आई हिंदू, वडील ख्रिश्चन…कोणत्या धर्माला मानतात थलपती विजय?

साऊथचे सुपरस्टार थलपती विजय यांच्या पक्षाला तामिळनाडूत 108 हून अधिक जागा मिळाल्या आहेत. त्यांच्याच गळ्यात तामिळनाडूचे पुढचे मुख्यमंत्री म्हणून माळ पडण्याची शक्यता आहे. विजय यांच्या संदर्भात माहिती युजर्स इंटरनेटवर शोधत आहेत. अखेर ते कोणता धर्म मानतात याची लोकांना उत्सुकता लागली आहे.

आई हिंदू, वडील ख्रिश्चन...कोणत्या धर्माला मानतात थलपती विजय?
vijay thalapathy
| Updated on: May 04, 2026 | 8:38 PM

तामिळनाडूतील विधानसभेतील निवडणूकीत थलपती विजय यांच्या विजयाने अनेक राजकीय पक्षांना धक्का बसला आहे. बातमी लिहीपर्यंत थलपती विजय यांचा पक्ष टीव्हीके 108 जागांवर पुढे गेली आहे. अशात तामिळनाडू येथे पुढचे मुख्यमंत्री म्हणून विजय यांचे नाव पुढे येत आहे. निवडणूकीत टीव्हीकेच्या जोरदार कामगिरीमुळे पार्टीचे कार्यकर्तेच नव्हे तर विजय याचे कुटुंब देखील आनंदी झाले आहे. सोशल मीडियावर विजय ट्रेंडमध्ये आहे. इंटरनेटवर कोणी त्याचे पूर्ण नाव शोधत आहे, तर कोणी त्यांचा धर्म कोणता याची विचारणा करताना दिसत आहे.

दक्षिण भारतीय सिनेमाचे ( कॉलीवूड ) सुपरस्टार थलपती विजय यांचे संपूर्ण नाव जोसेफ विजय चंद्रशेखर असे आहे. त्यांचे संपूर्ण नाव नेहमीच लोकांमध्ये त्यांच्या धर्मावरुन एक कन्फ्युजन निर्माण करत आहे.त्यामुळे बहुतांशी चाहत्यांना त्यांचा धर्म माहिती नाही.

थलपती विजय यांचा जन्म तामिळनाडूच्या एका कॅथलिक ख्रिश्चन कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील एस.ए.चंद्रशेखर तामिळ सिनेमाचे प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. विजय याला सुपरस्टार बनवण्यात त्यांचा रोल महत्वाचा आहे. विजय याची आई शोबा चंद्रशेखर एक प्लेबॅक सिंगर होती आणि ती हिंदू धर्माशी संबंधित आहे. त्यांनी एका मुलाखती सांगितले की तिचे आई-वडीलांनी लव्ह मॅरेज केले होते.

कोणत्या धर्माला मानतात थलपती विजय ?

जरी विजय यांचे वडील ख्रिश्चन आणि आई हिंदू धर्माशी संबंधित आहे. परंतू सार्वजनिक रुपाने विजय हे स्वत:च्या धार्मिक ओळखी पेक्षा जास्त मानवी आणि सामाजिक मुल्यांशी जोडून सादर करणे पसंद करतात. त्यांच्या कुटुंबाचे संस्कार आणि धार्मिक मुल्यांत याची झलक पाहायला मिळते. वडील ख्रिश्चन असूनही विजय अनेकवेळा आपल्या आई सोबत हिंदू देवी-देवतांच्या मंदिरात जातात. त्यांच्या माथ्यावर अनेकदा चंदनाचा टीळा आणि गळ्यात रुद्राक्षाची माळा पाहायला मिळाली आहे.

विजय यांची आई साईबाबा यांची मोठी भक्त आहे. मागे त्यांनी चेन्नईच्या कोरत्तुर येथे साई बाबांचे भव्य मंदिर बनवले होते. वास्तविक त्यांच्या आईची ही इच्छा होती की त्यांनी साईबाबांचे एक मंदिर बनवावे. विजय याने त्याच्या आईची इच्छा कोणतीही प्रसिद्धी न करता पूर्ण केली. विजय यांची आई म्हणते की पवित्र जागा त्यांच्यासाठी एका मंदिराहून जास्त आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us