अभिषेक बच्चन याचा खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा, पैसे वाचवण्यासाठी चहात..
बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन आज कोट्यावधी संपत्तीचे मालक आहेत. पण त्यांच्या आयुष्यात एक वेळ अशी आली होती, ज्यावेळी मोठ्या आर्थिक संकटात ते सापडले होते. आर्थिक तंगी इतकी वाढली होती की, त्याचा परिणाम त्यांच्या घरारपर्यंत पोहोचला होता.

बॉलिवूडचे स्टार अमिताभ बच्चन यांच्या आयुष्यात एक वेळ अशी आली होती की, त्यांना मोठ्या आर्थिक समस्येचा सामना करावा लागत होता. 1990 मध्ये त्यांची कंपनी ABCL चे दिवाळे निघाले होते. कंपनी मोठ्या आर्थिक संकटात सापडली होती. हेच नाही तर याची झळ थेट त्यांच्या घरापर्यंत पोहचली. अमिताभ बच्चन यांनी दिवसरात्र एकत्र करत मेहनतीने पैसा कमावला. मात्र, ज्यावेळी पैशांची मोठी चणचण सुरू होती, त्यावेळी त्यांचे घर कसे चालत होते, याबाबत अभिषेक बच्चन याने एका पॉडकास्टमध्ये सांगितले. अभिषेक बच्चन याने सांगितले की, त्यावेळी ही परिस्थिती निर्माण झाली, त्यावेळी मी विदेशात शिक्षण घेत होतो. पण मला माझ्या वडिलांसोबत या परिस्थितीमध्ये राहायचे होते. त्यामुळे मी माझे शिक्षण अर्धवट सोडून भारतात परतलो. मी त्यावेळी बोस्टन विद्यापीठात शिक्षण घेत होतो.
मी माझे शिक्षण अर्धवट सोडून भारतात आलो, कारण त्यावेळी परिस्थिती खूप जास्त खराब होती. ABCL नावाने व्यावसाय सुरू केला होता. त्यावेळी मी त्यांची कोणत्याही प्रकारची मदत करण्यास सक्षम नव्हतो. पण एक मुलगा म्हणून मला त्यांच्या आसपास राहायचे होते. त्यामुळेच मी कॉलेज सोडून आलो. मला वडिलांना रात्री उशीरा त्यांच्या रूममध्ये बोलावले आणि तंगीबद्दल सांगितले.
त्यावेळी त्यांचे चित्रपटही चालत नव्हते. व्यावसाय ठप्प होता. मी त्यावेळी सेटवर प्रोडक्शन बॉयचे काम सुरू केले. मी अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पैसे वाचवण्यास सुरूवात केली. म्हणजे मी पैसे वाचवण्यासाठी सुरूवातीच्या दिवसांमध्ये क्रूसाठी तयार होणाऱ्या चहामध्येही साखर कमी टाकत असे. छोट्या छोट्या गोष्टींतून पैसे कसे वाचवायचे हे मी यातून शिकलो.
मी सेटवर मिळेल, ते काम केले. त्यानंतर मी असिस्टेंट डायरेक्टर झालो. त्यावेळी अमिताभ बच्चन यांच्यावर 90 कोटींचे कर्ज असल्याचे सांगितले जाते. याबाबत स्वत: अमिताभ बच्चन यांनी अनेकदा भाष्य केले. हळूहळू करून त्यांचे चित्रपट चालले आणि त्यांच्या डोक्यावरील कर्ज संपले.त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी आयुष्यात कधीच मागे वळून बघितले नाही.
