवाहन

(Monsoon Session of Parliament how many Rajya sabha and Loksabha MPs taken Corona vaccine Jab)