Video: कडाक्याच्या थंडीत जवानाची वर्दी गोठली! व्हिडिओ पाहून ….
कितीही थंडी, ऊन, वारा, पाऊस असला तरी सैनिक कायम आपल्या रक्षणासाठी तटस्थ उभा असतो. याचं मूर्तिमंद उदाहरण या व्हायरल व्हिडिओवरून स्पष्ट होत आहे. या व्हायरल व्हिडिओमुळे सीमेवरील आपल्या जवानांची खरी परिस्थिती आपल्याला कळून चुकते.

मायनस 10 अंश तापमान… आजुबाजूला कडाक्याची थंडी आणि गोठलेलं वातावरण! अशा परिस्थितीत आपण घराबाहेर पडण्याचा विचारच करणार नाही. कामधंद्यालाही सुट्टीच घेऊ. पण देशाच्या सीमेवर तैनात असलेल्या जवानांना मात्र याच थंडीच आपली ड्युटी करावी लागते. आता अशाच एका जवानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये जवानाची वर्दी चक्क बर्फामुळे इतकी कडक झाली की ती पत्र्यासारखी कडक झाली. धड त्याची घडीही होत नव्हती. हे दृश्य पाहून नेटकरीही थक्क झाले आहेत.व्
व्हायरल व्हिडिओमध्ये जवान रात्रीच्या वेळी बाहेर ठेवलेली आपली वर्दी दाखवताना दिसतो. तिथलं तापमान उणे 10 अंश सेल्सिअस असल्याचं तो सांगतो आहे. थंडीमुळे वर्दीवर बर्फ साचला असून ती पूर्णपणे गोठली आहे. जवान वर्दीचा हात वर करून दाखवतो, तेव्हा ती वर्दी खाली पडण्याऐवजी तसाच ताठ राहतो. कपड्याला हात लावल्यावर तो साधा वाकतही नाही. तिथे किती थंडी असेल आपले जवान किती थंडीत राहतात याचा अंदाज आपल्याला या व्हिडिओवरून आलाच असेल.
View this post on Instagram
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
हा व्हिडिओ the soldiers viju या इन्स्टग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. जवानाने या व्हिडिओच्या माध्यमातून सैनिकांच्या आयुष्यातील कठीण परिस्थिती दाखवली आहे. लोकांना सैनिकांचा पगार दिसतो, पण त्यासाठी त्यांना कोणत्या परिस्थितीत काम करावं लागतं, याची जाणीव अनेकांना नसते. असंही तो सांगताना दिसतो.
व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी जवानाच्या धैर्याचं कौतुक केलं आहे. काहींनी देशाच्या रक्षणासाठी अशा कठीण परिस्थितीत काम करणाऱ्या सैनिकांना सलाम केला. तर काहींनी त्यांच्या कष्टांची जाणीव ठेवण्याचं आवाहन केलं आहे.
आपल्याला थंडी वाजली की आपण लगेच स्वेटर किंवा रजई शोधतो. पण सीमेवर तैनात असलेल्या जवानांना मात्र अशा परिस्थितीतही आपलं कर्तव्य पार पाडावं लागतं. त्यामुळे हा व्हिडिओ केवळ गोठलेल्या वर्दीचा नाही, तर देशासाठी जवानांना कराव्या लागणाऱ्या संघर्षाची जाणीव करून देणारा ठरतो.
