Indore Tijori : कामगार खोदत राहिला, जमिनीतून बाहेर आली गूढ तिजोरी, थेट राजघराण्याशी कनेक्शन? एकच चर्चा!

बीच्या मदतीने जमीन खोदली जात होती. याच वेळी ही तिजोरी कामगारांच्या हाती लागली आहे. ही तिजोरी मिळताच कामगारांनी तिला सुरक्षितपणे बाहेर काढले.

Indore Tijori : कामगार खोदत राहिला, जमिनीतून बाहेर आली गूढ तिजोरी, थेट राजघराण्याशी कनेक्शन? एकच चर्चा!
indore red palace tijori found
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 18, 2026 | 5:04 PM

Treasure Found : कधी-कधी खोदकाम करताना जुन्या, ऐतिहासिक वस्तू सापडल्याच्या घटना अनेकदा घडलेल्या आहेत. काही वेळा तर खोदकाम करताना मोठा खजिनाही सापडलेला आहे. पृथ्वीच्या पोटात गडप झालेली अशीच एक तिजोरी आता बाहेर आली आहे. या तिजोरीला गंज लागलेला आहे. या तिजोरीचा संबंध हा राजेशाही घराण्याशी असल्याचा दावा स्थानिक लोक करत आहेत. त्यामुळे या तिजोरीत नेमकं आहे तरी काय? याची उत्सुकता संपूर्ण देशाला लागली आहे.

तिजोरी कुठे मिळाली?

मिळालेल्या माहितीनुसार ही तिजोरी इंदौर येथील लालबाग पॅलेसच्या डागडुजीच्या कामादरम्यान मिळाली आहे. लालबाग पॅलेसच्या डागडुजीचे काम सुरू होते. यावेळी जेसीबीच्या मदतीने जमीन खोदली जात होती. याच वेळी ही तिजोरी कामगारांच्या हाती लागली आहे. ही तिजोरी मिळताच कामगारांनी तिला सुरक्षितपणे बाहेर काढले. आता ही तिजोरी होळकर राजघरणाऱ्याशी तर सबंधित नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

Loading...

तिजोरीत नेमकं काय आहे?

जमिनीत तिजोरी असल्याचे समजताच पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांना पाचरण करण्यात आले. सध्या ही तिजोरी सुरक्षित आहे. तिला बाहेरून कोणतीही इजा झालेली नाही. अधिकारी ही तिजोरी खोलण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. सध्यातरी या तिजोरीत नेमकं काय आहे? हे समोर आलेले नाही. परंतु संबंधित तिजोरी ही राजेशाही घराण्याशी संबंधित असावी, असा स्थानिकांचा अंदाज आहे.

तिजोरीबाबत काय अभ्यास केला जाणार?

सध्या ही तिजोरी नेमकी कोणाची आहे? कोणाशी संबंधित आहे, याचे उत्तर सापडलेले नाही. परंतु तिजोरीसाठी वापरलेला धातू, तिजोरीवरील डिझाईन, तिजोरीवरील नक्षीकाम यावरून तिचा राजघराण्याशी संबंध आहे की नाही, हे समजणार आहे.

थेट तर्क लावणे घाईचे ठरेल

सध्यातरी ही तिजोरी इंदौरच्या होळकर राजघराण्याशी संबंधित आहे, असा दावा करणे घाईचे ठरेल, असं पुरातत्त्व अधिकऱ्यांचं मत आहे. आम्ही याबाबत अधिक अभ्यास करू. त्यानंतर या तिजोरीत काय आहे आणि तिचा राजघराण्याशी संबंध आहे का? हे समजणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us